एक्स्प्लोर

बिहारच्या ऐन रणधुमाळीत प्रशांत किशोर गायब, पीकेंच्या अलिप्ततेमागे कुठली रणनीती दडलीय?

एरव्ही ट्विटरवरच महत्वाच्या भूमिका मांडणाऱ्या प्रशांत किशोर यांचं शेवटचं ट्वीट 20 जुलै 2020 चं आहे. त्यानंतर गेल्या साडेतीन महिन्यांत त्यांनी एकही ट्वीट केललं नाहीय.

नवी दिल्ली : बिहार निवडणुकीची रणधुमाळी ऐन रंगात असताना एक चेहरा मात्र या सगळ्यातून गायब आहे. तो म्हणजे राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर. काही दिवसांपूर्वी ज्यांना बिहारच्या राजकारणातला उगवता तारा म्हणून पाहिलं जात होतं, ते प्रशांत किशोर या निवडणुकीत कुठेच सक्रीय दिसत नाहीयेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत प्रशांत किशोर यांनी भाजपसाठी काम केलं होतं. पण ते खऱ्या अर्थानं देशपातळीवर चर्चेत आले ते 2015 च्या बिहार निवडणुकीनं. त्यावेळी नितीश, लालू यादव आणि काँग्रेस असं एकत्र महागठबंधन करुन भाजपला रोखण्यात प्रशांत किशोर यांचा वाटा होता.

त्यानंतर प्रशांत किशोर आणि नितीशकुमार यांच्यात समीकरणं अगदी 180 डिग्रीत बदलली आहेत. नितीशकुमार हे लालू यादव यांची साथ सोडून भाजपसोबत गेले. 2018 मधे प्रशांत किशोर यांना जेडीयूत अधिकृत प्रवेश देऊन राष्ट्रीय उपाध्यक्षही बनवण्यात आलं होतं. पण नंतर अवघ्या काही काळातच त्यांचे संबंध इतके बिघडले की त्यांना पक्षातून काढण्यात आलं. नागरिकत्व कायद्यावरुन प्रशांत किशोर यांनी घेतलेली थेट विरोधाची भूमिका हा त्यातला कळीचा मुद्दा होता. नितीशकुमार या मुद्द्यावर भाजपला साथ देत असताना दुसरीकडे प्रशांत किशोर मात्र जाहीरपणे भाजपवर टीका करत होते.

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आरक्षणाची फेरमांडणी करु इच्छितायत?

जेडीयूतून बाहेर पडल्यावर प्रशांत किशोर स्वताचा राजकीय पक्ष काढणार का याचीही काही दिवस चर्चा होती. यावर्षी फेब्रुवारीतच त्यांनी बात बिहार की नावानं एक संवाद अभियान सुरु केलं होतं. पण नंतर त्याचं काही राजकीय रुपांतर होताना दिसलं नाही. प्रशांत किशोर स्वत: बिहारचे आहेत, मात्र आपल्या राज्यात निवडणूक होत असताना ते कुठेच नाहीत. त्यामुळे त्यांचं हे अचानक गायब होणं हे सहज आहे की या अलिप्ततेमागे काही सुनियोजित रणनीती आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

लोकसंख्येनुसारच मिळायला हवं आरक्षण, ऐन निवडणुकीत नितीशकुमारांचं आरक्षणावर मोठं वक्तव्य

विशेष म्हणजे प्रशांत किशोर बिहारमध्ये सगळं राजकीय घमासान सुरु असताना कुठल्याच मुद्द्यावर व्यक्तही होत नाहीयेत. एरव्ही ट्विटरवरच महत्वाच्या भूमिका मांडणाऱ्या प्रशांत किशोर यांचं शेवटचं ट्वीट 20 जुलै 2020 चं आहे. त्यानंतर गेल्या साडेतीन महिन्यांत त्यांनी एकही ट्वीट केललं नाहीय. त्यामुळे प्रशांत किशोर गप्प राहून नेमकी कुणाला मदत करत आहेत, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. प्रशांत किशोर यांनी आत्तापर्यंत अनेक राज्यांमध्ये वेगवेगळ्या पक्षांसाठी निवडणूक अभियान आखलेलं आहे. सध्या ते 2021 च्या सुरुवातीला होणाऱ्या पश्चिम बंगाल निवडणुकांसाठी ममता बॅनर्जी यांच्यासाठी काम करत आहेत. शिवाय त्यानंतर होणाऱ्या तामिळनाडू निवडणुकीत ते एम के स्टॅलिन यांच्या डीएमके पक्षासोबतही काम करत आहेत. महाराष्ट्रात झालेल्या निवडणुकांपुर्वीही त्यांनी शिवसेना नेते उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांची भेट घेतलेली होती.

