एक्स्प्लोर
परीक्षा आणि पालक-शिक्षक मीटिंग टाळण्यासाठी प्रद्युम्नची हत्या : सीबीआय
माझा मुलगा निर्दोष असून त्याला या प्रकरणात अडकवलं जात असल्याचा दावा विद्यार्थ्याच्या वडिलांनी केला आहे.
गुरुग्राम : हरियाणाच्या गुरुग्रामच्या रायन इंटरनॅशनल स्कूलमधील प्रद्युम्न हत्या प्रकरणाला नव वळण मिळालं आहे. परीक्षा आणि पालक-शिक्षक मीटिंग टाळण्यासाठी अकरावीच्या विद्यार्थ्याने प्रद्युम्न ठाकूरची हत्या केली, खळबळजनक माहिती सीबीआयने दिली आहे.
तसंच हत्येपूर्वी प्रद्युम्नवर लैंगिक अत्याचार झाला नसल्याचं स्पष्टीकरणही सीबआयने दिलं आहे.
सीबीआयने शाळेतीलच मंगळवारी रात्री अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला अटक केली असून त्याला आज दुपारीच बालन्यायलयात हजर केलं जाणार आहे. तर बस कंडक्टर अशोर कुमारला यापूर्वीच सीबीआयच्या कैदेत आहे.
प्रद्युम्नवर लैंगिक अत्याचार नाही : सीबीआय
परीक्षा आणि पालक-शिक्षिक मीटिंग टाळण्यासाठी अकरावीच्या विद्यार्थ्याने प्रद्युम्नची हत्या केली. पहिल्यांदा त्याने हत्यार खरेदी केलं आणि नंतर हत्या केली.
मात्र सीबीआयने कंडक्टर अशोक कुमारला क्लीट चिट दिलेली नाही. शिवाय प्रद्युम्नवर लैंगिक अत्याचार झाल्याचाही सीबीआयने इन्कार केला आहे.
परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारावर आरोपी विद्यार्थ्याला रात्री 11.20 वाजता ताब्यात घेण्यात आलं.
'माझा मुलगा निर्दोष'
माझा मुलगा निर्दोष असून त्याला या प्रकरणात अडकवलं जात असल्याचा दावा विद्यार्थ्याच्या वडिलांनी केला आहे. "माझ्या मुलानेच प्रद्युम्नच्या हत्येची माहिती सर्वात आधी शिक्षक आणि शाळेच्या माळ्याला माहिती दिली होती," असंही त्याच्या वडिलांनी सांगितलं.
"सीबीआयने मंगळवारी रात्री उशिरापर्यंत माझी आणि मुलाची चौकशी केली. त्यानंतर मुलाला ताब्यात घेतलं. सीबीआयने आधी पण त्याची चार-पाच वेळा चौकशी केली होती. शिवाय मुलाच्या स्कूलबॅगसह इतर सामानही जप्त केलं होतं. शिवाय गुरुग्राम पोलिसांनीही तपासादरम्यान सीआरपीसीचं कलम 164 अंतर्गत त्याचा जबाब नोंदवला आहे," असंही ते म्हणाले.
याविरोधात मी गुरुग्राम कोर्टात दाद मागण्याच्या तयारीत आहे, असंही विद्यार्थ्याच्या वडिलांनी सांगितलं.
काय आहे प्रकरण?
8 सप्टेंबर रोजी गुरुग्रामच्या रायन इंटरनॅशनल स्कूलच्या वॉशरुममध्ये प्रद्युम्न ठाकूरची गळा चिरुन हत्या करण्यात आली होती. दुसरीत शिकणाऱ्या सात वर्षीय विद्यार्थी प्रद्युम्न ठाकूरसोबत दुष्कृत्यचा प्रयत्न केल्यानंतर हत्या केली होती.
याप्रकरणी स्कूल बसचा कंडक्टर अशोक कुमारसह तीन जणांना पोलिसांनी अटक केली होती. त्यावेळी अशोक कुमारने हत्या केल्याची कबुली दिली होती. पण नंतर कोर्टात त्याने जबाब फिरवला. दबावात येऊन मी हत्या केल्याची कबुली दिली होती, असं अशोक कुमारने सांगितलं.
"माझ्या मुलाच्या हत्येमागे आणखी कोणाचातरी हात असू शकतो," असा संशय प्रद्युम्नच्या आई-वडिलांनी व्यक्त केला होता.
यानतंर हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी 15 सप्टेंबर रोजी या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला होता.
पिंटो कुटुंबाला अंतरिम जामीन!
या हत्याकांडानंतर अनेक दिवस शाळा बंद ठेवण्यात आली आहे. शिवाय सुरक्षा व्यवस्थेबाबत शाळा व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित झाले होते. रायन ग्रुपचे मालक पिंटो कुटुंबीयांना सुप्रीम कोर्टाकडून सोमवारी अंतरिम जामीन मिळाला आहे. शिवाय या प्रकरणात 10 दिवसा निर्णय घ्या, असे निर्देश पंजाब आणि हरियाणा कोर्टाला दिले होते.
संबंधित बातम्या
प्रद्युम्न हत्याकांड : चौकशीसाठी तीनजण सीबीआयच्या ताब्यात
प्रद्युम्न हत्या : शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती समोर
प्रद्युम्न हत्या : वडिलांची याचिका, सुप्रीम कोर्टाची हरियाणा सरकार, शाळेला नोटीसलैंगिक शोषणानंतर 7 वर्षांच्या मुलाची गळा चिरुन हत्या, बस कंडक्टर अटकेत
प्रद्युम्न हत्या : वडिलांची याचिका, सुप्रीम कोर्टाची हरियाणा सरकार, शाळेला नोटीस
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
सोलापूर
Advertisement