एक्स्प्लोर

लोकसंख्येनुसारच मिळायला हवं आरक्षण, ऐन निवडणुकीत नितीशकुमारांचं आरक्षणावर मोठं वक्तव्य

आरक्षण हे त्या त्या वर्गाच्या लोकसंख्येनुसारच मिळायला हवं असं नितीशकुमार बिहारमधल्या एका प्रचारसभेत म्हणाले आहेत.

नवी दिल्ली : बिहारमध्ये सत्ता टिकवण्याचं आव्हान ज्या नितीशकुमारांसमोर आहे ते आरक्षणाची फेरमांडणी करु इच्छित आहेत. देशातल्या आरक्षणव्यवस्थेबद्दल एक महत्वाचं आणि गंभीर विधान नितीशकुमार यांनी प्रचारसभेत केलं आहे. आरक्षण हे त्या त्या वर्गाच्या लोकसंख्येनुसारच मिळायला हवं असं नितीशकुमार बिहारमधल्या एका प्रचारसभेत म्हणाले आहेत.

जनगणना हा विषय राज्याच्या हातात नाही, पण लोकसंख्येनुसार आरक्षण असायला हवं ही आपली इच्छा असल्याचं नितीशकुमार म्हणाले आहेत. एखाद्या महत्वाच्या राजकीय नेत्यानं जाहीर व्यासपीठावर अशी मागणी करण्याची ही बहुदा पहिलीच वेळ असावी. बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातलं मतदान पार पडल्यानंतर नितीशकुमारांनी आरक्षणासारख्या संवेदनशील विषयाला हात घातलाय. बिहारच्या वाल्मिकीनगर इथल्या प्रचारसभेत बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

देशात जातनिहाय जनगणना हा राजकीयदृष्ट्या स्फोटक विषय बनलेला आहे. देशात 1931 ला शेवटची जातनिहाय जनगणना झाली होती. स्वातंत्र्यानंतरच्या जनगणनेत केवळ एससी, एसटी याच वर्गाचे स्वतंत्र रकाने जनगणनेत आहेत. पण इतर जातींचा जनगणनेत स्वतंत्र समावेश नाही. मात्र मंडल कमिशननंतर देशाच्या राजकारणानं जे वळण घेतलं त्यानंतर अनेक जातीय अस्मिता या राजकारणाच्या प्रवाहात तयार झाल्या आहेत. जातींची नेमकी गणना व्हावी यासाठी अनेक पक्ष मागणी करत आहेत.

बिहार, महाराष्ट्र आणि ओडिशा या तीन राज्यांनी 2021 ची जनगणना ही जातनिहाय व्हावी यासाठी विधानसभेत ठरावही मंजूर केले आहेत. नितीशकुमार यांचं ऐन निवडणुकीतलं हे विधान त्याच दृष्टीनं पाहिलं जातंय. बिहारसारख्या राज्यात जिथे जातीय समीकरणं निवडणुकीत खूप प्रभाव टाकणारी ठरतात तिथे नितीशकुमारांनी खेळलेला हा डाव किती यशस्वी होतो हेही पाहावं लागेल.

संबंधित बातम्या :

महत्त्वाच्या बातम्या

CJP Protest Delhi LIVE Updates: दिल्लीत जंतर-मंतरवर आज मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरोधात CJP चं आंदोलन, राजधानीला छावणीचं स्वरुप
CJP Protest Delhi LIVE Updates: दिल्लीत जंतर-मंतरवर आज मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरोधात CJP चं आंदोलन, राजधानीला छावणीचं स्वरुप
CJP Protest: दिल्लीत पोलिसांचा कडक पहारा, 75 रेल्वे रद्द, इंटरनेटही बंद; राजधानीत धडकण्यापूर्वी अभिजीत दिपके म्हणाले, 'जिथे अडवाल, तिथेच जंतर-मंतर...'
दिल्लीत पोलिसांचा कडक पहारा, 75 रेल्वे रद्द, इंटरनेटही बंद; राजधानीत धडकण्यापूर्वी अभिजीत दिपके म्हणाले, 'जिथे अडवाल, तिथेच जंतर-मंतर...'
CJP Delhi Protest Updates: ट्रेन्स रद्द, मेट्रो बंद, इंटरनेट सस्पेंड अन् राजधानीच्या सीमांवर BSFचा वेढा; CJP आंदोलनापूर्वी राजधानी दिल्लीला चोहीकडून घेरा, आंदोलकांना रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
ट्रेन्स रद्द, मेट्रो बंद, इंटरनेट सस्पेंड अन् राजधानीच्या सीमांवर BSFचा वेढा; CJP आंदोलनापूर्वी राजधानी दिल्लीला चोहीकडून घेरा, आंदोलकांना रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, त्याआधी करावं लागणार 'हे' महत्वाचं काम, अन्यथा लाभापासून राहालं वंचित
लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, त्याआधी करावं लागणार 'हे' महत्वाचं काम, अन्यथा लाभापासून राहालं वंचित

व्हिडीओ

Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP Delhi Protest Updates: ट्रेन्स रद्द, मेट्रो बंद, इंटरनेट सस्पेंड अन् राजधानीच्या सीमांवर BSFचा वेढा; CJP आंदोलनापूर्वी राजधानी दिल्लीला चोहीकडून घेरा, आंदोलकांना रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
ट्रेन्स रद्द, मेट्रो बंद, इंटरनेट सस्पेंड अन् राजधानीच्या सीमांवर BSFचा वेढा; CJP आंदोलनापूर्वी राजधानी दिल्लीला चोहीकडून घेरा, आंदोलकांना रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
Parinay Fuke : पालकमंत्र्यांसमोर रडत-रडत कैफियत मांडली, वैफल्यग्रस्त शेतकऱ्यानं दोनच दिवसात टोकाचं पाऊल उचललं; भंडाऱ्यातील सपाटे कुटुंबीयांचं सांत्वन करत परिणय फुकेंचा मदतीचा शब्द
पालकमंत्र्यांसमोर रडत-रडत कैफियत मांडली, वैफल्यग्रस्त शेतकऱ्यानं दोनच दिवसात टोकाचं पाऊल उचललं; भंडाऱ्यातील सपाटे कुटुंबीयांचं सांत्वन करत परिणय फुकेंचा मदतीचा शब्द
Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
Embed widget