एक्स्प्लोर

खोटारडा पाकिस्तान... दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्काराला पाकिस्तानी आर्मी अधिकारी अन् पोलीस IG

भारताने पाकव्याप्त काश्मीरमधील जैश ए मोहम्मद, लष्कर ए तोएबा, हिजबुल मुजाहिद्दीन या प्रतिबंधित दहशतवादी संघटनांच्या मुख्यालयावर एअर स्ट्राईक केला

नवी दिल्ली: भारतीय सैन्य दलाने 'ऑपरेशन सिंदूर' (Operation sindoor) राबवत पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील दहशतवादी स्थळांवर जोरदार हल्ला केला. भारतीय वायू दलाने दहशतवाद्यांच्या 9 तळावर एअर स्ट्राईक करत दहशतवाद्यांचे अड्डे नेस्तनाबूत केले आहेत. या कारवाईत 30 दहशतवादी मारले गेल्याची प्राथमिक माहिती आहे. या हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून भारतासोबत युद्ध पुकारण्याच्या वल्गना करण्यात येत आहेत. दुसरीकडे सीमारेषेवर पाकिस्तानी (Pakistan) रेंजर्संकडून गोळीबारही केल्याची घटना घडली. तर, दहशतवाद्यांसोबत (Terrorist) आपला संबंध नसल्याचे सांगणाऱ्या पाकिस्तानी सैन्याचे रेंजर्स आज दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्काराला दिसून आले. 

भारताने पाकव्याप्त काश्मीरमधील जैश ए मोहम्मद, लष्कर ए तोएबा, हिजबुल मुजाहिद्दीन या प्रतिबंधित दहशतवादी संघटनांच्या मुख्यालयावर एअर स्ट्राईक केला. त्यामध्ये, लष्कर ए तोएबाचे अनेक दहशतवादी ठार मारले गेले आहेत. त्यापैकी, एका दहशतवाद्याचा व्हिडिओ पाकिस्तानी माध्यमांनी शेअर केला आहे. त्यामध्ये, लष्कर ए तोएबाचा टॉप कमांडर आणि पाकिस्तानी सैन्य दलाचे अधिकारी दिसून येत आहेत. एकीकडे दहशतवाद्यांशी आपला कसलाही संबध नाही, असे म्हणणाऱ्या पाकिस्तानचं हे खरं रुप या व्हिडिओतून समोर आलं आहे. 

भारतीय सैन्य दलाने पीओकेसह पंजाब प्रांतामधील मरीदके आणि बहावलपूर येथेही दहशतवादी अड्ड्यांना लक्ष्य केलं. लष्कर-ए-तोयबा चा टॉप कमांडर हाफिज अब्दुल रऊफ हा एअर स्ट्राइकमध्ये ठार झालेल्या एका दहशतवाद्याच्या अंत्यसंस्कारासाठी दाखल झाला होता. विशेष म्हणजे या अंत्यसंस्काराला पाकिस्तानी सैन्य दलातील काही अधिकारी आणि पोलीसही सहभागी झाल्याचं व्हिडिओतून पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे पंजाब पोलिसचे आयजी अधिकारी देखील येथे उपस्थित होते. हाफिज अब्दुल रऊफने या अंत्यसंस्कार सोहळ्यात नमाज अदा केला. लष्कर ए तोएबाच्या टॉप कमांडरने अंत्यसंस्काराला जाणे आणि पाकिस्तानी सैन्य दलानेही उपस्थिती दर्शवणे हे पाकिस्तानचे दहशतवाद्यांशी असलेलं कनेक्शन जगजाहीर करत असल्याचे यावरुन दिसून येते. तरीही, पाकिस्तानकडून सातत्याने दहशतवादी कारवायांमध्ये आपला कसलाही हात नसल्याचे सांगितले जात आहे.

मसूद अझहरच्या कुटुंबातील 14 जणांचा खात्मा

भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूर एअर स्ट्राईकमध्ये कुख्यात दहशतवादी मसूद अझहरच्या कुटुंबातील 14 जणांचा खात्मा (14 members of Masood Azhar's Family Killed) केलाय. यात हल्ल्यात दहशतवादी मसूद अझहरचा भाऊ शतवादी भाऊ रौफ असगर गंभीर जखमी झाला आहे. रौफ असगरचा मुलगा हुजैफाचाही यात समावेश आहे. तर अझहरचा भाऊ रौफ असगरच्या भावाच्या पत्नीचाही मृत्यू झाला आहे. यात आणखी पाच जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. रौफ असगर हा भारतातील मोस्ट मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आहे.

