PM Modi costume Republic Day 2022 : पंतप्रधान मोदींचे 'मिशन इलेक्शन'?; प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात उत्तराखंडची टोपी आणि मणिपूरचे उपरणं
PM Narendra Modi costume Republic Day 2022 : 73 व्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडमध्ये वापरत असलेली पारंपारिक टोपी परिधान केली आहे.
PM Narendra Modi costume Republic Day 2022 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 73 व्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी उत्तराखंडमध्ये वापरत असलेली पारंपारिक टोपी परिधान केली आहे. पंतप्रधान मोदी यांना ब्रह्मकमळ जास्त आवडते. त्यामुळे त्यांनी ब्रह्मकमळाच्या आकाराचा मास्क घातला आहे. ब्रम्हकमळ हे उत्तराखंडचे राज्य फूल असून केदारनाथमध्ये पूजा करताना हे फुल वापरतात. याशिवाय पंतप्रधान मोदी यांनी गळ्यात मणिपूरमध्ये वापरत असलेला स्टोल घातला आहे. नरेंद्र मोदी यांनी यंदा पांढऱ्या कुर्त्यावर ग्रे रंगाचं जॅकेट परिधान केलं आहे.
दरम्यान, आगामी उत्तराखंड आणि मणिपूर विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेथील पारंपारिक पोशाखाची प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी निवड केल्याचे पाहायला मिळाले.
आज 73 व्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात सहभागी होण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी सकाळी नव्याने बांधलेल्या राष्ट्रीय युद्ध स्मारक (NWM) येथे शहीद सैनिकांना आदरांजली वाहिली.
गतवर्षी नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या जामनगरची खास पगडी परिधान केली होती. जामनगरच्या राजघराण्याकडून त्यांना ही पगडी भेट म्हणून दिली होती. मोदी दरवर्षी प्रजासत्ताक दिनाला वेगवेगळ्या पगडी किंवा फेटा परिधान केल्याचे दिसतात. 2020 मध्ये त्यांनी बांधणीचा फेटा बांधला होता. केशरी रंगाच्या या फेट्यात पिवळा रंगही होता. 2015 पासून आतापर्यंतच्या प्रत्येक प्रजासत्ताक दिनाला मोदींनी खास प्रकारच्या पगडी किंवा फेटा परिधान केल्याचं दिसलं होतं. प्रजासत्ताक दिनी राजपथावरील परेड जेवढी चर्चेत असते तेवढाच मोदींचा लूकही चर्चेत राहिला आहे.
73 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. दिल्लीतील राजपथावर आज भारतीय संस्कृती आणि संरक्षण सामर्थ्याचं दर्शन घडणार आहे. याबरोबरच एक हजार ड्रोन्स आणि राफेलसह 75 लढाऊ विमानांच्या कसरती होणार आहेत.
महत्वाच्या बातम्या
- Republic Day 2022 Google Doodle भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त गुगलचे खास डुडल; भारतीयांना दिल्या शुभेच्छा
- Republic Day 2022 : 73 वा प्रजासत्ताक दिन चिरायू होवो! कार्यक्रमाची रुपरेषा जाणून घ्या...
- President Kovind Speech: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला राष्ट्रपती कोविंद यांनी केलं देशाला संबोधित
- Padma Awards : 128 जणांना पद्म पुरस्कार जाहीर; जनरल बिपीन रावत यांना मरणोत्तर पद्मविभूषण