(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटक दौऱ्यावर, जंगल सफारीसाठी केला खास लूक
PM Narendra Modi in Karnataka : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज (9 एप्रिल) कर्नाटक (Karnataka) दौऱ्यावर आहेत. ते आज व्याघ्र प्रकल्पाला भेट देणार आहेत. त्यासाठी त्यांनी खास लूक केला आहे.
PM Narendra Modi Safari Look : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज (9 एप्रिल) कर्नाटक (Karnataka) दौऱ्यावर आहेत. ते आज बांदीपूर नॅशनल पार्कसह (Bandipur National Park) मुदुमलाई व्याघ्र प्रकल्पाला भेट देणार आहेत. ते कर्नाटकला रवाना झाले आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये त्यांनी जंगल सफारीसाठी खास लूक केला आहे. या नव्या लूकमध्ये पंतप्रधानांनी काळी टोपी, खाकी पँट, प्रिंटेड टी-शर्ट आणि काळे शूज यासह एका हातात स्लीव्हलेस जॅकेट दिसत आहे.
PM @narendramodi is on the way to the Bandipur and Mudumalai Tiger Reserves. pic.twitter.com/tpPYgnoahl
— PMO India (@PMOIndia) April 9, 2023
पंतप्रधानांच्या हस्ते व्याघ्र गणनेच्या अहवालाचे प्रकाशन होणार
म्हैसूरमधील 'प्रोजेक्ट टायगर'ला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटक दौऱ्यावर आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्याघ्र गणनेच्या अहवालाचे प्रकाशन केलं जाणार आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदी प्रथम चामराजनगर (Chamarajanagar) जिल्ह्यातील बांदीपूर व्याघ्र प्रकल्पाला भेट देतील. यावेळी पंतप्रधान व्याघ्र संवर्धन कार्यात सहभागी असलेल्या फ्रंटलाइन फील्ड स्टाफ आणि स्वयं-सहायता गटांशी संवाद साधणार आहेत. तसेच मुदुमलाई व्याघ्र प्रकल्पातील थेप्पाकडू येथील हत्ती कॅम्पलाही पंतप्रधान भेट देणार आहेत.
#WATCH | Prime Minister Narendra Modi arrives at Bandipur Tiger Reserve in Karnataka pic.twitter.com/Gvr7xpZzug
— ANI (@ANI) April 9, 2023
प्रोजेक्ट टायगरला आज 50 वर्ष पूर्ण
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज कर्नाटकमधल्या बंदीपूर अभयारण्याला भेट देत आहेत. 1973 मध्ये इंदिरा गांधींच्या काळात सुरु झालेल्या प्रोजेक्ट टायगरला आज पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त पंतप्रधान मोदी या व्याघ्र प्रकल्पाला भेट देत आहेत. दरम्यान, कर्नाटकमध्ये सध्या आचारसंहिता असल्यानं ते जाहीर कार्यक्रम करणार नाहीत.
महत्त्वाच्या बातम्या: