एक्स्प्लोर

पाकिस्तानकडून मोदींच्या नावे 2.86 लाखांचं बिल

परदेश दौऱ्यांसाठी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान एअर इंडियाच्या विमानाचा वापर करतात. पंतप्रधान यांच्या परदेश दौऱ्याचा संपूर्ण खर्च परराष्ट्र मंत्रालय उचलतो.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रात सत्तेत आल्यानंतर आतापर्यंत काही परदेश दौऱ्यांसाठी भारतीय वायूदलाच्या एअरक्राफ्टचा वापर केला. एअरक्राफ्टच्या वापरावर भारत सरकारने एकूण 2 कोटींचा खर्च केला. यात 2.86 लाख रुपयांचं बिल पाकिस्तानचं आहे . परदेशी दौऱ्यांच्या दरम्यान ज्या ज्या वेळी पंतप्रधान मोदींचं एअरक्राफ्ट पाकिस्तानच्या आकाशातून गेलं, त्या त्या वेळेचं नेव्हिगेशन चार्जेस पाकिस्तानने आकारले आहेत. हे नेव्हिगेशन चार्जेस 2.86 लाख रुपये एवढे आहेत. निवृत्त कमांडर लोकेश बात्रा यांनी यासंदर्भात आयटीआयमधून माहिती मागवली असता, त्यांना वरील माहिती मिळाली. जून 2016 पर्यंतची माहिती बात्रा यांना देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किती वेळा एअर इंडियाऐवजी आयएएफच्या एअरक्राफ्टचा वापर केला आणि त्यावर किती खर्च झाला, हे जाणून घेण्याासाठी बात्रांनी आरटीआयद्वारे अर्ज केला होता. बात्रांना मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींनी एकूण 11 परदेश दौरे आयएएफच्या एअरक्राफ्टने केले. यामध्ये नेपाळ, भूतान, बांगलादेश, अफगाणिस्तान, कतार, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, रशिया, इराण, फिजी आणि सिंगापूर या परदेश दौऱ्यांचा समावेश आहे. पाकिस्तानने नेमक्या कोणत्या दौऱ्याचं बिल लावलं? 2015 मध्ये रशिया आणि अफगाणिस्तानच्या दौऱ्याहून परतताना पंतप्रधान नरेंद्र मोदी काही वेळासाठी पाकिस्तानात उतरले होते. त्यावेळच्या त्यांच्या भेटीसाठी 1.49 लाख रुपयांचा नेव्हिगेशन चार्ज लावण्यात आला आहे. तसेच, मार्च 2016 मधील इराण दौऱ्यासाठी 77 हजार 215 आणि कतार दौऱ्यासाठी 59 हजार 215 रुपयांचा नेव्हिगेशन चार्ज लावण्यात आला. साधरणत: परदेश दौऱ्यांसाठी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान एअर इंडियाच्या विमानाचा वापर करतात. पंतप्रधान यांच्या परदेश दौऱ्याचा संपूर्ण खर्च परराष्ट्र मंत्रालय उचलतो.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 डिसेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 डिसेंबर 2024 | रविवार
Maharashtra Cabinet Portfolio : खातेवाटपानंतर बहुसंख्य मंत्री आपापल्या मतदारसंघात, ठिकठिकाणी जंगी स्वागत, मंत्रालये जाहीर झाल्यानंतर आता पालकमंत्रीपदाकडे नजरा
खातेवाटपानंतर बहुसंख्य मंत्री आपापल्या मतदारसंघात, ठिकठिकाणी जंगी स्वागत, मंत्रालये जाहीर झाल्यानंतर आता पालकमंत्रीपदाकडे नजरा
PM Modi letter to R Ashwin : प्रत्येकजण ऑफ ब्रेकची अपेक्षा करत असताना तू कॅरम बॉलने चकित केलंस, लोक जर्सी नंबर 99 मिस करतील; पीएम मोदींचे अश्विनला भावनिक पत्र
प्रत्येकजण ऑफ ब्रेकची अपेक्षा करत असताना तू कॅरम बॉलने चकित केलंस, लोक जर्सी नंबर 99 मिस करतील; पीएम मोदींचे अश्विनला भावनिक पत्र
Mumbai Crime : कार मागे घेत असताना धडक बसल्याने 4  वर्षाय चिमुकल्याने जीव गमावला, मुंबईच्या वडाळ्यातील घटनेने हळहळ
कार मागे घेत असताना धडक बसल्याने 4 वर्षाय चिमुकल्याने जीव गमावला, मुंबईच्या वडाळ्यातील घटनेने हळहळ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Praniti Shinde PC | अमित शाहांनी माफी मागितली पाहिजे, प्रणिती शिंदेंची मागणीAjit Pawar Speech Baramati | आता छातीच्या ऐवजी पोटच जास्त फुगतं, अजितदादांनी बारामतीची सभा गाजवलीAjit Pawar Baramati | निकाल असा लागला की, सगळे म्हणताय दादा माझं दादा माझं... पण अजित पवार म्हणालेAjit Pawar on Santosh Deshmukh Case | देशमुखांच्या मास्टरमाईंडला सोडणार नाही, अजितदादा म्हणाले....

