PM modi security Lapse : पंतप्रधानांच्या सुरक्षेवरून राजकारण नको, दोषींवर कारवाई करा; सोनिया गांधींची पंजाबच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा
चरणजीत सिंह चन्नी यांनी सोनिया गांधी यांना घटनेची पूर्ण माहिती दिली. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधानांच्या सुरक्षेवरून मग भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोप रंगले. तर दौऱ्यामध्ये सुरक्षेची कोणतीही त्रुटी नव्हती, असे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी म्हणाले. दरम्यान कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री चन्नी यांच्यासोबत यावर चर्चा केली आणि दोषींवर कारवाई करण्यास सांगितले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना सुरक्षेच्या कारणास्तव त्यांचा पंजाब दौरा रद्द करावा लागला याविषयी सोनिया गांधी यांनी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह यांच्याशी विस्तृत चर्चा केली. सोनिया गांधी म्हणाल्या, पंतप्रधान हे संपूर्ण देशाचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षतेची पूर्ण काळजी घेणे गरजेचे होती. पंतप्रधानांना पूर्ण सुरक्षाव्यवस्था पुरवणे गरजेचे आहे. दोषींवर कारवाई झाली पाहिजे. चरणजीत सिंह चन्नी यांनी सोनिया गांधी यांना घटनेची पूर्ण माहिती दिली. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहे.
पंतप्रधानांच्या सुरक्षेमध्ये कोणतीही त्रुटी नव्हती - चन्नी
मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी म्हणाले की, "पंतप्रधानांच्या हेलिकॉप्टरचा दौरा नियोजित होता. पण अखेरच्या क्षणी त्यांनी गाडीने जाण्याचं नियोजन केलं. त्यामुळे पंतप्रधानांच्या सुरक्षेमध्ये कोणतीही त्रुटी नव्हती. पंतप्रधानांच्या कार्यक्रमात 70 हजार खुर्च्या होत्या. पण केवळ 700 लोकच उपस्थित होते."
केंद्रीय गृहमंत्रालयाने झापलं
दरम्यान, आज घडलेल्या या गंभीर घटनेची दखल घेत केंद्रीय गृहमंत्रालयानं पंजाब सरकारला खरमरीत पत्रही लिहिलंय. या प्रकाराची तात्काळ चौकशी करुन यात कुठे उणीवा झाल्या, कोण दोषी याचा तात्काळ अहवाल द्या असंही बजावण्यात आलंय.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- Security Of Pm Narendra Modi : फक्त पंतप्रधान मोदींनाच SPG सुरक्षा? एका दिवसाच्या सुरक्षेचा खर्च किती?
- PM Modi : पंतप्रधानांच्या सुरक्षेत पोलिसांकडूनच चूक? पोलिसांनी आंदोलकांना मार्गाची माहिती लीक केल्याचा दावा
- Punjab : सभेला गर्दी न जमल्याने पंतप्रधानांचा दौरा रद्द, पंजाबने भाजपच्या अहंकाराला आरसा दाखवला; काँग्रेसचे भाजपला प्रत्युत्तर