Elections 2022 : निवडणूक प्रचारावर कोरोनामुळे असलेले सर्व निर्बंध आता हटवण्यात आले आहे. कोरोना रुग्णांची संख्या घटत असल्याने निवडणूक आयोगाकडून सर्व निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. राजकीय सभांना पूर्वीप्रमाणे 50 टक्के उपस्थितीची मर्यादा हटवण्यात आली आहे. तसेच रोड शो ला देखील आता परवानगी देण्यात आले आहे.
दरम्यान कोरोनाच्या तिसऱ्या लाट सुरू असताना उत्तरप्रदेश, पंजाब, गोवा, मणिपूर विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली. पंजाब, गोवा आणि उत्तराखंडमध्ये मतदान झाले आहे. तर उत्तरप्रेदशात तीन टप्प्यात 172 जागांसाठी मतदान झाले आहे. चौथ्या टप्प्यासाठी बुधवारी मतदान होणार आहे. तर बाकी उर्वरित तीन टप्प्यांसाठी रोड शोचे आयोजन करण्यात आले आहे. उत्तरप्रदेशात सात टप्प्यामध्ये निवडणूक होणार आहे. मणीपूरमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान 28 फेब्रुवारी आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदान 5 मार्चला होणार आहे.
देशातील कोरोनाबाधितांची घटती प्रकरणं पाहून निवडणूक आयोगानं हा निर्णय घेतला आहे. देशात कोरोनाच्या साडेतील लाख रुग्णांची नोंद केली जात होती. अशातच आज हा आकडा घटला असून दररोज सुमारे 13 हजार कोरोनाबाधितांची नोंद केली जात आहे. त्यामुळे निर्बंधांमध्ये सूट देण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला आहे. प्रचार सभांसाठी आणि रॅलींसाठी निवडणूक आयोगानं पूर्ण सूट दिली आहे.
आयोगानं देशातील तसेच ज्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक आहे, त्या राज्यांमध्ये कोरोनाबाधितांमध्ये झालेली लक्षणीय घट झाल्याचं लक्षात घेतलं. वस्तुस्थिती आणि परिस्थितीच्या आधारावर, राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या निवडणुकीत अधिकाधिक सहभागाची गरज, आयोग पुढील रीतीने निवडणूक प्रचाराच्या तरतुदी तत्काळ प्रभावाने शिथिल करतो.
संबंधित बातम्या :