हेही वाचा

Mock drill 'ऑपरेशन सिंदूर'नंतरही मॉकड्रीलची मोहीम फत्ते, भरपावसात दिसलं देशप्रेम

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bogus Voters List : रस्त्यावरील नशाबाज, भिकाऱ्यांची बोगस नावे मतदारयादीत, चेंबूरमधील भिक्षुक गृहावर मनसेची धडक मोहीम
रस्त्यावरील नशाबाज, भिकाऱ्यांची बोगस नावे मतदारयादीत, चेंबूरमधील भिक्षुक गृहावर मनसेची धडक मोहीम
मनमाडमधील प्रभाग 10 ची निवडणूक रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय; धुळे अन् गेवराईत काय होणार?
मनमाडमधील प्रभाग 10 ची निवडणूक रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय; धुळे अन् गेवराईत काय होणार?
मोठी बातमी! 8 फेब्रुवारीची परीक्षा रद्द, शिष्यवृत्ती परीक्षेची नवी तारीख जाहीर; राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय
मोठी बातमी! 8 फेब्रुवारीची परीक्षा रद्द, शिष्यवृत्ती परीक्षेची नवी तारीख जाहीर; राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय
भाजप उमेदवारांना निवडून द्या, तुमचा 'तो' प्रश्न मार्गी लावतो; बावनकुळेचं फोनवरुन लोणावळ्यात आश्वासन
भाजप उमेदवारांना निवडून द्या, तुमचा 'तो' प्रश्न मार्गी लावतो; बावनकुळेचं फोनवरुन लोणावळ्यात आश्वासन
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Zero Hour Full : महायुतीचा जोमात प्रचार, मविआचे बडे नेते मात्र प्रचारापासून दूरच; कारण काय?
Mahapalikecha Mahasangram Bhusawal:भुसावळ-नगरपरिषदेचा महासंग्राम, नराध्यक्षांकडून नागरिकांना अपेक्षा
Mahapalikecha Mahasangram Alibag : निवडणुकीबाबत काय वाटतं अलिबागकरांना? शेकाप पुन्हा सत्ता राखणार?
Mahapalikecha Mahasangram Dharashiv : धाराशीव शहरातील रिक्षा चालकांना निवडणुकीबाबत काय वाटतं?
Anjali Damania PC : 24 तासांत अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नाही तर...

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bogus Voters List : रस्त्यावरील नशाबाज, भिकाऱ्यांची बोगस नावे मतदारयादीत, चेंबूरमधील भिक्षुक गृहावर मनसेची धडक मोहीम
रस्त्यावरील नशाबाज, भिकाऱ्यांची बोगस नावे मतदारयादीत, चेंबूरमधील भिक्षुक गृहावर मनसेची धडक मोहीम
मनमाडमधील प्रभाग 10 ची निवडणूक रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय; धुळे अन् गेवराईत काय होणार?
मनमाडमधील प्रभाग 10 ची निवडणूक रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय; धुळे अन् गेवराईत काय होणार?
मोठी बातमी! 8 फेब्रुवारीची परीक्षा रद्द, शिष्यवृत्ती परीक्षेची नवी तारीख जाहीर; राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय
मोठी बातमी! 8 फेब्रुवारीची परीक्षा रद्द, शिष्यवृत्ती परीक्षेची नवी तारीख जाहीर; राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय
भाजप उमेदवारांना निवडून द्या, तुमचा 'तो' प्रश्न मार्गी लावतो; बावनकुळेचं फोनवरुन लोणावळ्यात आश्वासन
भाजप उमेदवारांना निवडून द्या, तुमचा 'तो' प्रश्न मार्गी लावतो; बावनकुळेचं फोनवरुन लोणावळ्यात आश्वासन
मोठी बातमी! महापालिका मतदार याद्यांतील घोळ समोर, सूचना व हरकतीला मुदतवाढ; निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय
मोठी बातमी! महापालिका मतदार याद्यांतील घोळ समोर, सूचना व हरकतीला मुदतवाढ; निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2025 | बुधवार
Imran Khan : इम्रान खान यांच्या मृत्यूच्या अफवा! भेटीवर बंदी अन् बहिणींवर पोलिसांचा लाठीचार्ज, पाकिस्तानात खळबळ
इम्रान खान कुठे आहेत? तुरुंगातच मृत्यू झाल्याच्या अफवा, पाकिस्तानमध्ये खळबळ, कुटुंबीयांना भेट घेण्यापासून अडवलं
मोठी बातमी! न्यायालयाने उज्ज्वला थिटेंचा अपील अर्ज फेटाळला; अनगर नगराध्यक्षपदाची निवड बिनविरोधच
मोठी बातमी! न्यायालयाने उज्ज्वला थिटेंचा अपील अर्ज फेटाळला; अनगर नगराध्यक्षपदाची निवड बिनविरोधच
Embed widget