Elections 2022 Voting : सोमवारी उत्तर प्रदेशमधील दुसऱ्या टप्प्यातील तर गोवा आणि उत्तराखंडमधील सर्व जागांसाठी सोमवारी मतदान पार पडले आहे. गोव्यात मतदारांनी चुरशीने मतदान केलं आहे. तर उत्तरप्रदेश-उत्तराखंडमध्येही मतदारांमध्येही उत्साह दिसून आला.  दिवसभरात गोव्यात 78.94 टक्के मतदान झाले. 2017 च्या तुलनेत गोव्यात तीन टक्के मतदान कमी झाले आहे. उत्तर प्रदेशमध्ये 62.22 टक्के मतदान पार पडले तर उत्तराखंडमध्ये 62.5 टक्के मतदान झाले आहे.

  


उत्तर प्रदेशमध्ये कुठे किती मतदान पार पडले - 
अमरोहा - 66.15%
बरेली - 57.68%
बिजनौर - 61.44%
बदायूं - 55.98%
मुरादाबाद - 64.52%
रामपुर - 60.10%
सहारनपूर - 67.05%
संभल - 56.88%
शाहजहांपूर - 55.20%


उत्तराखंडमध्ये किती झाले मतदान -  
अल्मोडा - 50.65 टक्के
बागेश्वर - 57.83 टक्के
चमोली - 59.28 टक्के
चंपावत- 56.97 टक्के
देहरादून - 52.93 टक्के
हरिद्वार - 67.58 टक्के
नैनीताल - 63.12 टक्के
पौडी गढवार - 51.93 टक्के
पिथौरागढ़ - 57.49 टक्के
रुद्रप्रयाग - 60.36 टक्के
टिहरी गढवाल - 52.66 टक्के
उधम सिंह नगर - 65.13 टक्के
उत्तरकाशी - 65.55 टक्के





तिन्ही राज्यांमध्ये 165 जागांसाठी मतदान 
सोमवारी उत्तर प्रदेशमधील दुसऱ्या टप्प्यातील तर उत्तराखंड आणि गोव्यातील सर्व विधानसभा जागांसाठी मतदान होत आहे. तिन्ही राज्यात मिळून आज एकूण 165 जागांसाठी मतदान झाले. यासाठी 1 हजार 519 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यूपीमधील 55 विधानसभा जागांसाठी 586 उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेत तर, उत्तराखंडमध्ये 70 जागांसाठी 632 आणि गोव्यातील 40 जागांसाठी 301 उमेदवार रिंगणात आहेत. यूपीमध्ये आज एकूण 2.2 कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्याचबरोबर गोव्यात 11 लाख आणि उत्तराखंडमध्ये 81 लाख 43 हजार 922 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.


 उत्तराखंडमध्ये 100 वर्षाच्या वृद्धाने बजावला मतदानाचा हक्क
उत्तराखंडमध्ये एका 100 वर्षाच्या वृद्धाने मतदानाचा हक्क बजावला आहे. सहसपुर विधानसभा मतदारसंघात त्यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. लाल बहादुर असे त्या 100 वर्षीय वृद्धाचे नाव आहे. सशक्त लोकशाहीसाठी सर्वांनी मतदान करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले आहे.