एक्स्प्लोर

पासपोर्ट यापुढे अधिकृत रहिवासी दाखला नसणार?

नवी सीरिज आणताना पासपोर्टचं शेवटचं पान ब्लँक ठेवण्याचा निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : आतापर्यंत पासपोर्ट हा अधिकृत रहिवासी दाखला मानला जात असे, मात्र परराष्ट्र मंत्रालयाला आलेल्या प्रस्तावानुसार यापुढे पासपोर्टचा हा दर्जा जाण्याची चिन्हं आहेत. पासपोर्टधारकाचा पत्ता असलेलं शेवटचं पान हटवण्याच्या हालचाली सुरु आहेत. नवी सीरिज आणताना पासपोर्टचं शेवटचं पान ब्लँक ठेवण्याचा निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे. पासपोर्टचे तपशील संरक्षित ठेवण्यासाठी हे पाऊल उचललं जाणार आहे. 'हिंदुस्तान टाइम्स' वृत्तापत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे. मात्र परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांकडून अद्याप या वृत्ताला अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. सध्या, पारपत्राच्या पहिल्या पानावर फोटो आणि पासपोर्टधारकाचे इतर तपशील छापलेले असतात, तर पत्ता शेवटच्या पानावर असतो. मात्र पासपोर्ट ऑफिस आणि इमिग्रेशन विभाग (किंवा सुरक्षा अधिकारी) यांच्याकडे पासपोर्टधारकाचा पत्ता असल्यामुळे शेवटचं पान असो, वा नसो, काहीच फरक पडत नाही. 2012 पासून सर्वच पासपोर्टवर बारकोड लावण्यात आले असून ते स्कॅन करताच ही माहिती उपलब्ध होऊ शकते. नवीन सीरिज आणल्यानंतरही सद्य पासपोर्ट त्यांच्या एक्स्पायरी डेटपर्यंत वैध राहतील. पासपोर्टच्या रंगात बदल करण्याबाबतही परराष्ट्र मंत्रालय विचार करत आहे. सध्या हे पासपोर्ट तीन रंगाचे आहेत. सरकारी कामासाठी परदेशी जाणाऱ्या अधिकारी किंवा व्यक्तींसाठी पांढरा, दूतावास (डिप्लोमॅट) अधिकाऱ्यांसाठी लाल, तर उर्वरित सर्वांसाठी (इमिग्रेशन चेकची आवश्यकता असलेले- ECR आणि नसलेले - ECNR) निळा रंग. यापुढे इमिग्रेशनची आवश्यकता असणाऱ्यांना केशरी रंगाचा पासपोर्ट दिला जाण्याची चिन्हं आहेत. रंगावरुनच कोणाचं इमिग्रेशन आवश्यक आहे, हे समजल्यामुळे इमिग्रेशन प्रक्रिया जलद होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. नवीन सीरिज आणल्यानंतरही सद्य ECR पासपोर्ट त्यांच्या एक्स्पायरी डेटपर्यंत वैध राहतील.

महत्त्वाच्या बातम्या

Honey Trap : नेत्यांना 'हनी ट्रॅप'मध्ये फसवण्याचा डाव उघड, 'जैश ए मोहम्मद'च्या दहशतवाद्याची गर्लफ्रेंड अर्पिता सरकारला अटक
नेत्यांना 'हनी ट्रॅप'मध्ये फसवण्याचा डाव उघड, 'जैश ए मोहम्मद'च्या दहशतवाद्याची गर्लफ्रेंड अर्पिता सरकारला अटक
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Amit Shah On Ajit Doval Pune: अमित शाहांकडून अजित डोवाल यांचं तोंडभरून कौतुक, पंतप्रधान मोदींनी दिलेला महत्वाचा सल्ला आणि पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला
अमित शाहांकडून अजित डोवाल यांचं तोंडभरून कौतुक, पंतप्रधान मोदींनी दिलेला महत्वाचा सल्ला आणि पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Embed widget