एक्स्प्लोर

PM Kisan Yojana:पीएम किसान योजनेचे 1364 कोटी रुपये बोगस लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा, माहिती अधिकारातून उघड

पीएम किसान योजनेतील (PM Kisan Yojana) 1364 कोटी रुपये इतकी मोठी रक्कम ही बोगस लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झाल्याचं माहितीच्या अधिकारातून (RTI) उघड झालंय. यामध्ये सर्वाधिक बोगस लाभार्थी पंजाब (Punjab) या राज्यातील असून महाराष्ट्राचा (Maharashtra) तिसरा क्रमांक लागतोय.

नवी दिल्ली: पंतप्रधान किसान सन्मान निधी योजने अंतर्गत 20.48 लाख बोगस लाभार्थ्यांच्या खात्यावर 1,364 कोटी रुपये जमा करण्यात आल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आलीय. केंद्रीय कृषी मंत्रालयाने एका माहिती अधिकाराच्या अर्जाला उत्तर देताना ही माहिती दिलीय.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची सुरुवात केंद्र सरकारने 2019 साली केली होती. या अंतर्गत दोन हेक्टरपेक्षा कमी शेती असलेल्या लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना वर्षाला प्रत्येकी दोन हजार रुपयांचे तीन हप्ते देण्यात येतात. हे पैसे कोणत्या अयोग्य किंवा बोगस लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत या संबंधी एक माहितीच्या अधिकाराचा अर्ज केंद्रीय कृषी मंत्रालयाकडे करण्यात आला होता. कॉमनवेल्थ ह्यूमन राइट्स इनिशिएटिव्ह या संस्थेशी संबंधीत असलेल्या वेंकटेश नायक यांनी ही माहिती केंद्र सरकाकडे मागितली होती.

पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या बोगस लाभार्थ्यांविरोधात कारवाईचा बडगा

या माहितीच्या अधिकाराच्या अर्जाला उत्तर देताना केंद्रीय कृषी मंत्रालयाने सांगितले की अशा अयोग्य किंवा बोगस लाभार्थ्यांची दोन श्रेणी करण्यात आल्या आहेत. एक श्रेणी म्हणजे योजनेच्या अटी पूर्ण न करणारे शेतकरी आणि दुसरी म्हणजे आयकर भरणारे शेतकरी. या दुसऱ्या श्रेणीतील शेतकऱ्यांची संख्या ही 55.58 टक्के इतकी आहे.

नायक यांनी सांगितलं की त्या व्यतिरिक्त 44.41 टक्के असे शेतकरी आहेत की जे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी असलेले नियम आणि अटी पूर्ण करत नाहीत. त्यांनी असेही सांगितले की माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार अशा बोगस लाभार्थ्यांना देण्यात आलेल्या रक्कमेची वसूली केंद्र सरकारने सुरु केली आहे.

नांदेडमध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा बोजवारा, लाभार्थी शेतकऱ्यांना पैसे परत करण्याचे निर्देश

व्यंकटेश नायक यांनी असं सांगितलं की 2019 साली सुरु करण्यात आलेल्या या योजनेच्या माध्यमातून जुलै 2020 पर्यंत अशा बोगस लाभार्थ्यांच्या खात्यावर 1,364 कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे. सरकारच्या या आकडेवारीमधून स्पष्ट होतंय की या योजनेची मोठी रक्कम चुकीच्या लोकांच्या खात्यावर गेली आहे.

पंजाबमध्ये सर्वाधिक बोगस लाभार्थी पंजाब, आसाम, महाराष्ट्र, गुजरात आणि उत्तर प्रदेश या पाच राज्यात बोगस लाभार्थ्यांची संख्या सर्वाधिक असल्याची माहिती या माहिती अधिकारातून उघड झाली आहे.

पंजाबमध्ये सर्वाधिक बोगस लाभार्थी असून त्यांची संख्या देशातील एकूण बोगस लाभार्थ्यांपैकी 23.6 टक्के म्हणजे 4.74 लाख इतकी आहे. त्यानंतर 16.8 टक्के म्हणजे 3.45 बोगस लाभार्थी हे आसाम या राज्यातील आहेत. यामध्ये 13.99 टक्के लाभार्थी म्हणजे 2.86 लाख बोगस लाभार्थी हे महाराष्ट्रातले आहेत. या तीन राज्यांतील बोगस लाभार्थ्यांची संख्या ही एकूण संख्येच्या 54.03 टक्के इतकी आहे.

देशातील 264 बड्या विलफुल डिफॉल्टर्सकडे तब्बल 1.08 लाख कोटी रुपयांचं कर्ज थकीत

महत्त्वाच्या बातम्या

ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?
देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?
ट्रकमध्ये गॅस भरताना मोठा स्फोट! तीघांचा जागीच मृत्यू, तर तीन जण गंभीर, धक्कादायक घटनेनं राजधानी हादरली
ट्रकमध्ये गॅस भरताना मोठा स्फोट! तीघांचा जागीच मृत्यू, तर तीन जण गंभीर, धक्कादायक घटनेनं राजधानी हादरली

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhajinagar : सॉरी आई आणि आप्पा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी नक्की डॉक्टर बनेन, शेवटची चिठ्ठी लिहली अन्..., 19 वर्षीय विद्यार्थ्याने गळ्याला लावला दोर
सॉरी आई आणि आप्पा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी नक्की डॉक्टर बनेन, शेवटची चिठ्ठी लिहली अन्..., 19 वर्षीय विद्यार्थ्याने गळ्याला लावला दोर
Iran War Update: इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
Mumbai Crime News : मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
Amit Thackeray on ABVP: मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
Cab Driver Viral Video: मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
Girls Students News : राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 रुपयांचा पॉकेटमनी मिळणार?
राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 रुपयांचा पॉकेटमनी मिळणार?
Ashok Saraf andn Devendra Fadnavis: अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
Dharashiv Thackeray Camp Nagarsevak will join BJP: ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 9 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीतच अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 9 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीत अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Embed widget