तेल कंपन्यांची गलती से मिस्टेक, पेट्रोलमध्ये 60 नाही तर 1 पैशांची कपात!
इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या वेबसाईटवर सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करण्यात आले.
स्पष्टीकरण काय दिलं? इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने स्पष्टीकरण देताना म्हटलं आहे की, “पेट्रोल आणि डिझेलचे दर पोस्ट करताना एक तांत्रिक चूक झाली होती. जी आता दुरुस्त करण्यात आली आहे. आज तेलाच्या दरात विशेष बदल झालेला नाही.” काँग्रेस अध्यक्षांचा पंतप्रधानांवर निशाणा पेट्रोलच्या दरांचं वास्तव समोर आल्यावर राजकारणही तापलं. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्वीट करुन पंतप्रधानांवर निशाणा साधला. “प्रिय पंतप्रधानजी, तुम्ही पेट्रोल-डिझेलचे दर कमी केले. तेही फक्त एक पैशाने? जर प्रँकची तुमची ही कल्पना असेल, तर हा बालिशपणा आहे. मी तुम्हाला जे इंधन दर घटवण्याचं चॅलेंज दिलं होतं, त्याला हा प्रतिसाद केवळ गरीबी आहे,” असं ट्वीट त्यांनी केलं.There was a technical glitch in posting the selling prices of petrol and diesel on our website today. The selling prices of petrol and diesel w.e.f 30th May 2018 have been rectified on our website. Today, there is a minor reduction in fuel prices: Indian Oil Corporation
— ANI (@ANI) May 30, 2018
पेट्रोल 3.8 तर डिजेल 3.37 रुपयांनी महागलं! सलग 16 दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. या 16 दिवसात पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 3.8 रुपये तर डिझेलच्या दरात 3.37 रुपयांनी किंमती वाढतच आहेत. पेट्रोल-डिझेल नागरिकांच्या आयुष्यातील अविभाज्य घटक बनले आहेत. पण वाढत्या किंमतीमुळे केंद्र सरकारला विरोधाचा सामना करावा लागत आहे. संबंधित बातम्या रोज पै-पै ने वाढणाऱ्या पेट्रोलची रुपयातील वाढ किती?Dear PM, You've cut the price of Petrol and Diesel today by 1 paisa. ONE paisa!?? If this is your idea of a prank, it’s childish and in poor taste. P.S. A ONE paisa cut is not a suitable response to the #FuelChallenge I threw you last week. https://t.co/u7xzbUUjDS
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 30, 2018
इंधनदरवाढ सलग 15 व्या दिवशी सुरुच, पेट्रोल 12 पैशांनी महाग इंधन दरवाढीवर लवकरच दीर्घकालीन उपाययोजना : अमित शाह पेट्रोल, डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्यासाठी केंद्राच्या हालचाली इंधन दरात दहाव्या दिवशी वाढ, देशात सर्वात महाग पेट्रोल अमरावतीत पेट्रोल-डिझेलचे दर वाढतच राहणार : केंद्र सरकार देशात सर्वात महाग पेट्रोल अमरावती, औरंगाबादमध्ये! पाकिस्तानपेक्षा भारतात पेट्रोल 33 रुपये प्रति लिटरने महाग कशामुळे? ... तर पेट्रोल 53 रुपये आणि डिझेल 41 रुपये लिटरने मिळेल पेट्रोल-डिझेलची आगेकूच, स्वत:चा विक्रम मोदींनी अनेकवेळा मोडला!