एक्स्प्लोर
विद्यार्थ्यांनी हिंसाचाराच्या वादळात गुरफटणं दुर्दैवी : राष्ट्रपती मुखर्जी
कोचीन : दिल्लीतल्या रामजस कॉलेजमधील वाद आणि गुरुमेहेर कौर हिने सुरु केलेली मोहिम या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी विद्यार्थ्यांना कानपिचक्या दिल्या आहेत. राष्ट्रपती मुखर्जी यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून अशांततेच्या संस्कृतीचा प्रचार करण्याऐवजी, विद्यार्थी आणि शिक्षकांनी एकत्र येऊन तार्किक चर्चा करायला पाहिजे, असा सल्ला दिला. याशिवाय, विद्यार्थ्यांनी अशांतता आणि हिंसाचाराच्या वादळात स्वत: ला गुरफटून घेणं दुर्दैवी असल्याचं मतही त्यांनी यावेळी नोंदवलं.
केरळच्या कोचीनमधील सहाव्या केएस राजामणी मेमोरियल व्याख्यानावेळी त्यांनी आपली रोखठोक मतं मांडली. राष्ट्रपती म्हणाले की, ''आपल्या देशातील शैक्षणिक संस्थां भारतात एक ज्ञानी आणि शिक्षित समाज स्थापन करु शकतात. त्यामुळे विद्येच्या या मंदिरात सृजनात्मक आणि स्वतंत्र चिंतनाची गरज आहे. अशा ठिकाणी हिंसाचार आणि अशांततेच्या वादळात विद्यार्थी अडकत आहेत, हे पाहणे दुर्दैवी आहे.''
गुरुमेहेर कौरला होणाऱ्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती म्हणाले की, ''देशात असहिष्णूतेला थारा नाही. कारण आपला देश पुरातन काळापासून स्वतंत्र विचार, अभिव्यक्ती आणि भाषणांचा गड आहे. कोणत्याही व्यक्तीला अभिव्यक्त होण्याचा आणि बोलण्याचं स्वातंत्र्य आपल्याला देशाच्या राज्यघटनेनं दिलं आहे. त्यामुळे एखाद्याला आपली मतं मांडताना टीकेचं किंवा असहमती व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य दिलंच पाहिजे.''
राष्ट्रपती पुढे म्हणाले की, ''ज्या राज्यातील नागरिक आपल्या आचरणाद्वारे माहिलांप्रती गैरवर्तन करतात, तो समाज अथवा राज्य सभ्य नसते. जेव्हा आपण एखाद्या महिलेशी गैरवर्तन करतो, तेव्हा आपण आपल्या सहकार्याच्या मूल्यांनाच हरताळ फासतो. आपल्या राज्यघटनेनं केवळ महिलांना समान अधिकार दिलेत असं नाही, तर देशाची संस्कृती आणि परंपरा यानेही स्त्रिला देवत्व प्रदान केलंय. त्यामुळे याची जाणिव ठेऊन, सर्वांनी लोकशाहीला बळकट करण्यासाठी पोषक वातावरण तयार केलं पाहिजे,'' असंही ते यावेळी म्हणाले.
विशेष म्हणजे, जे लोक हिंसाचाराचा मार्ग पत्करुन देशात अशांतता पसरतवत आहेत, त्यांनाही राष्ट्रपतींनी यावेळी खडेबोल सुनावले. गौतम बुद्ध, सम्राट अशोक आणि अकबर बादशाहा यांच्या इतिहासाचा उल्लेख करुन, त्यांच्या कार्यांमुळे इतिहासात त्यांची नायक म्हणून नोंद आहे. तर हिटलर आणि चंगेज खान यांच्या कृत्यांमुळे इतिहासात त्यांची नोंद खलनायक म्हणून असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement