एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
स्वातंत्र्यदिनी खुशखबर! पेट्रोल आणि डिझेल स्वस्त
नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिनी केंद्र सरकारने सर्वसामान्य नागरिकांना दिलासा दिला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात केली आहे. पेट्रोलचे दर प्रति लीटर 1 रुपया, तर डिझेलचे दर प्रति लीटर 2 रुपयांनी स्वस्त झाले आहेत.
देशातील तेल कंपन्या दर 15 दिवसांनी पेट्रोलियम उत्पादनांच्या किंमतीचं समीक्षण करतात. त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रूडच्या दरांवरुन देशांतर्गत तेल किंमतींमध्ये बदल केला जातो.
जूनपासून सातत्याने पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होताना दिसत आहेत. याआधी 15 जुलैला पेट्रोल प्रतिलीटर 2.25 रुपये आणि डिझेल 42 पैशांनी स्वस्त झाला होता. त्याहीआधी 30 जूनला पेट्रोलच्या दरात 89 पैसे प्रतिलीटर आणि डिझेलच्या दरात 49 पैसे कपात करण्यात आली होती. त्यानंतर आज पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात करण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
राजकारण
बुलढाणा
Advertisement