बंगळुरु : देशात रेल्वे सेवा सुरु झाल्यानंतर दिल्ली ते बंगळुरुसाठी गुरुवारी एक ट्रेन रवाना करण्यात आली होती. सकाळी 6.30 वाजता 1000 प्रवाशांसोबत ही ट्रेन बंगळुरु स्टेशनवर पोहोचली. बंगळुरु सिटी रेल्वे स्टेशनवर पोहोचल्यानंतर लगेच ट्रेनमधील प्रवाशांची स्टेशनवरच कोरोनाची तपासणी करण्यात आली. कर्नाटक आरोग्य विभागासोबतच बंगळुरु नागरिक एजन्सीने प्रवाशांच्या तपासणीसाठी 10 आरोग्य तपासणी काऊंटर स्टेशवर तयार केले होते. परंतु, यादरम्यान गोंधळ झाला. कारण या ट्रेनमधून परतलेल्या काही प्रवाशांनी सरकारद्वारे अनिर्वाय करण्यात आलेल्या इंस्टीट्यूशनल क्वॉरंटाईनमध्ये राहण्यास विरोध दर्शवला. तसेच होम क्वॉरंटाईनची मागणी करत उपोषणाला बसले.


इतर प्रवाशांना क्वॉरंटाईन सेंटर्सवर घेऊन जाण्यासाठी राज्य सरकारच्या BMTC च्या 15 बसमधून क्वॉरंटाईन सेंटर्सवर पाठवण्यात आलं. रेल्वे स्टेशनच्या आजूबाजूला 42 हॉटेल्समध्ये 4200 खोल्या बुक करण्यात आल्या होत्या. रेल्वे स्टेशन आणि त्याच्या आजूबाजूला 90 हॉटेल्स आरक्षित करण्यात आले होते. त्यामध्ये या ट्रेनमधून आलेल्या प्रवाशांना इंस्टीट्यूशनल क्वॉरंटाईनमध्ये ठेवण्यात येणार होतं.


दिल्ली ते बंगळुरुसाठी सोडण्यात आलेल्या या ट्रेनमधून परतलेल्या जवळपास 70 प्रवाशांनी शासनाकडून अनिर्वाय करण्यात आलेल्या इंस्टीट्यूशनल क्वॉरंटाईनमध्ये राहण्यास विरोध दर्शवत उपोषणाला सुरुवात केली. एवढचं नाहीतर काही तासांपर्यंत अधिकाऱ्यांसोबत हुज्जत घातली. प्रवाशांना प्रवास सुरु करण्याआधीच इंस्टीट्यूशनल क्वॉरंटाईनबाबत माहिती देण्यात आली होती. परंतु, तरिही या प्रवाशांनी गोंधळ घातला. त्यामुळे अधिकाऱ्यांनी 70 प्रवाशांना काल रात्री 8.30 वाजता दिल्लीला जाणाऱ्या ट्रेनमध्ये परत पाठवण्याचा निर्णय घेतला. सोशल मीडियावर अधिकाऱ्यांनी घेतलेल्या या निर्णयाचं कौतुक करण्यात येत आहे. जे लोक इंस्टीट्यूशनल क्वॉरंटाईनच्या सरकारच्या नियमांचं पालन करणार नाहीत, त्यांना परत पाठवणचं योग्य आहे, असं म्हणत नेटकरी अधिकाऱ्यांच्या निर्णयाचं कौतुक करत आहेत.


संबंधित बातम्या : 


 स्पेशल आणि श्रमिक ट्रेन्स वगळता अन्य रेल्वेची 30 जूनपर्यंतची तिकीटं कॅन्सल


यूपीएससी विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठीची दिल्लीत लगबग सुरु, लॉकडाऊनमध्ये विद्यार्थ्यांसाठी एकमेव स्पेशल ट्रेन

विशेष रेल्वेनंतर आता एअर इंडियाची देशांतर्गत विशेष विमान सेवा! मंगळवार, 19 मे पासून?


रेल्वेमध्ये प्रवासासाठी आरोग्य सेतू अॅप बंधनकारक, आवाहनानंतर मध्यरात्री अचानक सक्ती


Coronavirus | पंजाबमधील लुधियानात RPF चे 14 जवान कोरोना पॉझिटिव्ह; श्रमिक ट्रेनमध्ये होते तैनात