Coronavirus and Omicron in India : दिवसागणिक कोरोनाबाधितांची संख्या झपाट्यानं वाढतेय. काल दिवसभरात तब्बल 1 लाख 59 हजार 632 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. देशभरातल्या कोरोनास्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या (Narendra Modi) अध्यक्षतेखाली दुपारी साडे चार वाजता महत्त्वाच्या बैठकीचं आयोजन (PM Modi's Meeting on Corona) करण्यात आलं आहे. या बैठकीनंतर केंद्रीय पातळीवर कोणते निर्णय घेतले जातात, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि  केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीया (Mansukh Mandaviya) देखील सहभागी होणार आहेत. 


बैठकीला कुणा-कुणाची उपस्थिती? 


सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील कोरोना स्थितीचा अधिकारी आणि मंत्र्यांकडून आढावा घेणार आहेत. त्यासोबतच कोरोना लसीकरणावरही चर्चा करणार आहेत. या बैठकीत अमित शाह आणि मनसुख मांडविया यांच्याव्यतिरिक्त कॅबिनेट सचिव राजीव गावा, गृह सचिव अजय भल्ला, आरोग्य सचिव राजेश भूषण, आयसीएमआर चे डीजी आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. 


पाहा व्हिडीओ : पंतप्रधान मोदींनी तातडीने बोलावली बैठक, कोरोना स्थितीचा आढावा घेणार



आतापर्यंत 4 लाख 83 हजार 790 मृत्यू 


केंद्रीय आरोग्य मंत्रायानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, या महामारीत जीव गमावणाऱ्यांचा आकडा वाढून 4 लाख 83 हजार 790 वर पोहोचला आहे. आकडेवारीनुसार, काल (शनिवारी) 40 हजार 863 रुग्ण कोरोनामुक्त झाले होते. ज्यानंतर आतापर्यंत 3 कोटी 44 लाख 53 हजार 603 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या वाढून आतापर्यंत 5 लाख 90 हजार 611 वर पोहोचली आहे. 


ओमायक्रॉननं वाढवली देशाची चिंता


जगासह देशात कोरोनाचा प्रादुर्भाव (Coronavirus) वाढतानाच दिसत आहे. सध्या देशात कोरोनाचा घातक व्हेरियंट ओमायक्रॉन (Omicron Variant) धुमाकूळ घालत आहे. ओमायक्रॉननं देशाची चिंता वाढवली आहे. देशात आतापर्यंत 27 राज्यांमध्ये ओमायक्रॉननं हातपाय पसरले असून एकूण 3623 ओमायक्रॉनबाधित आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकड्यानुसार, आतापर्यंत देशात कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉननं 1409 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, या व्हेरियंटमुळं आतापर्यंत देशात दोन मृत्यूची नोंद झाली आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह