एक्स्प्लोर
Advertisement
भारताचे 50 जवान पाकिस्तानच्या हनी ट्रॅपमध्ये!
अनिका चोप्रा नावाचं बनावट फेसबुक अकाऊंट पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयएसचं असून ते पाकिस्तानमधूनच ऑपरेट केलं जात होतं.
जैसलमेर : सुमारे 50 भारतीय जवान पाकिस्तानच्या हनी ट्रॅपमध्ये अडकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे जवान मिलिट्री इंटेलिजन्सच्या रडारवर असल्याचंही कळतं. राजस्थानच्या जैसलमेरमधून सोनबीर सिंह नावाच्या जवानाच्या अटकेनंतर ही बाब समोर आली आहे.
आयएसआयची महिला एजंट अनिका चोप्रा नावाच्या बनावट फेसबुक अकाऊंटच्या माध्यमातून जवानांना जाळ्यात ओढ्यात होती. या एजंटने आपण भारतीय सैन्यातील नर्स असल्याचं सांगितलं. सुमारे 50 जवान या फेसबुक अकाऊंटच्या संपर्कात होते. ही महिला व्हिडीओ कॉल करुन जवानांपुढे अश्लील नृत्य करत असे.
आणखी 50 जवान फ्रेण्डलिस्टमध्ये
सोनबीर हा जैसलमेरमधील आर्म्ड-ब्रिगेडमध्ये अर्जुन बॅटल टँकवर तैनात होता. अनिका चोप्रा या अकाऊंटसोबत मागील काही काळापासून संपर्कात होता. त्या अकाऊंटची चौकशी केली असता आणखी 50 जवान या अकाऊंटच्या फ्रेण्डलिस्टमध्ये असल्याचं समजलं. या 50 जणांनी अनिका चोप्रा नावाच्या बनावट अकाऊंटला भारतीय सैन्याशी संबंधित संवेदनशील माहिती लीक तर केली नाही ना, यासाठी त्यांची मिलिस्ट्री चौकशी करण्यात येणार आहे.
'तसल्या' फोटोंसाठी भारतीय जवान पाकच्या हनी ट्रॅपमध्ये
संवेदनशील माहिती लीक
अनिका चोप्रा नावाचं बनावट फेसबुक अकाऊंट पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयएसचं असून ते पाकिस्तानमधूनच ऑपरेट केलं जात होतं. पाकिस्तानच्या या एजंट फेसबुकवर स्वत:ला भारतीय सैन्यातील एमएनएस म्हणजेच मिलिट्री नर्सिंग सर्व्हिसची नर्स असल्याचं लिहिलं आहे. तर त्यामधील लोकेशन गुजरातच्या जुनागडचं आहे. त्यामुळे सोमबीर त्याच्या जाळ्यात अडकला आणि तिला सैन्याशी संबंधित संवेदनशील माहिती, फोटो, व्हिडीओ पाठवू लागला. सोमबीरने पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला आतापर्यंत भारतीय सैन्याची राजस्थानमध्ये झालेली गोपनीय कारवाई, पाकिस्तान सीमेजवळ तैनात आर्म्ड ब्रिगेड आणि अर्जुन टँकशी संबंधित माहिती लीक केली आहे.
सोमबीरला 4 जानेवारी रोजी राजस्थानच्या जैसलमर लष्करी तळावरुन अटक करण्यात आली होती. त्याच्यावर प्रशासकीय गोपनीयतेच्या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या तो राजस्थान पोलिसांच्या कोठडीत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement