पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे नरेंद्र मोदींच्या पत्राला उत्तर, दहशतवादाच्या मुद्यावर म्हणाले...
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या पत्राला पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी उत्तर दिले आहे. शाहबाज शरीफ यांनी आपल्या पत्रात दोन्ही देशांमधील शांतता आणि सहकार्य वाढवण्यावर भर दिला आहे.
Shehbaz Sharif Letter to PM Modi : पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्राला उत्तर दिले आहे. शाहबाज शरीफ यांनी आपल्या पत्रात दोन्ही देशांमधील शांतता आणि सहकार्य वाढवण्यावर भर दिला आहे. यासोबतच त्यांनी दोन्ही देशांमधील सामाजिक आणि आर्थिक विकासावर चर्चा करण्याबाबतही पत्रात लिहिले आहे. पंतप्रधान मोदींनी शरीफ यांचे अभिनंदन केले होते. शिवाय दहशतवादमुक्त वातावरण निर्माण करण्याचे आवाहन केले होते.
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पंतप्रधान मोदींनी शाहबाज शरीफ यांना पत्र लिहिले होते. पंतप्रधान मोदींनी या पत्रातून नवीन सरकार स्थापन केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले होते. त्यासोबतच दहशतवादाविरोधात कारवाई करण्याचेही आवाहन केले होते. शरीफ यांनी आता नरेंद्र मोदी यांच्या या पत्राला उत्तर दिले असून त्यामध्ये त्यांनी भारत आणि पाकिस्तामध्ये शांतता आणि सहकार्य वाढवण्यावर भर दिला आहे. यासोबतच शरीफ यांनी दोन्ही देशांमधील सामाजिक आणि आर्थिक विकासावर चर्चा करण्याचाही उल्लेख केला आहे.
इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तान मुस्लिम लीगचे नेते शाहबाज शरीफ हे पाकिस्तानचे 23 वे पंतप्रधान बनले आहेत. शाहबाज शरीफ हे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे भाऊ आहेत. इम्रान खान यांना अविश्वास प्रस्तावाद्वारे पदावरून हटवण्यात आले आहे.
इम्रान खान यांनी 18 ऑगस्ट 2018 रोजी पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती. इम्रान खान तीन वर्षे सात महिने आणि 23 दिवस पंतप्रधान पदावर राहिले.
महत्वाच्या बातम्या
- मोदींनी पाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांना लिहिलं पत्र, नवीन सरकारचे केले अभिनंदन
- पाकिस्तानचे नवे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याकडून भारताने अधिक अपेक्षा का करू नये? जाणून घ्या
- Shahbaz Sharif: शाहबाज शरीफ यांनी घेतली पंतप्रधानपदाची शपथ, मरियम नवाज झाल्या भावूक
- गलती से मिस्टेक हो गया! सभापतींनी पंतप्रधानांचेच नाव चुकवले, शहबाजऐवजी नवाज शरीफ यांच्या नावाची केली घोषणा