महत्त्वाच्या बातम्या

Monsoon Rain Update: दुष्काळात तेरावा महिना! मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात; देशात 15 टक्के पावसाची तूट, महाराष्ट्रात पुढील 3 दिवस पावसाचा अंदाज
दुष्काळात तेरावा महिना! मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात; देशात 15 टक्के पावसाची तूट, महाराष्ट्रात पुढील 3 दिवस पावसाचा अंदाज
Sanjay Raut on PM Modi: राहुल गांधींनी आता मोदींना 'पप्पू' ठरवलंय, पंतप्रधानांची मिमिक्री करत संजय राऊतांचा हल्लाबोल
राहुल गांधींनी आता मोदींना 'पप्पू' ठरवलंय, पंतप्रधानांची मिमिक्री करत संजय राऊतांचा हल्लाबोल
Prakash Raj on CM Vijay: थलापती विजय सीएम होऊन चार महिन्यांचा कालावधी; अभिनेते प्रकाश राज यांच्या प्रतिक्रियेनं भूवया उंचावल्या
थलापती विजय सीएम होऊन चार महिन्यांचा कालावधी; अभिनेते प्रकाश राज यांच्या प्रतिक्रियेनं भूवया उंचावल्या
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, सीबीआय संचालक ते माजी लष्करप्रमुखांना सुद्धा निवडणूक आयोगाची नोटीस, नेमकं काय घडलं?
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, सीबीआय संचालक ते माजी लष्करप्रमुखांना सुद्धा निवडणूक आयोगाची नोटीस, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Maharashtra Dushkal : दुष्काळ जाहीर होणार, मदत कधी मिळणार Special Report
JainMuni KabootarKhana : पुन्हा धडपड कबुतरांसाठी फडफड Special Report
Amit Thackeray Dagdusheth Ganpati Pune : राज ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, अमित ठाकरेंचे दगडूशेठ गणपतीला साकडं
Sangli krishna river : दूषित पाणी थेट नदीत, कृष्णेचा रंग बदलला Special Report
Mumbai IIT Students Protest : विद्यार्थ्याचा मृत्यू, कॅम्पस हादरला; IIT बॉम्बेच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti :  केंद्र सरकार टप्प्यात आलंय, दिवाळीला साखर हवी असेल तर 'या' तीन मागण्या मान्य कराव्या लागणार : राजू शेट्टी 
केंद्रीय अन्नपुरवठा मंत्र्याच्या हुबळी गावात शेतकऱ्यांचे आंदोलन, राजू शेट्टी यांची घोषणा     
महसूलमंत्र्यांचा 'आदर्श नोंदणी पॅटर्न' आता देशभरात ! केंद्राकडून प्रत्येक कार्यालयाला 50 लाखांचे अनुदान
महसूलमंत्र्यांचा 'आदर्श नोंदणी पॅटर्न' आता देशभरात ! केंद्राकडून प्रत्येक कार्यालयाला 50 लाखांचे अनुदान
विद्यानंद बापट लहानपणापासूनच हुशार; रत्नागिरीत 22 वर्षांपूर्वीच तत्कालीन नेते उदय सामंतांकडून सत्कार, फोटो व्हायरल
विद्यानंद बापट लहानपणापासूनच हुशार; रत्नागिरीत 22 वर्षांपूर्वीच तत्कालीन नेते उदय सामंतांकडून सत्कार, फोटो व्हायरल
Rahul Gandhi Phone Call Rahul Bondre : आम्ही तुमच्यासोबत आहोत, तुम्ही कुठं जाऊ नका, पराभवानंतर विजय होतो, राहुल गांधी यांचा राहुल बोंद्रेंना फोन; राहुल बोंद्रेंचा काँग्रेसमध्ये राहण्याचा निर्णय
राहुल गांधी यांच्यासोबत बोलताना राहुल बोंद्रे भावूक, काँग्रेसमध्येच थांबून लढण्याचा राहुल बोंद्रे यांचा शब्द
CSK Zaheer Khan: चेन्नई सुपर किंग्जचा नवा डाव, IPL 2027 साठी झहीर खानवर सोपवली मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी 
स्टीफन फ्लेमिंगनं साथ सोडली, चेन्नईनं नवा डाव टाकला, झहीर खानवर मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी
भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये जेवणासाठी फ्री स्टाईल; पालकमंत्र्यांच्या बैठकीनंतर एकच घाई, कॉलर पकडून हाणामारी
भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये जेवणासाठी फ्री स्टाईल; पालकमंत्र्यांच्या बैठकीनंतर एकच घाई, कॉलर पकडून हाणामारी
Post Office RD Scheme : दरमहा फक्त 4000 रुपयांची पोस्टाची RD ठरेल गेमचेंजर, 5 वर्षात किती फंड जमणार, कर्ज काढण्याची सुविधा उपलब्ध, जाणून घ्या
दरमहा फक्त 4000 रुपयांची पोस्टाची RD ठरेल गेमचेंजर, 5 वर्षात किती फंड जमणार, आर्थिक संकटात कर्ज देखील मिळतं...
अमित ठाकरेंचा संवेदनशीलपणा; केमिकल रंगाने रंगलेल्या चिमुकल्यांना पाहून वेदना, मदतीसाठी पुढाकार, मनसैनिकांना आवाहन
अमित ठाकरेंचा संवेदनशीलपणा; केमिकल रंगाने रंगलेल्या चिमुकल्यांना पाहून वेदना, मदतीसाठी पुढाकार, मनसैनिकांना आवाहन
Embed widget