पंतप्रधान नरेंद्र मोदींना खरंच नोबेल शांतता पुरस्कार मिळणार? जाणून घ्या काय आहे व्हायरल बातमीचे सत्य
PM Narendra Modi up for Nobel Peace Prize 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळणार असल्याच्या बातम्या व्हायरल होत आहेत.
PM Narendra Modi up for Nobel Peace Prize 2023 : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याशी संबंधित एक बातमी सध्या खूप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार ( Nobel Peace Prize 2023 ) दिला जाऊ शकतो असे म्हटले जात आहे. व्हायरल बातम्यांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, नोबेल पारितोषिक समितीचे उपनेते अस्ले तोजे म्हणाले की, "पीएम मोदी या पुरस्काराचे सर्वोच्च दावेदार आहेत. तसे झाले तर ही भारतासाठी अभिमानाची बाब असेल."
व्हायरल झालेल्या बातम्यांनुसार, अस्ले टोजे म्हणतात की. "पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज जगातील शांततेचा सर्वात विश्वासार्ह चेहरा आहेत. शिवाय मी स्वतःला मोदींचा मोठा चाहता आहे." या बातमीत असेही म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक विश्वासार्ह नेते आहेत. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध थांबवून मोदीच शांतता प्रस्थापित करण्यास सक्षम आहेत."
अस्ले तोजे हे नोबेल समितीचे उपनेते आहेत. ही समिती नोबेल शांतता पुरस्कार विजेत्याची निवड करते. अस्ले टोजे हे व्यवसायाने लेखक-विचारवंत आहेत. त्यांनी जर्मनी, फ्रान्स, बेल्जियम, इंग्लंड आणि यूएस येथेही काम केले आहे. केंब्रिज विद्यापीठातून त्यांनी पीएचडी केली.
काय आहे या व्हायरल बातमीचे सत्य?
नोबेल शांतता पारितोषिक समितीच्या सदस्यांनी अस्ले तोजे यांनी माध्यमांना दिलेल्या बाइट्स 'बूम लाईव्ह'ने पाहिल्या. परंतु, अस्ले तोजे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नोबेल शांतता पुरस्काराचा दावेदार म्हणून कुठेही उल्लेख केलेला नाही. यावरून हे स्पष्ट होते की नोबेल शांतता पुरस्कार समितीचे सदस्य अस्ले तोजे यांचे चुकीचे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहे. त्यांनी पंतप्रधान मोदी हे नोबेल शांतता पुरस्काराचे मोठे दावेदार असल्याचे कुठेही म्हटले नाही. बूम लाईव्हने या व्हायरल बातम्यांचे फॅक्टचेक केले आहे. त्यामुळे बूम लाईव्हच्या वृत्तानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींना नोबेल शांतता पुरस्कार मिळण्यासंदर्भातील बातम्या खोट्या असल्याचे समोर आले आहे.
शांतता प्रस्थापित करणाऱ्याला नोबेल शांतता पुरस्कार दिला जातो
जगात शांतता राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या व्यक्तीला दरवर्षी शांततेचा नोबेल पुरस्कार दिला जातो. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना 2009 मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला होता आणि 2014 मध्ये भारताचे कैलाश सत्यार्थी यांना हा पुरस्कार मिळाला होता.
व्हिडीओ पाहा