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 डिसेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 डिसेंबर 2024 | रविवार
Maharashtra Cabinet Portfolio : खातेवाटपानंतर बहुसंख्य मंत्री आपापल्या मतदारसंघात, ठिकठिकाणी जंगी स्वागत, मंत्रालये जाहीर झाल्यानंतर आता पालकमंत्रीपदाकडे नजरा
खातेवाटपानंतर बहुसंख्य मंत्री आपापल्या मतदारसंघात, ठिकठिकाणी जंगी स्वागत, मंत्रालये जाहीर झाल्यानंतर आता पालकमंत्रीपदाकडे नजरा
PM Modi letter to R Ashwin : प्रत्येकजण ऑफ ब्रेकची अपेक्षा करत असताना तू कॅरम बॉलने चकित केलंस, लोक जर्सी नंबर 99 मिस करतील; पीएम मोदींचे अश्विनला भावनिक पत्र
प्रत्येकजण ऑफ ब्रेकची अपेक्षा करत असताना तू कॅरम बॉलने चकित केलंस, लोक जर्सी नंबर 99 मिस करतील; पीएम मोदींचे अश्विनला भावनिक पत्र
Mumbai Crime : कार मागे घेत असताना धडक बसल्याने 4  वर्षाय चिमुकल्याने जीव गमावला, मुंबईच्या वडाळ्यातील घटनेने हळहळ
कार मागे घेत असताना धडक बसल्याने 4 वर्षाय चिमुकल्याने जीव गमावला, मुंबईच्या वडाळ्यातील घटनेने हळहळ
Raksha Khadse : नाथाभाऊ अन् गिरीश महाजनांमध्ये विधानपरिषदेत खडाजंगी, आता रक्षा खडसेंचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या, दोघांना एकत्र आणण्यासाठी...
नाथाभाऊ अन् गिरीश महाजनांमध्ये विधानपरिषदेत खडाजंगी, आता रक्षा खडसेंचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या, दोघांना एकत्र आणण्यासाठी...
Tuljapur : धमकी देणाऱ्या पवनचक्की ठेकेदाराच्या गुंडांवर कारवाई होणार; तुळजापूरमधील शेतकरी कुटुंबीयांचे आंदोलन मागे
धमकी देणाऱ्या पवनचक्की ठेकेदाराच्या गुंडांवर कारवाई होणार; तुळजापूरमधील शेतकरी कुटुंबीयांचे आंदोलन मागे
LIC Policy Maturity Claim : LIC कडे तब्बल 881 कोटी रुपये पडून; तुमचा पैसा सुद्धा यामध्ये आहे का? तपासण्यासाठी 'या' स्टेप्स फाॅलो करा!
LIC कडे तब्बल 881 कोटी रुपये पडून; तुमचा पैसा सुद्धा यामध्ये आहे का? तपासण्यासाठी 'या' स्टेप्स फाॅलो करा!
Congress on Amit Shah : अमित शाहांविरोधात काँग्रेसचा एल्गार; राजीनाम्यासाठी 26 जानेवारीपर्यंत देशव्यापी आंदोलनाची घोषणा, बेळगावात भव्य रॅली
अमित शाहांविरोधात काँग्रेसचा एल्गार; राजीनाम्यासाठी 26 जानेवारीपर्यंत देशव्यापी आंदोलनाची घोषणा, बेळगावात भव्य रॅली
Embed widget