Petrol-Diesel Price Today : देशात इंधनाचे दर ऐतिहासिक उंचीवर; आज पुन्हा पेट्रोल-डिझेल कडाडलं, एका लिटरचे दर काय?
Petrol-Diesel Price Today : देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. महाराष्ट्रात आता डिझेलची किंमत शंभरीच्या जवळ गेली आहे. सतत वाढणाऱ्या किमतींमुळे सर्वसामान्यांचं बजेट कोलमडत आहे.
Petrol and Diesel Price Today 05 October 2021 : देशात इंधन दरवाढीचं सत्र सुरुच आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात ज्या वेगानं तेलाच्या किमतींमध्ये (Crude Oil) वाढ होत आहे, त्याचप्रमाणे देशातील इंधनाच्या किमतीतही वाढ करण्यात येत आहे. पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी देशात उच्चांक गाठला आहे.
भारतीय तेल कंपन्यांनी एका दिवसाच्या स्थिरतेनंतर आज (मंगळवारी) म्हणजेच, 5 ऑक्टोबर 2021 रोजी पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel) किमतींमध्ये वाढ करण्यात आली आहे. पेट्रोल (Petrol Price) 25 पैसे प्रति लिटर आणि डिझेल 30 पैसे प्रति लिटर महाग झालं आहे. दरम्यान, ऑक्टोबरमध्ये दररोज पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली होती. आतापर्यंत केवळ एकाच दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर होते.
इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (IOCL) नं दिलेल्या माहितीनुसार, इंधनाच्या दरांमध्ये आज झालेल्या वाढिनंतर देशाची राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 102.64 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर 91.07 रुपये प्रति लिटर झाले आहेत. देशाच्या चार महानगरांची तुलना केली तर मुंबईत पेट्रोल-डिझेलच्या किमती सर्वाधिक आहेत.
देशातील प्रमुख महानगरांतील दर :
देशातील महत्त्वाची शहरं | पेट्रोल रुपये/लिटर | डिझेल रुपये/लिटर |
दिल्ली | 102.64 | 91.07 |
मुंबई | 108.67 | 98.80 |
कोलकाता | 103.36 | 94.17 |
चेन्नई | 100.23 | 95.59 |
पेट्रोल-डिझेल GSTमध्ये घेण्यासाठी का तयार नाही केंद्र आणि राज्य सरकार?
केंद्र सरकारनं कर प्रणालीमध्ये सुधारणांची गरज असल्याचं कारण देत जीएसटी (GST) लागू केला होता. पण जीएसटीमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा समावेश करण्यात आलेला नाही. तसेच देशातील बहुतांश राज्य सरकारचंही हेच मत आहे की, पेट्रोल-डिझेलचा जीएसटीच्या कक्षेत समावेश केला जाऊ नये. पण का? यामुळे काय फायदा होणार? यांसारखे अनेक प्रश्न आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झाले आहेत. जाणून घेऊया यामागील कारणं...
पेट्रोल-डिझेलच्या किमती जीएसटीच्या कक्षेत आणण्याची केंद्र सरकारसोबत राज्य सरकारचीही इच्छा नाही. कारण सरकारला चिंता आहे ती, देशाच्या तिजोरीची. सामान्य माणसाला दिलासा देता-देतो, देशाच्याच तिजोरीत खडखडाट होण्याची भिती सरकारला वाटतेय. जर पेट्रोल-डिझेलचा समावेश जीएसटीच्या कक्षेत केला, तर पेट्रोल-डिझेलच्या किमती अर्ध्या होणार. आजच्या किमतीनुसार जर अंदाज लावला तर, पेट्रोल 56 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 55 रुपये प्रति लिटर विकलं जाईल.
पेट्रोल आणि डिझेलचे दर कुठे आणि कसे पाहाल?
इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.
इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर सोप्या पद्धतीने पाहता येतील.
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).