एक्स्प्लोर

Pm Modi : पंतप्रधान मोदींकडून पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचे अभिनंदन, म्हणाले...

भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी आज पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. भगवंत मान यांच्या शपथविधी सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Modi) यांनी ट्विट करून त्यांचे अभिनंदन केले आहे.

Pm Modi : भगवंत मान  (Bhagwant Mann) यांनी आज पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. भगवंत मान यांच्या शपथविधी सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून त्यांचे अभिनंदन केले आहे. "पंजाबच्या विकासासाठी एकत्र काम करण्याचे आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्विटमधून भगवंत मान यांना दिले आहे. 

पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी शहीद भगत सिंग यांच्या खटकरकलान या गावी भगवंत मान यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मान यांनी यावेळी पंजाबी भाषेत शपथ घेतली.  

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर भगवंत मान यांनी हे सरकार सर्व पंजाबच्या जनतेचे असल्याचे सांगितले.  "ज्यांनी आम्हाला मतदान केले नाही त्यांचेही हे सरकार आहे. शहीद भगतसिंग यांना देश स्वतंत्र कसा होईल, याची चिंता नव्हती. परंतु, स्वातंत्र्यानंतर देश कसा असेल? याची त्यांना चिंता होती, असे भगवंत मान यांनी यावेळी म्हटले आहे. 

दरम्यान, आज शपथ घेण्यापूर्वी भगवंत मान यांनी एक ट्विट केले आहे. सूर्याची सोनेरी किरणे आज नवी पहाट घेऊन आली आहेत. शहीद भगतसिंग आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी संपूर्ण पंजाब आज खटकरकलान या गावात शपथ घेणार आहे, असे ट्वीट भगवंत मान यांनी केले आहे. 

या शपथविधी सोहळ्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह आम आदमी पक्षाचे अनेक नेते उपस्थित होते. 'आप'ने पंजाब विधानसभा निवडणुकीत 117 पैकी 92 जागा जिंकून आपले सरकार स्थापन केले आहे.  

महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

मुख्यमंत्र्यांसह शरद पवारांच्या उपस्थितीत सीमाप्रश्नावर बैठक, राणेंचीही हजेरी; बैठकीत काय ठरलं, कोर्टाच्या लढाईचा निर्धार
मुख्यमंत्र्यांसह शरद पवारांच्या उपस्थितीत सीमाप्रश्नावर बैठक, राणेंचीही हजेरी; बैठकीत काय ठरलं, कोर्टाच्या लढाईचा निर्धार
Weather Update: सुरतच्या रस्त्यांवर गाड्या तरंगू लागल्या, फ्लाय ओव्हर सुद्धा तुंबले, दिल्ली-जयपूर महामार्ग सुद्धा खचला, 10 किमी वाहतूक कोंडी
सुरतच्या रस्त्यांवर गाड्या तरंगू लागल्या, फ्लाय ओव्हर सुद्धा तुंबले, दिल्ली-जयपूर महामार्ग सुद्धा खचला, 10 किमी वाहतूक कोंडी
Amit Shah and Devendra Fadnavis: अमित शाह- देवेंद्र फडणवीसांची बंद दाराआड चर्चा, दोन महत्त्वाच्या गोष्टींबाबत चर्चा, दिल्लीत काय घडलं?
अमित शाह- देवेंद्र फडणवीसांची बंद दाराआड चर्चा, दोन महत्त्वाच्या गोष्टींबाबत चर्चा, दिल्लीत काय घडलं?
बालविवाह प्रतिबंधक आणि पोक्सो कायदा सर्वांना समान लागू; मुस्लिम पर्सनल लॉ केंद्रीय कायद्यापेक्षा मोठा नाही; अलाहाबाद हायकोर्टाचा स्पष्ट निर्वाळा
बालविवाह प्रतिबंधक आणि पोक्सो कायदा सर्वांना समान लागू; मुस्लिम पर्सनल लॉ केंद्रीय कायद्यापेक्षा मोठा नाही; अलाहाबाद हायकोर्टाचा स्पष्ट निर्वाळा

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
Gold Rate : सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण, सोनं 1733 रुपयांनी तर चांदी 5659 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर
सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण, सोनं 1733 रुपयांनी तर चांदी 5659 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर
'इंद्रायणी' काठी देवाची आळंदी... नदीच्या पुरामुळे मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत माऊलींच्या पालखीचे प्रस्थान
'इंद्रायणी' काठी देवाची आळंदी... नदीच्या पुरामुळे मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत माऊलींच्या पालखीचे प्रस्थान
मुख्यमंत्र्यांसह शरद पवारांच्या उपस्थितीत सीमाप्रश्नावर बैठक, राणेंचीही हजेरी; बैठकीत काय ठरलं, कोर्टाच्या लढाईचा निर्धार
मुख्यमंत्र्यांसह शरद पवारांच्या उपस्थितीत सीमाप्रश्नावर बैठक, राणेंचीही हजेरी; बैठकीत काय ठरलं, कोर्टाच्या लढाईचा निर्धार
शरद पवार प्रदीर्घ कालावधीनंतर विधानभवनात पोहोचले, उपमुख्यमंत्री शिंदे कॅबिनेट सोडून थेट भेटीला
शरद पवार प्रदीर्घ कालावधीनंतर विधानभवनात पोहोचले, उपमुख्यमंत्री शिंदे कॅबिनेट सोडून थेट भेटीला
'इराणसोबत हंगामी युद्धबंदी संपली..' एकाचवेळी शक्तीशाली 80 हल्ल्यानंतर ट्रम्प यांच्या वक्तव्याने जगाला पुन्हा धडकी भरली, इराणच्या तेल विक्रीला परवानगी देणारा परवाना सुद्धा रद्द
'इराणसोबत हंगामी युद्धबंदी संपली..' एकाचवेळी शक्तीशाली 80 हल्ल्यानंतर ट्रम्प यांच्या वक्तव्याने जगाला पुन्हा धडकी भरली, इराणच्या तेल विक्रीला परवानगी देणारा परवाना सुद्धा रद्द
US Iran War : अमेरिकेचा इराणवर क्षेपणास्त्र हल्ला, भारतात शेअर मार्केट क्रॅश, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे दर भडकले, पुन्हा युद्धाचं संकट 
अमेरिकेचा इराणवर क्षेपणास्त्र हल्ला, क्रूड ऑईलच्या दरात पुन्हा वाढ सुरु, जगावर युद्धाचं पुन्हा संकट?
Embed widget