एक्स्प्लोर

Andaman Nicobar Airport : 710 कोटींचा खर्च! वीर सावरकर विमानतळाचं नवं टर्मिनल, उद्या पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

PM Modi to inaugurate Port Blair Airport : पंतप्रधान मोदी मंगळवारी अंदमान-निकोबार बेटांमधील पोर्ट ब्लेअर येथील वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचं ऑनलाईन उद्घाटन करतील.

Veer Savarkar International Airport Inauguration : भारताच्या अंदमान-निकोबार बेटावरील पोर्ट ब्लेअर विमानतळावरील नवीन टर्मिनलचं पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते उद्धाटन पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी, 18 जुलै रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे पोर्ट ब्लेअरमधील वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचे उद्घाटन करणार आहेत. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया सकाळी 9 वाजता विमानतळावर पोहोचतील, तर दीड तासानंतर पंतप्रधान मोदी टर्मिनल इमारतीचे डिजिटल पद्धतीने उद्घाटन करतील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

अंदमान-निकोबारला जागतिक दर्जाच्या विमानतळाची भेट

पंतप्रधान कार्यालयाने (PMO) दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी मंगळवारी अंदमान-निकोबार बेटांमधील पोर्ट ब्लेअर येथील वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचं ऑनलाईन उद्घाटन करतील. सुमारे 710 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीमुळे अंदमान आणि निकोबारमधील कनेक्टिव्हिटीला चालना मिळेल. केंद्रशासित प्रदेश अंदमान निकोबारला जागतिक दर्जाच्या विमानतळाची भेट मिळणार आहे. यामुळे केंद्रशासित प्रदेशाचा संपर्क सुधारेल.

अंदमान निकोबारला जागतिक दर्जाच्या विमानतळाची भेट

हे पोर्ट ब्लेअर टर्मिनल बेट केंद्रशासित प्रदेशावर कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल. तसेच यामुळे स्थानिक लोकांसाठी रोजगारच्या नव्या संधीही निर्माण होतील. या प्रकल्पात एकूण 40,800 चौरस मीटर क्षेत्रात बांधकाम केले जाणार आहे. नवीन टर्मिनल इमारतीतून दरवर्षी अंदाजे 5 दशलक्ष प्रवाशांना सुविधा पुरवली जाईल. नवीन टर्मिनल सुरु झाल्यानंतर अंदमान आणि निकोबारमधील पर्यटनाला गती मिळेल यामुळे स्थानिक अर्थव्यवस्था बळकट होईल.

पोर्ट ब्लेअर टर्मिनलसाठी सुमारे 710 कोटींचा खर्च

पोर्ट ब्लेअर टर्मिनलसुमारे 710 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलं आहे. याशिवाय पोर्ट ब्लेअर विमानतळावर 80 कोटी रुपये खर्चून दोन बोईंग-767-400 आणि दोन एअरबस-321 प्रकारच्या विमानांसाठी उपयुक्त असलेले ऍप्रनही बांधण्यात आले आहेत. यानंतर आता या विमानतळावर एकावेळी 10 विमाने उभी करता येणार आहेत. अधिकृत निवेदनानुसार विमानतळ टर्मिनलची वास्तुशिल्प रचना निसर्गापासून प्रेरित आहे. हे नवं टर्मिनल शंखाच्या आकाराच्या संरचनेसारखं दिसतं. 

इतर महत्त्वाच्या बातम्या :

Jatayu Nature Park : जिथे रावणाने कापले जटायूचे पंख, तिथेच उभारली जगातील सर्वात मोठी पक्षाची मूर्ती; जटायू पार्कबाबत वाचा सविस्तर...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Khadse : भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी खडसे कुटुंबीयांचा दोषमुक्तीसाठी अर्ज, ईडीला उत्तर सादर करण्याचे कोर्टाचे निर्देश
भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी खडसे कुटुंबीयांचा दोषमुक्तीसाठी अर्ज, ईडीला उत्तर सादर करण्याचे कोर्टाचे निर्देश
यापेक्षा वाईट काय असेल... विराट कोहली पहिल्यांदाच उपांत्य सामन्यात फेल, विश्वचषकातही फ्लॉप 
यापेक्षा वाईट काय असेल... विराट कोहली पहिल्यांदाच उपांत्य सामन्यात फेल, विश्वचषकातही फ्लॉप 
Dombivli Crime : झोपेची गोळी न दिल्याने मेडिकल कर्मचाऱ्याला रॉडने मारहाण, डोंबिवलीतील घटना सीसीटीव्हीत कैद
झोपेची गोळी न दिल्याने मेडिकल कर्मचाऱ्याला रॉडने मारहाण, डोंबिवलीतील घटना सीसीटीव्हीत कैद
Baby John : बॉडी डबलचा वापर नाही, बेबी जॉन चित्रपटात वरुण धवनच्या ॲक्शनचा तडका, 'या' दिवशी होणार प्रदर्शित
बॉडी डबलचा वापर नाही, बेबी जॉन चित्रपटात वरुण धवनच्या ॲक्शनचा तडका, 'या' दिवशी होणार प्रदर्शित
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Farmers Crop Insurance Details : पिक विम्याचं गणित नेमकं काय? अभ्यासकांनी विम्याची ABCD सांगितलीABP Majha Marathi News Headlines 9 PM  27 June 2024 TOP HeadlinesLaxman Hake Beed Entry : लक्ष्मण हाकेंच्या स्वागतासाठी 11 जेसीबी! मुंडेंच्या परळीत वाजत गाजत स्वागतABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 27 June 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Khadse : भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी खडसे कुटुंबीयांचा दोषमुक्तीसाठी अर्ज, ईडीला उत्तर सादर करण्याचे कोर्टाचे निर्देश
भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी खडसे कुटुंबीयांचा दोषमुक्तीसाठी अर्ज, ईडीला उत्तर सादर करण्याचे कोर्टाचे निर्देश
यापेक्षा वाईट काय असेल... विराट कोहली पहिल्यांदाच उपांत्य सामन्यात फेल, विश्वचषकातही फ्लॉप 
यापेक्षा वाईट काय असेल... विराट कोहली पहिल्यांदाच उपांत्य सामन्यात फेल, विश्वचषकातही फ्लॉप 
Dombivli Crime : झोपेची गोळी न दिल्याने मेडिकल कर्मचाऱ्याला रॉडने मारहाण, डोंबिवलीतील घटना सीसीटीव्हीत कैद
झोपेची गोळी न दिल्याने मेडिकल कर्मचाऱ्याला रॉडने मारहाण, डोंबिवलीतील घटना सीसीटीव्हीत कैद
Baby John : बॉडी डबलचा वापर नाही, बेबी जॉन चित्रपटात वरुण धवनच्या ॲक्शनचा तडका, 'या' दिवशी होणार प्रदर्शित
बॉडी डबलचा वापर नाही, बेबी जॉन चित्रपटात वरुण धवनच्या ॲक्शनचा तडका, 'या' दिवशी होणार प्रदर्शित
IND vs ENG : नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या पारड्यात, भारतीय संघ प्रथम फलंदाजी करणार
IND vs ENG : नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या पारड्यात, भारतीय संघ प्रथम फलंदाजी करणार
मोठी बातमी! NEET च्या घोळाबाबत एप्रिलमध्येच NTA ला पत्र, पण कारवाईच नाही; लातूरच्या दिलीप देशमुखांचा मोठा दावा
मोठी बातमी! NEET च्या घोळाबाबत एप्रिलमध्येच NTA ला पत्र, पण कारवाईच नाही; लातूरच्या दिलीप देशमुखांचा मोठा दावा
Video : मी तर कपाळालाच हात लावला; अजित पवारांनी सांगितला आ. सुरेश धसांच्या दुसऱ्या लग्नाचा भन्नाट किस्सा
Video : मी तर कपाळालाच हात लावला; अजित पवारांनी सांगितला आ. सुरेश धसांच्या दुसऱ्या लग्नाचा भन्नाट किस्सा
Ajit Pawar: राष्ट्रवादी हा गुंडांचा पक्ष, पण...; वरिष्ठांनी कान टोचताच अजित पवारांना बाहेर काढा म्हणणाऱ्या भाजप कार्यकर्त्याचा यू-टर्न
राष्ट्रवादी हा गुंडांचा पक्ष, पण...; वरिष्ठांनी कान टोचताच अजित पवारांना बाहेर काढा म्हणणाऱ्या भाजप कार्यकर्त्याचा यू-टर्न
Embed widget