एक्स्प्लोर
दिवाळीच्या रात्रीही ना'पाक' कुरापती, आरएसपुरात तुफान गोळीबार
श्रीनगर (जम्मू-काश्मीर) : भारतात दिवाळीचा उत्साह असताना पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमधील आरएसपुरा भागात कुरापती सुरुच ठेवल्या. जम्मू जवळील आर एस पुरा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून तुफान गोळीबार करण्यात आला.
आर एस पुरा भागात रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पाकिस्तानकडून गोळीबार सुरु झाला आणि हा गोळीबार काही तास सुरुच होता. पाकिस्तानकडून ऑटोमॅटिक शस्त्रांच्या साहाय्याने गोळीबार करण्यात आल्याची माहिती मिळते आहे.
आर एस पुरा भागीतील सीमेजवळील अनेक गावांनी याआधीच सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केलं आहे. मात्र, ज्यांनी स्थलांतर केलं नाही, त्यांच्यामध्ये सातत्याने पाकिस्तानकडून होणाऱ्या गोळीबारामुळे दहशतीचं वातावरण आहे. शनिवारी रात्रीही पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करत गोळीबार करण्यात आला होता.
एलओसीवर काल म्हणजे रविवारी दिवसभर शांतता होती. मात्र, रात्री पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. आर एस पुरामधील पाकिस्तानच्या गोळीबाराला बीएसएफनेही सडेतोड उत्तर दिलं.
दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून सातत्याने गोळीबार सुरु असल्याने सीमा भागात तणावाचं वातावरण आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement