PM Modi In Gujarat : पंतप्रधान मोदींच्या गुजरात दौऱ्याचा आज दुसरा दिवस, 'या' कार्यक्रमांना लावणार हजेरी
PM Modi In Gujarat : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी रात्री त्यांनी आई हिराबेन यांची भेट घेतली.
PM Modi In Gujarat : देशातील चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. त्यांनी शुक्रवारी अहमदाबादमध्ये रोड शो केला. पंतप्रधान मोदींनी अहमदाबाद विमानतळ ते भाजप कार्यालय 'कमलम'पर्यंत असा 10 किमी लांबीचा रोड शो केला. यानंतर त्यांनी गुजरात पंचायत महासंमेलनाला संबोधित केले. तसेच पंतप्रधान मोदी यांनी गांधीनगरमध्ये आई हिराबेन यांची भेट घेतली. मोदींची आईसोबत दोन वर्षांनंतर भेट झाली. यावेळी त्यांनी पहिल्यांदा आईचे आशीर्वाद घेतले आणि एकत्र जेवणाचा आस्वाद घेतला.
पंतप्रधान मोदींचा आजचा कार्यक्रम
आज पंतप्रधान मोदी दीक्षांत समारंभाला उपस्थित राहण्यासाठी राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठात पोहोचणार आहेत. दुपारी 1 वाजता ते राजभवनात परततील, त्यानंतर ते अहमदाबादच्या नवरंगपुरा भागातील सरदार पटेल स्टेडियममध्ये सायंकाळी 6 ते 8 या वेळेत खेळ महाकुंभाच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहतील. यानंतर, रात्री 8.30 वाजता पंतप्रधान मोदी विशेष विमानाने दिल्लीला रवाना होतील.
पंतप्रधान मोदींचे वेळापत्रक
- सकाळी 10 वाजता : रक्षा शक्ती विद्यापीठ परिसर, दहेगाम गावाकडे प्रस्थान
- सकाळी 11 वाजता : रक्षाशक्ती विद्यापीठात आगमन, स्वागत
- सकाळी 11.15 वाजता : रक्षा शक्ती विद्यापीठाच्या नवीन कॅम्पसचा उद्घाटन समारंभ
- दुपारी 1 वाजता : राजभवनात परतणार
- सायं. 6 वाजता : अहमदाबादच्या नवरंगपुरा येथील सरदार पटेल स्टेडियममध्ये 11व्या खेल महाकुंभाच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार
- रात्री 8 वाजता : स्टेडियम ते विमानतळाकडे प्रस्थान
- रात्री 8.30 वाजता : अहमदाबादहून विशेष विमानाने नवी दिल्लीकडे उड्डाण
पंतप्रधानांनी केला 10 किमी लांबीचा रोड शो
पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी गुजरातमध्ये रोड शो केला, ज्यामध्ये मोदी फुलांच्या हारांनी सजवलेल्या कारमध्ये भगव्या रंगाची टोपी घातलेले दिसले. रोड शो दरम्यान, मोदींनी रस्त्याच्या दुतर्फा जमलेल्या शेकडो समर्थक आणि चाहत्यांना हात हलवून अभिवादन केले. विमानतळापासून सुरू झालेला हा रोड शो 10 किमी अंतरावर असलेल्या गांधीनगर येथील भाजपचे राज्य मुख्यालय कमलम येथे संपला.
या रोड शो दरम्यान गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी.आर. पाटील हे पंतप्रधान मोदींसोबत उपस्थित होते. या वर्षी डिसेंबरमध्ये होणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या प्रचाराची सुरुवात म्हणून या रोड शोकडे पाहिले जात आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- PM Modi Gujrat Visit : आईची भेट अन् जेवणाचा आस्वाद...., पंतप्रधानांच्या गुजरात दौऱ्याचे खास क्षण
- Election Result 2022 : भाजपच्या विजयानंतर PM मोदी आणि CM योगींचे आंतरराष्ट्रीय मीडियावर वर्चस्व! पाकिस्तानी मिडिया म्हणते...
- Narendra Modi: काही लोकांकडून केंद्रीय तपास यंत्रणांवर दबाव आणण्याचा प्रयत्न, पण भ्रष्टाचाराविरोधातील ही लढाई सुरूच राहणार: नरेंद्र मोदी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha