Omicron in India Latest Update : जगासह देशात कोरोनाचा प्रादुर्भाव (Coronavirus) वाढतानाच दिसत आहे. सध्या देशात कोरोनाचा घातक व्हेरियंट ओमायक्रॉन (Omicron Variant) धुमाकूळ घालत आहे. ओमायक्रॉननं देशाची चिंता वाढवली आहे. देशात आतापर्यंत 27 राज्यांमध्ये ओमायक्रॉननं हातपाय पसरले असून एकूण 3623 ओमायक्रॉनबाधित आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकड्यानुसार, आतापर्यंत देशात कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉननं 1409 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, या व्हेरियंटमुळं आतापर्यंत देशात दोन मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत ओमायक्रॉननं देशात किती लोकांना आपल्या जाळ्यात ओढलं आहे आणि सध्याची देशाची स्थिती काय जाणून घेऊया सविस्तर... 

देशातील ओमायक्रॉनची सद्यस्थिती : 

    • एकूण ओमायक्रॉनबाधित : 3623
    • एकूण ओमायक्रॉनमुक्त : 1409 रुग्ण 
    • एकूण राज्य : 27 
    • ओमायक्रॉनमुळं मृत्यू : 02

कोणत्या राज्यात किती ओमायक्रॉनबाधित

राज्य ओमायक्रॉनबाधित रुग्ण  ओमायक्रॉनमुक्त रुग्ण 
महाराष्ट्र  1009 439
दिल्ली 513 57
कर्नाटक  441 26
राजस्थान 373 208
केरळ 333 93
गुजरात  204 160
तेलंगणा 123 47
तामिळनाडू 185 185
हरियाणा 123 92
ओदिशा 60 05
उत्तर प्रदेश 113 06
पश्चिम बंगाल 27 10
गोवा  19 19
आसाम 09 09
मध्यप्रदेश 09 09
उत्तराखंड  08 05
आंध्रप्रदेश 28 09
मेघालय 04 03
अंदमान-निकोबार  03 00
चंदीगढ 03 03
जम्मू-काश्मिर 03 03
पद्दुचेरी  02 02
छत्तीसगढ  01 00
पंजाब  27 16
हिमाचल  01 01
लडाख 01 01
मणिपूर  01 01

गेल्या 24 तासात देशात 1 लाख 59 हजार 632 नवे कोरोनाबाधित

देशातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात देशात 1 लाख 59 हजार 632 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. देशात गेल्या 24 तासांत 327 कोरोनारुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेसमोरील आव्हान दिवसागणिक वाढत आहे. देशात सध्या एकूण 5 लाख 90 हजार 611 सक्रीय रुग्ण आहेत. आतापर्यंत देशात 3 कोटी 44 लाख 53 हजार 603 कोरोनामुक्त झाले आहेत. तर कोरोनाबळींची संख्या 4 लाख 83 हजार 790 इतकी झाली आहे. सध्या रुग्णावाढीचा दर 10.21 आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह