नवी दिल्ली : लॉकडाऊननंतर बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर रेल्वेची वाहतूक प्रायोगिक पातळीवर का होईना पण सुरू होत आहे. देशात 15 मार्गावरच्या तीस ट्रेन धावणार आहेत. पण या प्रवासाच्या सुरुवातीलाच रेल्वेच्या एका निर्णयानं संभ्रम निर्माण झाला आहे. आरोग्य सेतू हे कोरोनाच्या संकटकाळात तयार झालेलं मोबाईल अॅप हे रेल्वेनं प्रवासासाठी बंधनकारक केलं आहे. रेल्वेची ही सक्ती अनेक प्रश्न निर्माण करणारी आहे.

रेल्वेनं प्रवास करायचा असेल तर आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड केलंच पाहिजे, असं फर्मान रेल्वे मंत्रालयाकडून निघालं आहे. आजपासून देशात 15 मार्गावरची वाहतूक प्रायोगिक तत्वावर सुरु होत आहे. या प्रवासासाठी ही सक्ती करण्यात आली आहे. मंगळवारी (12 मे) 15 मार्गावरची जी प्रायोगिक वाहतूक सुरू झाली आहे. त्याबद्दल सोमवारी (11 मे) रेल्वेची नियमावली संध्याकाळी चारच्या सुमारास आली. त्यात सुरुवातीला हे अॅप बंधनकारक नव्हतं, तर केवळ नागरिकांना हे अॅप डाऊनलोड करण्याचा सल्ला होता. संपूर्ण नियमावलीत अगदी शेवटून दुसरा हा सल्ला होता. पण रात्री अचानक घडामोडी बदलल्या आहे. मध्यरात्री 12 वाजून 24 मिनिटांनी रेल्वे मंत्र्यांच्या ट्विटवरुन जाहीर करण्यात आलं की, हे अॅप प्रवासासाठी बंधनकारक असेल.

ही अचानक झालेली घडामोडी रेल्वेतल्या काही अधिकाऱ्यांसाठी सुद्धा आश्चर्यकारक होती. कारण तोपर्यंत अनेक लोकांनी 12 ते 17 मे या प्रवासाची तिकीट ऑनलाईन बुक करुनही ठेवली होती. ज्या लोकांना तिकीट बुक करताना याची कल्पनाच नव्हती त्यांचं काय? मजुरांसाठी चालणाऱ्या श्रमिक स्पेशल ट्रेनसाठी ही सक्ती नाही. पण तरीही इतर प्रवाशांमधले काही सगळेच श्रीमंत वर्गातले नाहीत. त्यामुळे रेल्वेच्या झोनल पातळीवर याची अंमलबजावणी कशी करायची याबाबत संभ्रम आहेत.

Lockdown 3 | Aarogya Setu App | रेल्वे प्रवासावेळी प्रवाशाकडे आरोग्य सेतू अॅप बंधनकारक



आरोग्य सेतू हे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी वापरलं जाणारं अॅप आहे. यात ब्लू टुथ, जीपीएस लोकेशन तंत्रज्ञानाचा वापर करुन तुम्ही कोरोना बाधितांच्या संपर्कात आहात की नाहीत याचा अलर्ट दिला जातो. या अॅपवरुन मिळणारा डेटा हा कोरोना बाधितांच्या सरकारी डेटाशी तुलना करुन असे अलर्ट दिले जातात. पण या अॅपच्या सुरक्षेबाबत अनेक सायबर तज्ज्ञांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. अशा पद्धतीचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अॅप चायना, सिंगापूर, दक्षिण कोरियातही वापरण्यात आले आहेत. पण केवळ या अॅपमुळे कोरोना प्रादुर्भाव रोखणं यशस्वी झाल्याचं उदाहरण नाही. कारण सगळ्यात महत्वाची असते ग्राऊंडवर काम करणारी यंत्रणा आणि तीच वेगानं प्रतिसाद देणार नसेल तर अशा अॅपचा काय फायदा होणार आहे. त्यातही सगळ्यात महत्वाचा फरक बाकी कुठल्याच देशात असं अॅप बंधनकारक नाही, तर ते ऐच्छिक आहे.

संबंधित बातम्या :

Coronavirus | पंजाबमधील लुधियानात RPF चे 14 जवान कोरोना पॉझिटिव्ह; श्रमिक ट्रेनमध्ये होते तैनात