एक्स्प्लोर

Petrol Diesel Price Today : कच्च्या तेलाचे दर 9 महिन्यांतील सर्वात नीचांकी पातळीवर; पेट्रोल-डिझेलचे दरही घसरणार?

Petrol Diesel Price Today : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घसरण सुरूच, तुमच्या शहरातील आजचे इंधन दर काय?

Petrol Diesel Price Today 27 September 2022 : कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमतींमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं घट होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आज कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये विक्रमी घट पाहायला मिळाली असून 9 महिन्यांच्या निच्चांकी पातळीवर पोहोचलं आहे. विक्रमी घसरण होऊनही तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरांत (Petrol-Diesel Price) कोणताही बदल केलेला नाही. तर दुसरीकडे कच्च्या तेलाच्या किमतीमुळे देशांतर्गत बाजारात पेट्रोल (Petrol-Price) आणि डिझेलचे दर (Diesel Price) कमी करण्याची मागणी वाढली आहे. 

...तर पेट्रोल-डिझेलचे दर कमी होऊ शकतात

येत्या काळात तेलाच्या किमती कमी होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. गेल्या वेळी 22 मे रोजी सरकारनं उत्पादन शुल्कात कपात केली. तेव्हा पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले होते. त्यामुळे सर्वसामान्यांना दरात दिलासा मिळाला आहे. किमतीतील हा बदल चार-तीन महिन्यांपूर्वी झाला होता. त्यानंतर महाराष्ट्र आणि मेघालयमध्ये तेलाच्या दरांत बदल झाला आहे. महाराष्ट्रात शिंदे सरकार आल्यानंतर व्हॅटमध्ये कपात केल्यामुळे पेट्रोल 5 रुपयांनी तर डिझेल 3 रुपयांनी स्वस्त झालं.

कच्च्या तेलाचे आजचे दर काय? 

कच्च्या तेलाच्या दरांत घसरण सुरूच आहे. मंगळवारी सकाळी डब्ल्यूटीआय क्रूडची किंमत प्रति बॅरल 76.70 डॉलर या नऊ महिन्यांच्या निच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. तसेच, ब्रेंट क्रूड प्रति बॅरल 84.07 डॉलरवर पोहोचलं आहे. 

कच्च्या तेलाच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याने पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात होईल का, याकडे अनेकांचे लश्र लागले आहे. महागाईचा दर कमी करण्यासाठी इंधन दरात कमी करण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. दिवाळीचा सण आणि आगामी निवडणुका लक्षात घेऊन इंधन दर कमी करण्याबाबत सरकारकडून घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

राज्यातील प्रमुख शहरांतील दर काय?

राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये पेट्रोलचा दर 106.04 रुपये प्रति लिटर असून डिझेलचा दर 92.59 रुपये इतका आहे. पुण्यात पेट्रोलचा दर 105.84 रुपये आणि डिझेलचा दर 92.36 रुपये प्रति लिटर इतका आहे. कोल्हापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.47 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 93.01 रुपये प्रति लिटर इतका आहे. औरंगाबादमध्ये पेट्रोलचा दर 108 रुपये आणि डिझेलचा दर 95.96 प्रति लिटर इतका आहे. परभणीत पेट्रोलचा दर 109.41 रुपये आणि डिझेलचा दर 95.81 रुपये प्रति लिटर आहे. 

देशातील महानगरांत परिस्थिती काय? 

  • दिल्ली: पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर,  डिझेल 89.92 रुपये प्रति लिटर 
  • मुंबई : पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर 
  • चेन्नई: पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर 
  • कोलकाता: पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर 

पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत). 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 20 January 2025Donald Trump oath Ceremony | अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प पर्व, 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथSpecial Report Akshay Shinde Case | अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरप्रकरणी पोलीस गोत्यातJalgoan Crime News : जळगावात 'सैराट', पूजा-मुकेशच्या लव्हस्टोरीचा रक्तरंजित शेवट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
Embed widget