एक्स्प्लोर

Agnipath Scheme Protest : बिहारमधील हिंसाचारामागे कोचिंग सेंटर', व्हॉट्सअॅप मेसेजद्वारे भडकवले आंदोलन  

Agnipath Scheme Protest : अग्निपथ योजनेविरोधातील आंदोलनाला बिहारमध्ये हिंसक वळण लागले. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या हिंसाचारात आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे.

Agnipath Scheme Protest : केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेविरोधात देशभरात आंदोलने सुरू आहेत. अनेक राज्यांमध्ये यावरून हिंसाचाराच्या काही घटना घडल्या आहेत. बिहारमध्ये आंदोलकांनी प्रचंड गोंधळ घालत रेल्वे गाड्या पेटवून दिल्या. या हिंसाचारात आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे. या हिंसाचारामध्ये आता कोचिंग सेंटर्सचे नाव पुढे येत आहे. हिंसाचारप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांचे फोन तपासल्यानंतर  व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून काही कोचिंग सेंटर्सनी हिंसक निदर्शने आणि चिथावणी देणारे संदेश व व्हिडीओ पाठवले. त्यामुळे आंदोलनाने हिंसक वळण घेतल्याची माहिती पटनाचे डीएम चंद्रशेखर सिंह यांनी दिली आहे.   

बिहारमधील हिंसक निदर्शनांमागे अनेक कोचिंग सेंटरची भूमिका संशयास्पद असल्याचे  चंद्रशेखर सिंह म्हणाले. "हिंसक निदर्शना प्रकरणी अटक करण्यात आलेल्यांच्या चौकशीत 7 ते 8 कोचिंग सेंटर्सनी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून या लोकांच्या फोनवर हिंसक संदेश पाठवल्याचेही समोर आले आहे. या प्रकरणी 170 जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला असून त्यापैकी 46 जणांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती चंद्रशेखर सिंह यांनी दिली. 

अग्निपथ योजनेविरोधातील आंदोलनाला बिहारमध्ये हिंसक वळण लागले. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दंगलखोरांवर सातत्याने कारवाई केली जात आहे. यामध्ये कोणाचा हात आहे, अशा लोकांचा शोध घेतला जात आहे. आतापर्यंत दोन डझनहून अधिक एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. शेकडो जणांना ओळख पटवून त्यांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिलीय. 

बिहारचे उपमुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद यांनी राज्यात परिस्थिती आता सामान्य होत असल्याचे म्हटले आहे. यासोबतच त्यांनी आंदोलकांना शांतता राखण्याचे आवाहनही केले आहे. केंद्राने तरुणांसाठी चांगली योजना बनवली आहे. त्यातून त्यांना अनेक फायदे होतील, असे प्रसाद यांनी म्हटले आहे. काल आंदोलनकर्त्यांनी प्रसाद यांच्या घरावर हल्ला केला होता. 

महत्वाच्या बातम्या

Agnipath Scheme : पंतप्रधान मोदींना 'माफीवीर' व्हावे लागेल, अग्निपथ योजनेवरून राहुल गांधींचा हल्लाबोल 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Gold Silver Rate : सोनं 3 लाख, तर चांदी 6 लाखांपर्यंतचा दर गाठणार! अमेरिकेच्या कर्जाशी थेट संबंध, रॉबर्ट कियोसाकींचा मोठा दावा
सोनं 3 लाख, तर चांदी 6 लाखांपर्यंतचा दर गाठणार! अमेरिकेच्या कर्जाशी थेट संबंध, रॉबर्ट कियोसाकींचा मोठा दावा
नाद केला पण वाया नाही गेला! 12 वर्षांची मेहनत, तब्बल 40 परीक्षांमध्ये अपयश, संघर्षातून घडलेल्या मनोजची यशोगाथा 
नाद केला पण वाया नाही गेला! 12 वर्षांची मेहनत, तब्बल 40 परीक्षांमध्ये अपयश, संघर्षातून घडलेल्या मनोजची यशोगाथा 
जगातील सगळ्यात हलकं हेल्मेट! वजन फक्त 1050 ग्रॅम, सुरक्षेच्या बाबतीत मजबूत, शानदार कार्यक्रमात अनावरण
जगातील सगळ्यात हलकं हेल्मेट! वजन फक्त 1050 ग्रॅम, सुरक्षेच्या बाबतीत मजबूत, शानदार कार्यक्रमात अनावरण

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sugar Price Hike Marathi News: साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
Mumbai Accident JCB fall down: क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Embed widget