आधी या ट्रेनसाठी दिल्ली-भुसावळ या मार्गाला परवानगी मिळाली होती. पण आता ही ट्रेन दिल्ली ते पुणे व्हाया भुसावळ, नाशिक, कल्याण अशी धावणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना ते सोयीचं होणार आहे. यूपीएससीची परीक्षा आधीच्या वेळापत्रकाप्रमाणे 31 मे रोजी होणार होती. त्यामुळे 24 मार्चला लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतरही हे विद्यार्थी दिल्लीतच तयारीसाठी थांबले होते. त्यातल्या अनेकांचं परीक्षा केंद्रही दिल्लीच होतं. पण नंतर परीक्षेचं भवितव्य अधांतरी असल्यानं आणि लॉकडाऊनमध्ये विद्यार्थ्यांच्या खाण्यापिण्याचेही हाल होत असल्यानं त्यांनी महाराष्ट्र सरकारकडे याबाबत गाऱ्हाणं मांडलं होतं.
दिल्लीत अडकलेल्या महाराष्ट्रातील यूपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशल ट्रेन, चार स्टॉपची परवानगी
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे, काँग्रेसकडून खासदार राजीव सातव, युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी या स्पेशल ट्रेनसाठी पाठपुरावा केला होता. शिवाय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही केद्रीय रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांच्याकडे परराज्यांत अडकलेल्या मराठी लोकांसाठी स्पेशल ट्रेन सोडण्याची मागणी केली होती.
कोटामध्ये आयआयटी जेईईची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांपाठोपाठ आता या विद्यार्थ्यांनाही महाराष्ट्र सरकार राज्यात परत आणणार आहे. या लॉकडाऊनच्या काळात दिल्लीत घरमालकांनी घरभाड्यात कुठलीच सूट दिली नसल्यानंही या विद्यार्थ्यांचे अधिक हाल होत होते.
संबंधित बातम्या