एक्स्प्लोर
Advertisement
काश्मीरमधील हिंसाचारासाठी पाकिस्तान जबाबदार, अबु दुजानाची कबुली
काश्मीरमधील हिंसाचारासाठी पाकिस्तानच जबाबदार असल्याची कबुली त्यानं यावेळी दिली आहे. त्यामुळे पाकिस्तानचं पितळ पुन्हा एकदा उघड झालं आहे.
नवी दिल्ली : दोन दिवसांपूर्वी भारतीय सुरक्षा रक्षकांबरोबर झालेल्या चकमकीत कुख्यात पाकिस्तानी दहशतवादी अबु दुजानाचा खात्मा झाला. चकमकीत ठार होण्यापूर्वी दुजानानं आत्मसमर्पणास नकार दिला होता. लष्कराच्या एका अधिकाऱ्यानं काश्मिरी नागरिकाच्या माध्यमातून दुजानाबरोबर फोनवर चर्चा केली होती. या चर्चेचा ऑडिओ टेप सार्वजनिक केल्यानंतर हे समोर आलं आहे.
विशेष म्हणजे, काश्मीरमधील हिंसाचारासाठी पाकिस्तानच जबाबदार असल्याची कबुली त्यानं यावेळी दिली आहे. त्यामुळे पाकिस्तानचं पितळ पुन्हा एकदा उघड झालं आहे.
काय म्हणाला दुजाना?
दुजाना : क्या हाल है? मैने कहा क्या हाल है? अधिकारी : हमारा हाल छोड दुजाना, तु सरेंडर क्यों नही कर देता? तेरी ईस लडकी से शादी हुई है. और तु जो इसके साथ कर रहा है वह ठिक नही है. दुजाना : हम तो निकले थे शहीद होने, मै क्या करु? जिसको (पाकिस्तान) गेम खेलना है खेले. कभी हम आगे कभी आप. मै सरेंडर नही कर सकता. जो मेरी किस्मत मै लिखा है वही होगा. अल्लाह वही करेगा, ठिक है अधिकारी : अपने माता-पिता के बारे में सोचो. दुजाना : माँ-बाप तो उसी दिन मर गये, जिस दिन मै उनको छोड कर आया. अधिकारी : अल्लाह नही चाहता की, किसीको कोई नुकसान पहुंचे. अल्ला सबके लिये एक है. दुजाना : अगर अल्लाह मेरे औरे तुम्हारे लिये एक जैसा है, तो आओ, घर के भीतर मुलाकात करो. दरम्यान, या ऑडिओ टेपनंतर दुजाना हा काश्मीरचाच रहिवासी असल्याचं समोर येत आले. जवळपास 7 वर्षांचा असताना तो पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट भागाचा रहिवासी आहे. वयाच्या 17 व्या वर्षी तो लष्कर-ए-तोयबामध्ये सक्रिय झाला. 2013 मध्ये लष्करचा कमांडर अबू कासिमच्या खात्म्यानंतर, दुजानाला लष्कर-ए-तोयबाने कमांडर म्हणून घोषित केलं. दुजानाचे लष्करासोबत इतर दहशतवादी संघटनांशी लागेबांधे होते. त्यामुळे तो धोकादायक होता. त्याचा भारतीय लष्कराच्या मोस्ट वॉटेंड दहशतवाद्यांच्या यादीत समावेश होता.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement