एक्स्प्लोर

पंतप्रधान मोदींकडून विद्यापीठांना दिवाळी गिफ्ट!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पाटणा विद्यापीठाच्या शतकमहोत्सावात कार्यक्रमात सहभागी झाले. या कार्यक्रमात बोलताना, त्यांनी जगातल्या टॉप 500 विद्यापीठांच्या यादीत देशातील कोणत्याही विद्यापीठाचं नाव नसल्याबद्दल खंत व्यक्त केली. तसेच हे चित्र बदलण्यासाठी देशातील निवडक 20 विद्यापीठांसाठी 10 हजार कोटी देण्याची घोषणा केली.

पाटणा : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पाटणा विद्यापीठाच्या शतकमहोत्सावात कार्यक्रमात सहभागी झाले. या कार्यक्रमात बोलताना, त्यांनी जगातल्या टॉप 500 विद्यापीठांच्या यादीत देशातील कोणत्याही विद्यापीठाचं नाव नसल्याबद्दल खंत व्यक्त केली. तसेच हे चित्र बदलण्यासाठी देशातील निवडक 20 विद्यापीठांसाठी 10 हजार कोटी देण्याची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “केंद्र सरकारने त्रयस्थ संस्थेद्वारे निकष पडताळणी करुन, समोर आलेल्या देशातल्या टॉप 20 विद्यापीठांना सरकारी बंधनातून मुक्तता करेल. तसेच त्या विद्यापीठांना आगामी पाच वर्षात वर्ल्ड क्लास विद्यापीठ बनवण्यासाठी 10 हजाराचे आर्थिक सहाय्यही देईल. यात खासगी 10 आणि सरकारी 10 विद्यापीठांचा समावेश असेल.” पंतप्रधानांनी यावेळी पाटणा विद्यापीठाला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा देण्याच्या बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या मागणीचाही आपल्या भाषणात आवर्जून उल्लेख केला. ते म्हणाले की, “केंद्रीय विद्यापीठ हा भूतकाळ होता. मी त्याऐवजी भविष्याचा विचार करत आहे. आणि त्याचच निमंत्रण देण्यासाठी या कार्यक्रमाला उपस्थित आहे.” मोदी पुढे म्हणाले की, “आपल्या देशात शिक्षण क्षेत्राचा विकास कासव गतीने होत आहे. तसेच आपल्या शिक्षण पद्धतीतही अनेक मतभेद आहेत. त्यामुळेच शिक्षण क्षेत्रातील विशेष करुन उच्च शिक्षणातील बदलांमध्ये आपलं सरकार कुचकामी ठरत आहेत.” शिक्षण विभागातील बदलांसदर्भात केंद्र सरकारच्या पुढाकरांबद्दल माहिती देताना मोदी म्हणाले की, “केंद्र सरकारने शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदलांसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यासाठी पहिल्यांदाच आयआयएमसारख्या संस्थांना सरकारच्या नियंत्रणातून मुक्त करुन प्रोफेशनल पद्धतीनं काम करण्याचं स्वातंत्र्य दिलं. पाटणा विद्यापीठालाही अशाच प्रकारे स्वायत्त काम करण्यासाठी त्याबाबतचं निमंत्रण देण्यासाठी आज इथं उपस्थित आहे. केंद्र सरकारने देशातील विद्यापीठांसाठी एक नवीन योजना तयार केली आहे.” पंतप्रधान पुढे म्हणाले की, “ज्या भूमीवर नालंदा, विक्रमशिला, तक्षशिला सारखी 1300 ते 1700 वर्ष जुनी विद्यापीठे आहेत. आणि ही साऱ्या जगाला आकर्षित करत आहेत. तरीही जगातल्या टॉप 500 विद्यापीठांमध्ये भारतातील एकाही विद्यापीठाचा समावेश नाही. आपल्याला ही ओळख पुसली पाहिजे. त्यासाठी केंद्र सरकार एकूण 20 निवडक विद्यापीठांना वर्ल्ड क्लास बनवण्यासाठी केंद्र सरकार आर्थिक सहाय्य देईल.” या विद्यापीठांच्या निवडीबद्दल सांगताना मोदी पुढं म्हणाले की, “या विद्यापीठांची निवड कोणत्याही राजकीय नेत्याच्या, किंवा पंतप्रधानांच्या इच्छेप्रमाणे आणि मुख्यमंत्र्यांच्या पत्राद्वारे होणार नाही. तर एखाद्या त्रयस्थ संस्थेकडून विद्यापीठाच्या निकषाची पडताळणी करुनच, टॉप 10 सरकारी विद्यापीठ आणि टॉप 10 खासगी विद्यापीठांची निवड होईल.” पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, “पटना विद्यापीठाला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा देण्यापेक्षा, त्याची क्षमता मोठी आहे. पटना विद्यापीठाकडे ही सर्वात मोठी संधी आहे. या संधीचं पाटना विद्यापीठाने सोनं केलं पाहिजे. आणि याचंच निमंत्रण देण्यासाठी मी आज या कार्यक्रमाला उपस्थित झालो आहे.”
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Horoscope Today 16 November 2024 : आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis : आपल्यालाही मतांचं धर्मयुद्ध लढावं लागेलMahayuti CM Special Report : शर्यतीतून फडणवीसांची माघार;महायुतीचा मुख्यमंत्री कोण ?ABP Majha Headlines :  7 AM : 16 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  16 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Horoscope Today 16 November 2024 : आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Astrology : आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 4 राशींना होणार अपार धनलाभ, नशिबाला लागणार चार चाँद
आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 4 राशींना होणार अपार धनलाभ, नशिबाला लागणार चार चाँद
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Embed widget