Kisan Kalyan Event Highlights: नव्या कृषि कायद्यांनी केलेल्या कृषि सुधारणाचं श्रेय हवं तर तुम्ही घ्या, पण शेतकऱ्यांना फसवू नका : पंतप्रधान मोदी
काँग्रेसवर निशाणा साधत पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मध्य प्रदेशात काँग्रेसचे सरकार स्थापन झाल्यानंतर कितीतरी बहाणे सांगण्यात आले. मध्य प्रदेशातील हे शेतकरी माझ्यापेक्षा जास्त जाणतात. राजस्थानातील कोट्यवधी शेतकरीही आजवर कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत.
नवी दिल्ली : कृषि कायद्याविरोधात राजीधानी दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मध्य प्रदेशमधील शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी शेतकरी कल्याण कार्यक्रमास संबोधित केले. यावेळी नव्या कृषि कायद्यांनी केलेल्या कृषि सुधारणाचं श्रेय हवं तर तुम्ही घ्या, पण शेतकऱ्यांना फसवू नका, अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेस सरकारवर केली. मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांचे गारपीट, नैसर्गिक आपत्तीमुळे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. आज या कार्यक्रमात राज्यातील 35 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 1600 कोटी रुपये पाठविण्यात आले आहेत.
पीएम मोदी म्हणाले, "आमचे सरकार एमएसपीबद्दल इतके गंभीर आहे की प्रत्येक वेळी आम्ही पेरणीपूर्वी एमएसपीची घोषणा करतो. स्वामीनाथन समितीच्या अहवालाची अंमलबजावणी करण्याचे काम आमच्या सरकारने केले आहे. जर आम्हाला एमएसपी हटवायची असते तर स्वामीनाथन समितीचा अहवाल का लागू केला असता? मागील सरकारने पाच वर्षात शेतकऱ्यांकडून सुमारे 1700 लाख मेट्रिक टन धान्य खरेदी केली होती. आमच्या सरकारने एमएसपीत पाच वर्षात 3,000 लाख मेट्रिक टन धान्य खरेदी केली आहे."
काँग्रेस वर पंतप्रधान मोदींचा अहवाल
पंतप्रधान मोदी यांनी शेतकऱ्यांना संबोधित करताना काँग्रेसवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, "काँग्रेस सरकारांनी केलेली कर्जमाफी ही आपल्या देशातील शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आल्याचं मोठं उदाहरण आहे. 2 वर्षांपूर्वी मध्य प्रदेशात निवडणुका होणार होत्या तेव्हा 10 दिवसांत कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आले होते. किती शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले?"
पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मला सर्व राजकीय पक्षांना सांगायचे आहे की तुम्ही नव्या कृषि कायद्यांनी केलेल्या कृषि सुधारणाचं श्रेय हवं तर तुम्ही घ्या, पण शेतकऱ्यांना फसवू नका. मला शेतकऱ्यांच्या जीवनात सहजता हवी आहे, समृद्धी हवी आहे, शेतीत आधुनिकता हवी आहे. कृपया शेतकऱ्यांची दिशाभूल करू नका. अचानक गोंधळ आणि खोटेपणाचं जाळं ठेवून आपली राजकीय जमीन नांगरण्याचा खेळ खेळला जात आहे. शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून हल्ला होत आहे.
पंतप्रधान पुढे म्हणाले, 'शेतकर्यांबद्दल सहानुभूती दाखवणारे लोक किती निर्दयी आहेत याचा स्वामीनाथन समितीचा अहवाल हा एक उत्तम पुरावा आहे. या लोकांनी स्वामीनाथन समितीच्या शिफारशी 8 वर्ष दाबून ठेवल्या होत्या. शेतकरी आंदोलन करायचा, निषेध करायचा पण या लोकांच्या पोटाचे पाणी हलले नाही. मात्र, आमचे सरकार शेतकर्यांना समर्पित आहे. फायलींच्या ढिगाऱ्यात टाकलेल्या स्वामिनाथन समितीचा अहवाल आम्ही काढून घेतला आणि त्यातील शिफारशी लागू केल्या. शेतकऱ्यांना दीडपट खर्चाचा एमएसपी दिला.
PM Modi Addresses Farmers | राजकारणासाठी शेतकऱ्यांचा वापर, पंतप्रधानांचा विरोधकांवर निशाणा