एक्स्प्लोर
पाकिस्तानच्या सुरक्षा सल्लागारांचा अजित डोभाल यांना कॉल
![पाकिस्तानच्या सुरक्षा सल्लागारांचा अजित डोभाल यांना कॉल Pakistani Nsa Nasir Janjua Called India Nsa Ajit Doval Discussed About Tensions On Loc पाकिस्तानच्या सुरक्षा सल्लागारांचा अजित डोभाल यांना कॉल](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/03122552/Janjua_Doval.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारताच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर चवताळलेल्या पाकिस्तानने आता एलओसीवर तणाव कमी करण्याबाबत चर्चा करत आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) नासिर जंजुआ यांनी रविवारी भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यासोबत फोनवरुन चर्चा केली. डोभाल आणि जंजुआ यांच्यात दोन्ही देशांमध्ये तणाव कमी करण्यासंदर्भात बातचीत झाली.
याआधी पाकिस्तानी मीडियाने परराष्ट्र विषयांवर पंतप्रधान नवाज शरीफ यांचे सल्लागार सरताज अजीज यांच्या हवाल्याने दावा केला होता की, "जंजुआ आणि डोभाल यांच्यात एलओसीवर तणाव कमी करण्यासंदर्भात सहमती झाली."
स्पेशल रिपोर्टः अजित डोभाल... भारताचा चाणक्य
पाकिस्तानी मीडियाचा दावा"अजित डोभाल यांचं ऐका, नाहीतर जगाच्या नकाशावरुन नष्ट व्हाल"
सर्जिकल स्ट्राईकबाबत चर्चा पाकिसानी एनएसए जंजुआ यांनी अजित डोभाल यांना रविवारी संध्याकाळी कॉल केला. दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवे. पण ही बातचीत बारामुल्लाच्या कॅम्पवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या आधी झाली होती. डोभाल यांनी जंजुआ यांच्यासोबत उरी हल्ल्यासंदर्भात चर्चा केली. भारताला सर्जिकल स्ट्राईकला करण भाग होतं, असंही डोभाल यांनी जंजुआ यांना सांगितलं.UPDATE : बारामुल्ला हल्ला : 2 दहशतवादी पसार, सीमेवर रेड अलर्ट
चर्चेनंतर काही तासातच बारामुल्ला हल्ला एकीकडे पाकिस्तान तणाव कमी करण्याच्या बाता मारत असताना, दुसरीकडे जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले सुरुच आहे. बारामुल्लामध्ये बीएसएफचा एक जवान शहीद झाला आहे. तर दोन दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी ठरले आहे.उरी हल्ला : अमेरिकेच्या सुरक्षा सल्लागारांचा अजित डोभाल यांना कॉल
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)