एक्स्प्लोर
Advertisement
नोटाबदलीसाठी डाक विभाग आता रुग्णालयांमध्ये
नवी दिल्ली : नोटाबंदीनंतर रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना होणारा त्रास पाहता डाक विभाग आता रुग्णालयांमध्ये जाऊन नोटा बदलून देत आहे. दिल्लीत डाक विभागाने रुग्णांच्या नातेवाईकांना जुन्या नोटा बदलून देण्यासाठी रुग्णालयामध्ये जाण्यास सुरुवात केली आहे.
रुग्णालयांमध्ये डाक विभागामार्फत आतापर्यंत 25 लाख रुपये बदलून देण्यात आले आहेत. रुग्णांच्या नातेवाईकांना एटीएम आणि बँकांच्या रांगेत उभं रहावं लागू नये, यासाठी डाक विभाग रुग्णालयांमध्ये जात आहे, अशी माहिती मुख्य महाडाकपाल एन. एम. शर्मा यांनी दिली.
रुग्णालयांमध्ये जाण्यासाठी डाक विभागाने विविध टीम बनवल्या असून दिल्लीतील अनेक मोठ्या रुग्णालयांमध्ये ही सुविधा सुरु झाली आहे, असं एन. एम. शर्मा यांनी सांगितलं.
डाक विभागाने वृद्धाश्रमांमध्ये जाण्यासही सुरुवात केल्याची माहिती डाक सेवा संचालक अभिषेक सिंह यांनी दिली. 30 डिसेंबरपर्यंत डाक विभाग रुग्णालय आणि हॉस्पिटलमध्ये जाणार आहे, असं सिंह यांनी सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement