एक्स्प्लोर
पंतप्रधान नरेंद्र मोदीच 'अतुल्य भारत'चे ब्रँण्ड अॅम्बेसिडर?
नवी दिल्ली: पर्यटन विभागाच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच 'अतुल्य भारत'चा ब्रँण्ड अॅम्बेसिडर करण्याच्या हलचाली सुरु आहेत. त्यासाठी पर्यटन मंत्रालयाने 'अतुल्य भारत'साठी कोणाच्याही नावाची घोषणा न करण्याचा निर्णय घेतला आहे.
तसेच पर्यटन विभाग यासाठी गुजरात पर्यटनच्या धर्तीवर एक डझनहून अधिक प्रमोशनल फिल्म बनवणार आहेत.
नुकत्याच केंद्र सरकारच्या पर्यटन विभागाच्या मार्केटिंग टीमने दिलेल्या आहवालात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्या देशांचा दौरा केला, त्या देशांतून पर्यटकांची संख्या वाढली असल्याचे म्हटले आहे.
त्यामुळे पर्यटन मंत्रालयाने आता इतर कोणाही व्यक्तीच्या नावाला 'अतुल्य भारत'चा ब्रँण्ड अॅम्बेसिडर म्हणून घोषित न करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदीच अतुल्य भारतचा नवा चेहरा असतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement