(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PM Modi Celebrate Diwali With Soldiers : सर्जिकल स्ट्राइकमध्ये नौशेरा ब्रिगेडची महत्त्वाची भूमिका; पंतप्रधान मोदींचा दिवाळीनिमित्त जवानांशी संवाद
PM Modi Diwali Celebrations : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जम्मू काश्मीरच्या नौशेरामध्ये भारतीय जवानांसोबत दिवाळी साजरी केली. त्यावेळी त्यांनी जवानांना संबोधित केलं.
PM Modi Diwali Celebrations : पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू काश्मीरच्या नौशेरामध्ये जवानांसोबत दिवाळी साजरी करत आहे. त्यावेळी पंतप्रधान मोदींनी जवानांना संबोधित केलं. त्यावेळी मोदी म्हणाले की, मी एक कुटुंबातील सदस्य म्हणून आलोय आणि 130 कोटी भारतीयांच्या शुभेच्छा घेऊन आलोय. पुढे बोलताना ते म्हणाले की, तुमच्याकडून मी एक नवी ऊर्जा घेऊन जाणार आहे. देशाची सेवा करण्याचं सौभाग्य सर्वांना नाही मिळत. तुमच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून मला असं वाटतंय की, तुम्ही दृढ निश्चयानं भरलेले आहात आणि हा निश्चय आणि पराक्रमाचा आत्मा भारत मातेचं संरक्षण कवच आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, जेव्हा मी नौशेराच्या धरतीवर उतरलो, त्यावेळी मन रोमांचानं भरुन गेलं. ते म्हणाले की, येथील वर्तमान तुमच्यासारख्या वीर जवानांच्या वीरतेचं जीवंत उदाहरण आहे. ते म्हणाले की, नौशेराच्या वाघांनी नेहमीच शत्रुला चोख उत्तर दिलंय. सर्जिकल स्ट्राइकमध्ये नौशेराच्या जवानांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. पंतप्रधान मोदी म्हणाले की, नौशेराच्या भूमीवर किती वीरांनी आपल्या रक्तानं आणि परिश्रमानं शौर्याची गाथा लिहिली आहे.
पंतप्रधान म्हणाले की, सर्जिकल स्ट्राइकमध्ये नौशेराच्या ब्रिगेडनं भूमिका निभावली आहे, त्यामुळे प्रत्येक देशवासियांच्या मनात अभिमान आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, सर्जिकल स्टाइकनंतर येथे अशांती पसरवण्याचे अनेक प्रयत्न झाले. परंतु, प्रत्येक वेळी दहशतवादाला चोख प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. असं म्हटलं जातं की, पांडवांनी काही वेळ इथेच वास्तव्य केलं होतं. सध्या देश स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी साजरी करत आहे. अनेकांनी देशासाठी बलिदान दिल्यानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवात आपल्या समोर नवीन लक्ष्य आणि नवी आव्हानं आहेत."
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय लष्कराच्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली. मोदी आज काश्मीरच्या नौशेरा इंथ दाखल झाले होते. दरम्यान लष्कर प्रमुख एम.एम.नरवणे हेही मोदींसोबत होते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :