एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
... आणि मोदींनी 'त्या' कर्मचाऱ्याला रोखलं!
उत्तरांचल : कार्यकर्त्याने किंवा कर्मचाऱ्याने एखाद्या नेत्याची चप्पल काढल्याचे किंवा चप्पल उचलून घेतल्याचे प्रकार बऱ्याचदा दिसतात. नेते मंडळीही अशा प्रकारांना विरोध करताना दिसत नाही. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी याला अपवाद ठरले आहेत.
उत्तराखंड दौऱ्यादरम्यान मोदींनी एका कर्मचाऱ्याला आपल्या पायातील शूज काढण्यापासून थांबवलं आणि स्वतःच शूज काढला. त्यामुळे मोदींच्या उत्तराखंड दौऱ्यात या घटनेची सर्वत्र चर्चा रंगली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिरात दर्शनासाठी आले होते. त्यावेळीस ही घटना घडली.
केदारनाथाचं दर्शन घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिले भाविक ठरले. मोदींनी केदारनाथच्या मंदिरात पोहोचून रुद्राभिषेक केला. केदारनाथाचं दर्शन घेतल्यानंतर मोदींनी भाविकांशीही संवाद साधला. मोदींसोबत सेल्फी घेण्यासाठी यावेळी भाविकांचीही चांगलीच झुंबड उडाली होती.
मोदी देशातील पहिले पंतप्रधान आहेत, ज्यांच्या दर्शनानंतर केदारनाथचं दर्शन सर्वसामान्य भाविकांसाठी खुलं झालं. महाप्रलयाच्या 3 वर्षानंतर पहिल्यांदाच केदारनाथमध्ये इतका जंगी सोहळा झाला.
पंतप्रधान झाल्यापासून पहिल्यांदाच मोदी केदारधामला पोहोचले. या आधी पंतप्रधान इंदिरा गांधी केदारधामला गेल्या होत्या.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
निवडणूक
करमणूक
निवडणूक
Advertisement