एक्स्प्लोर

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत खलबतं

मराठा आरक्षण मुद्द्यावर राजधानी दिल्लीत हालचालींना वेग आला आहे. आज संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली.

नवी दिल्ली : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजधानी दिल्लीत हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज संध्याकाळी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. यावेळी महाराष्ट्रातील विविध प्रश्नांबाबत मोदींना माहिती दिल्याचं ट्विट मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. दोघांमध्ये जवळपास दीड तास चर्चा झाली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान मोदी यांच्यातील चर्चेनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंच्या निवासस्थानी मुख्यमंत्री, भाजप अध्यक्ष अमित शाह आणि भाजप खासदारांची बैठक पार पडली. या बैठकीत मराठा आरक्षणासंदर्भात महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, मराठा आंदोलनाबाबत राज्यातील सर्व पोलिस अधीक्षकांना मुख्यमंत्र्यांनी पत्र जारी केलं आहे. आंदोलनातील गुन्ह्यांची माहिती कळवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले असून चौकशीनंतर हे गुन्हे मागे घेतले जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. गेली दोन वर्षे शांततेत मूक मोर्चे काढणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाने आता ‘ठोक मोर्चे’ सुरु केले आणि यातून मराठा समाज आक्रमक झालेला पाहायला मिळाला.

आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यातील काही ठिकाणी मराठा समाज आक्रमकही झाला. त्यामुळे राजकीय वर्तुळासह सरकारी पातळीवरील हालचालीही वेगवान झाल्या. त्यानंतर विरोधी पक्षांसह सरकार दरबारीही बैठकांवर बैठका होऊ लागल्या.

मराठा समाजाला शांतता बाळगण्याच्या आश्वासनासह आरक्षणासाठी कटिबद्ध असल्याचेही सरकारकडून सांगण्यात आले. मात्र तरीही आंदोलन सुरु आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आज नेमकी काय भूमिका मांडणार, हे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

सौरव दास आणि आशुतोष रांकांनी कोठडीच्या मुदतवाढीला आव्हान देणारी याचिका हायकोर्टातून माघार घेतली; अटींचे उल्लंघन केल्याचे न्यायालयाकडून नमूद
सौरव दास आणि आशुतोष रांकांनी कोठडीच्या मुदतवाढीला आव्हान देणारी याचिका हायकोर्टातून माघार घेतली; अटींचे उल्लंघन केल्याचे न्यायालयाकडून नमूद
'दसरा' मेळाव्यात शिवसेना नेत्याकंडून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवण्याचा संकल्प; भाजपाकडून पहिली प्रतिक्रिया
'दसरा' मेळाव्यात शिवसेना नेत्याकंडून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवण्याचा संकल्प; भाजपाकडून पहिली प्रतिक्रिया
Nagpur Crime: तब्बल 11 दिवसांपासून पोलिसांना गुंगारा, अखेर शिवा शर्मा हत्याकांडातील मुख्य सूत्रधार श्रद्धा दुबेला नागपुरात अटक, बहीण अन् ड्रॉयव्हरलाही बेड्या, नेमकं प्रकरण काय?
तब्बल 11 दिवसांपासून पोलिसांना गुंगारा, अखेर शिवा शर्मा हत्याकांडातील मुख्य सूत्रधार मॉडेल श्रद्धा दुबेला नागपुरात अटक, बहीण अन् ड्रॉयव्हरलाही बेड्या, नेमकं प्रकरण काय?
साखरेच्या दराचा ग्राहकांना चटका! तब्बल 21 राज्यात साखरेच्या दरात 30 टक्क्यांची वाढ, सध्याचा दर काय?
साखरेच्या दराचा ग्राहकांना चटका! तब्बल 21 राज्यात साखरेच्या दरात 30 टक्क्यांची वाढ, सध्याचा दर काय?

व्हिडीओ

Manoj Jarange On Eknath Shinde : एकनाथ शिंदेंवर 500 कोटी घेतल्याचा आरोप, जरांगे पाटील पुरावा देणार
Beed Manoj Jarange Full Speech : शिंदेंवर '५०० कोटीं'चा बॉम्ब, शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी
Uddhav Thackeray Dasara Melava 2026 UNCUT Speech : भारत मातेला जाग आली आहे... अच्छे दिन आयेंगे
Eknath Shinde Dasara Melava Speech UNCUT | पत्रकार विचारतात ऑपरेशन 3.0 कधी? एकनाथ शिंदे UNCUT
Gokul Election 2026: 3 मंत्री, 2 खासदार, 10 आमदारांचं चक्रव्यूह कसं भेदलं?,सतेज पाटील यांनी A टू Z सांगितलं!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Mahadik: गोकुळमध्ये फोडाफोडीचे राजकारण करणार नाही, आम्ही विरोधात बसणार; धनंजय महाडिकांची स्पष्टोक्ती, शौमिकांच्या पराभवावर काय म्हणाले?
गोकुळमध्ये फोडाफोडीचे राजकारण करणार नाही, आम्ही विरोधात बसणार; धनंजय महाडिकांची स्पष्टोक्ती, शौमिकांच्या पराभवावर काय म्हणाले?
Vivekanand Patil MPSC Protest : पक्ष प्रवक्तेपदाच्या अनेक ऑफर्स नाकारल्या, विवेकानंद पाटलांना राजकीय पक्षांचं बोलावणं, राजकीय एंट्रीवर थेट भाष्य
पक्ष प्रवक्तेपदाच्या अनेक ऑफर्स नाकारल्या, विवेकानंद पाटलांना राजकीय पक्षांचं बोलावणं, राजकीय एंट्रीवर थेट भाष्य
सौरव दास आणि आशुतोष रांकांनी कोठडीच्या मुदतवाढीला आव्हान देणारी याचिका हायकोर्टातून माघार घेतली; अटींचे उल्लंघन केल्याचे न्यायालयाकडून नमूद
सौरव दास आणि आशुतोष रांकांनी कोठडीच्या मुदतवाढीला आव्हान देणारी याचिका हायकोर्टातून माघार घेतली; अटींचे उल्लंघन केल्याचे न्यायालयाकडून नमूद
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार नाहीत, गुणरत्न सदावर्तेंचं वक्तव्य; टायगर श्रॉफच्या भेटीवरूनही उपमुख्यमंत्र्यांवर टीका
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार नाहीत, गुणरत्न सदावर्तेंचं वक्तव्य; टायगर श्रॉफच्या भेटीवरूनही उपमुख्यमंत्र्यांवर टीका
Jitendra Awhad Pune Crime : सिक्युरिटी सुपरवायझर; पुण्यात भाड्याच्या घरात वास्तव्य, जितेंद्र आव्हाडांना मारण्याची धमकी, मालकानं टीव्ही पाहिल्यानंतर पोलिस ठाण्यात नेलं अन्...
सिक्युरिटी सुपरवायझर; पुण्यात भाड्याच्या घरात वास्तव्य, जितेंद्र आव्हाडांना मारण्याची धमकी, मालकानं टीव्ही पाहिल्यानंतर पोलिस ठाण्यात नेलं अन्...
Sangli Bank Election: सांगली जिल्हा बँकेत बिनविरोधाच्या हालचाली वाढल्या; भाजप नेते झेडपी अध्यक्षांच्या बंगल्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भेटीला
सांगली जिल्हा बँकेत बिनविरोधाच्या हालचाली वाढल्या; भाजप नेते झेडपी अध्यक्षांच्या बंगल्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भेटीला
'दसरा' मेळाव्यात शिवसेना नेत्याकंडून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवण्याचा संकल्प; भाजपाकडून पहिली प्रतिक्रिया
'दसरा' मेळाव्यात शिवसेना नेत्याकंडून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवण्याचा संकल्प; भाजपाकडून पहिली प्रतिक्रिया
Satara Bank Election: सातारा जिल्हा बँकेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला, दोन हॉटेलमध्ये स्वतंत्र बैठकांचा जोर; कोणाला किती जागा अन् किती जागांवर निवडणूक लागणार?
सातारा जिल्हा बँकेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला, दोन हॉटेलमध्ये स्वतंत्र बैठकांचा जोर; कोणाला किती जागा अन् किती जागांवर निवडणूक लागणार?
Embed widget