एक्स्प्लोर

भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर पुन्हा चर्चेत, जागेवरुन विमानातील क्रू मेंबर्सशी वाद

भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर नव्या वादामुळे पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. विमानात जागेवरुन क्रू मेंबर्स आणि प्रवाशांसोबत वाद घातल्याचा त्यांचा व्हिडीओसमोर आला आहे.

भोपाळ : आपल्या वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. यावेळी स्पाईस जेटच्या विमानात प्रवासी आणि क्रू मेंबर्ससोबत जागेवरुन प्रज्ञा ठाकूर यांनी वाद घातल्याचं समोर आलं आहे. या सर्व गोंधळामुळे विमानाच्या उड्डाणाला उशीर झाल्याची माहिती स्पाईस जेट प्रशासनाने दिली. या घटनेचा व्हिडीओदेखील समोर आला असून हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी स्पाईस जेटच्या विमानात ए 1 ही सीट बूक केली होती. विमानातील पहिल्या रांगेतील सीट्स या इमरजन्सीसाठी असतात आणि या सीट्स केवळ शारीरिकदृष्ट्या सुदृढ असलेल्या प्रवाशांनाच दिल्या जातात. प्रज्ञा ठाकूर विमानात पोहोचल्या त्यावेळी त्या पहिल्या रांगेतील सीटवर बसल्या. मात्र क्रू मेंबर्सनी त्यांना आपली जागा बदलून 'नॉन इमरजन्सी' सीटवर बसण्यास सांगितलं. मात्र प्रज्ञा ठाकूर यांनी जागा बदलण्यास स्पष्ट नकार दिला आणि वाद घालण्यास सुरुवात केली.

प्रज्ञा सिंह ठाकूर आणि क्रू मेंबर्सच्या वादाचा विमानातील इतर प्रवाशांना विनाकारण त्रास सहन करावा लागला. यावेळी विमानातील एक प्रवासी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना समजवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. हा प्रवासी प्रज्ञा ठाकूर यांना तुम्ही खासदार आहात याची आठवण करुन देत होता आणि तुमच्यामुळे इतर प्रवाशांना त्रास होत असल्याचंही सांगत होता.

इतर प्रवासी समजावून सांगत असतानाही प्रज्ञा ठाकूर कुणाचंही ऐकूण घेण्यास तयार नव्हत्या. त्यांनी क्रू मेंबर्सकडे नियमांचं पुस्तक दाखवण्याची मागणी केली. यादरम्यान प्रज्ञा सिंह ठाकूर आणि क्रू मेंबर्समध्ये मोठा वाद झाला.

प्रज्ञा ठाकूर यांच्या वादासंबंधित बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

लोकशाही मार्गाने आंदोलन करु देणार नसाल तर जगायंच कसं? विद्यार्थ्यांसाठी मनोज जरांगे पाटील मैदानात, उद्या थेट दिल्ली गाठणार
लोकशाही मार्गाने आंदोलन करु देणार नसाल तर जगायंच कसं? विद्यार्थ्यांसाठी मनोज जरांगे पाटील मैदानात, उद्या थेट दिल्ली गाठणार
Uddhav Thackeray : एका राजीनाम्यानं चालणार नाही, व्यवस्था बदलावी लागेल, सरकार बदलत नाही तोपर्यंत आयुष्य बदलणार नाही : उद्धव ठाकरे
भाषण करायला नाही युवा शक्तीला नमन करायला आलोय, उद्धव ठाकरेंच्या जंतरमंतरवरील भाषणाला जोरदार प्रतिसाद
Priyanka Gandhi : धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, प्रियांका गांधी यांची ठाम मागणी, पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलनाचं कारण सांगितलं...
काँग्रेसनं मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन का केलं? दिल्ली पोलिसांनी सुटका करताच प्रियांका गांधी यांनी कारण सांगितलं
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचं दिल्लीत आंदोलन, राहुल गांधींसह महाराष्ट्रातील खासदारही पोलिसांच्या ताब्यात
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचं दिल्लीत आंदोलन, राहुल गांधींसह महाराष्ट्रातील खासदारही पोलिसांच्या ताब्यात

व्हिडीओ

Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं
Sandeep Deshpande:मोदींपेक्षा जास्त अहंकार अश्विनी भिडेंना; चेंबूर दुर्घटनेवरून संदीप देशपांडे भडकले
Sanjay Raut PC : 20 जुलै हा लोकशाहीतील 'डरपोक दिवस' म्हणून साजरा करा; संजय राऊत आक्रमक
Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam wangchuk: उद्धव ठाकरे जंतरमंतरवर, राज ठाकरे आझाद मैदानात; नीट पेपरफुटीवरुन ठाकरे बंधू थेट आंदोलनात, काँग्रेसंही रस्त्यावर
उद्धव ठाकरे जंतरमंतरवर, राज ठाकरे आझाद मैदानात; नीट पेपरफुटीवरुन ठाकरे बंधू थेट आंदोलनात, काँग्रेसंही रस्त्यावर
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचं दिल्लीत आंदोलन, राहुल गांधींसह महाराष्ट्रातील खासदारही पोलिसांच्या ताब्यात
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचं दिल्लीत आंदोलन, राहुल गांधींसह महाराष्ट्रातील खासदारही पोलिसांच्या ताब्यात
AI तंत्रज्ञानाच्या मदतीने अंधत्वावर मात; गडचिरोली जिल्हा परिषदेचा उपक्रम, 34 विद्यार्थ्यांच्या हाती अत्याधुनिक स्मार्ट उपकरणे
AI तंत्रज्ञानाच्या मदतीने अंधत्वावर मात; गडचिरोली जिल्हा परिषदेचा उपक्रम, 34 विद्यार्थ्यांच्या हाती अत्याधुनिक स्मार्ट उपकरणे
Uddhav Thackeray : एका राजीनाम्यानं चालणार नाही, व्यवस्था बदलावी लागेल, सरकार बदलत नाही तोपर्यंत आयुष्य बदलणार नाही : उद्धव ठाकरे
भाषण करायला नाही युवा शक्तीला नमन करायला आलोय, उद्धव ठाकरेंच्या जंतरमंतरवरील भाषणाला जोरदार प्रतिसाद
Rahul Gandhi : राहुल गांधींची नीट पेपरफुटीवरील संसदेतील चर्चेची मागणी मान्य, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर जितेंद्र सिंह नेमकं काय म्हणाले? 
राहुल गांधींची नीट पेपरफुटीवरील संसदेतील चर्चेची मागणी मान्य, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर जितेंद्र सिंह नेमकं काय म्हणाले? 
अमरावतीतून वारी, काठी टेकत आली 80 वर्षांची आजी; कलेक्टरांनी दिलं विठ्ठलाचं VIP दर्शन, पुंडलिकाची आठवण
अमरावतीतून वारी, काठी टेकत आली 80 वर्षांची आजी; कलेक्टरांनी दिलं विठ्ठलाचं VIP दर्शन, पुंडलिकाची आठवण
दिल्लीत नरेंद्र मोदींच्या घरासमोर राडा, पोलिसांनी राहुल गांधींना उचललं; प्रियंका गांधींसह माजी मुख्यमंत्रीही ताब्यात
दिल्लीत नरेंद्र मोदींच्या घरासमोर राडा, पोलिसांनी राहुल गांधींना उचललं; प्रियंका गांधींसह माजी मुख्यमंत्रीही ताब्यात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जुलै 2026 | मंगळवार
Embed widget