एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
रेल्वेच्या दरवाजावरील आरक्षणाच्या याद्याही आता डिजिटल
रेल्वेच्या A-1, A आणि B या वर्गात मोडणाऱ्या सर्व रेल्वे स्थानकांवरुन सुटणाऱ्या गाड्यांच्या दरवाज्यावर यापुढे प्लाझ्मा स्क्रीनवर आरक्षणाच्या याद्या दिसतील.
नवी दिल्ली : रेल्वेला डिजिटल टच देण्याच्या दृष्टीने प्रशासनाने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. तुम्ही ज्यावेळी रेल्वेमधून प्रवसासाठी आरक्षण करता, त्यावेळी प्रवासादरम्यान आरक्षणाची छापील यादी रेल्वे कोचच्या दरवाजावर लावली जाते. मात्र आता ही यादी ‘डिजिटल’ रुप घेणार आहे. कारण कागदावरील छापील यादी आता प्लाझ्मा स्क्रीनवर दिसणार आहे.
रेल्वेच्या A-1, A आणि B या वर्गात मोडणाऱ्या सर्व रेल्वे स्थानकांवरुन सुटणाऱ्या गाड्यांच्या दरवाजावर यापुढे प्लाझ्मा स्क्रीनवर आरक्षणाच्या याद्या दिसतील. रेल्वे प्रशासनाने तसा आदेश दिला असून, येत्या एक मार्चपासून आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
सुरुवातीच्या सहा महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर आरक्षणाच्या याद्या प्लाझ्मा स्क्रीन दाखवल्या जातील. याआधी तीन महिन्यांसाठी नवी दिल्ली, हजरत निजामुद्दीन, मुंबई सेंट्रल, चेन्नई सेंट्रल, हावडा आणि सीयाल्दाह या स्थानकांवर असा प्रयोग करण्यात आला होता.
ज्या ठिकाणी प्लाझ्मा स्क्रीन लावल्यानंतर तिथे प्रवाशांना आरक्षण यादी पाहणं सोयीचं जाईल आणि जिथे प्लाझ्मा स्क्रीन चांगल्या प्रकारे काम करेल, अशा ठिकाणी छापील याद्या चिकटवणं बंद केले जाईल, असेही रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
रेल्वे प्रशासनातून कागदाचा वापर कमी करण्याच्या दृष्टीने पावले टाकली जात आहेत. प्लाझ्मा स्क्रीन लावण्यामागचा उद्देशही तोच आहे. यामुळे कागदासाठी होणारा खर्चही वाचेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
करमणूक
करमणूक
निवडणूक
Advertisement