PM Modi: विरोधकांचं 'इंडिया' गठबंधन नाही, तर 'घमंडिया' गठबंधन; विरोधकांच्या आघाडीला PM मोदींचा टोला
Narendra Modi Speech: अविश्वास प्रस्तावावर सुरू असलेल्या लोकसभेतील भाषणादरम्यान पंतप्रंधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस आणि विरोधकांच्या आघाडीवर जोरदार निशाणा साधला आहे.
PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) लोकसभेत विरोधकांच्या इंडिया आघाडीवर जोरदार निशाणा साधला आहे. विरोधकांनी इंडियाचे (I.N.D.I.A) तुकडे केले, असं म्हणत मोदींनी विरोधकांच्या इंडिया आघाडीवर टीका केली आहे. तर विरोधकांचं 'इंडिया' गठबंधन नाही, तर ते 'घमंडिया' गठबंधन असल्याचंही पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.
विरोधकांच्या आघाडीत सर्वांना पंतप्रधान व्हायचंय - मोदी
विरोधकांच्या आघाडीत एकी राहणार नाही, असं मोदी म्हणाले. विरोधकांच्या आघाडीत सर्वांना पंतप्रधान व्हायचं असल्याचंही मोदींनी म्हटलं. विरोधकांचं हे इंडिया गठबंधन नसून ते घमंडिया गठबंधन आहे, असंही मोदी म्हणाले. विरोधकांची घमंडिया आघाडी म्हणजे घराणेशाहीचं उदाहरण असल्याचंही मोदी म्हणाले. काँग्रेसला घराणेशाही आवडते, मोठ्या पदांवर त्यांच्याच घरातले लोक असल्याचं म्हणत मोदींनी काँग्रेसवर देखील टीका केली आहे.
विरोधकांच्या आघाडीला NDAचा आधार घ्यावा लागेल - मोदी
देशाचं नाव वापरुन जनतेचा विश्वास मिळेल, असं विरोधकांना वाटलं. नाव बदलून सत्ता येईल, असं विरोधकांना वाटत असल्याचं मोदी म्हणाले. पण विरोधकांच्या आघाडीला NDAचा आधार घ्यावा लागेल, असं म्हणत मोदींनी विरोधकांच्या आघाडीवर टीका केली आहे.
काँग्रेसच्या घराणेशाहीमुळे जनतेचं नुकसान - मोदी
काँग्रेसच्या घराणेशाहीने अनेकांचे अधिकार हिरावल्याचं मोदींनी म्हटलं आहे. आंबेडकरांना काँग्रेसने दोन वेळा पराभूत केल्याचं मोदी म्हणाले. तर काँग्रेसच्या घराणेशाहीमुळे जनतेचं नुकसान होत असल्याचंही त्यांनी म्हटलं. काँग्रेसकडे नीती, नियत, दूरदृष्टी नसल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले. काँग्रेसने देशात गरिबी वाढवली आणि त्यामुळे देश कंगाल झाल्याचंही मोदींनी म्हटलं आहे.
भारताला बदनाम करायला विरोधकांना आवडतं - मोदी
भारताच्या विरोधातील सर्व गोष्टींवर विरोधकांचा विश्वास असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले. भारताला बदनाम करायला विरोधकांना आवडत असल्याचं मोदींनी म्हटलं आहे. विरोधकांना भारतीय सेनेवर विश्वास नव्हता, पाकिस्तान जे बोलेल त्यावर विरोधक विश्वास ठेवत असल्याचं मोदी म्हणाले. विरोधकांचं पाकिस्तानवर जास्त प्रेम असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
फिल्डींग विरोधकांची, बॅटींग सत्ताधाऱ्यांची - पंतप्रधान मोदी
विरोधक तयारी करुन येत नाहीत का? असा प्रश्न नरेंद्र मोदींनी विचारला आहे, पाच वर्ष देऊनही विरोधकांनी तयारी केली नसल्याचं मोदींनी म्हटलंय. तर फिल्डींग विरोधकांची असली तरी बॅटींग सत्ताधारी करत असल्याचा टोला देखील मोदींनी लगावला आहे. विरोधकांसाठी देशापेक्षा पक्ष महत्त्वाचा असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. विरोधकांना गरिबांच्या भुकेची चिंता नाही, तर त्यांना फक्त सत्तेची भूक असल्याचंही मोदी म्हणाले आहेत.
ज्यांचे स्वत:चे हिशोब बिघडले, ते आमच्याकडे हिशोब मागतायत - मोदी
इतके वर्ष सत्तेत राहूनही काँग्रेस अनुभवशून्य असल्याचं मोदींनी म्हटलं. तर ज्यांचे स्वत:चे हिशोब बिघडले आहेत, ते आमच्याकडे हिशोब मागतायत, असं म्हणत मोदींनी टोलाही लगावला.
हेही वाचा: