एक्स्प्लोर

Pahalgam Terror Attack :  नेमका कसा झाला हल्ला ते कुठून आले दहतशवादी? पहलगाम हल्ल्यानंतरचे 10 मोठे प्रश्न?  

जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यंटकांवर हल्ला (Pahalgam Terror Attack) केला आहे. यामध्ये 28 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेसंदर्भात 10 प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Pahalgam Terror Attack :  जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यंटकांवर हल्ला (Pahalgam Terror Attack) केला आहे. यामध्ये 28 जणांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यानंतर पहलगाम खोऱ्यात दहशतीचे वातावरण आहे. आता लोक तिथे जायलाही भीत आहेत. या दहशतवादी हल्ल्यानंतर 10 महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होत आहेत. दहशतवाद्यांनी नेमका कसा हल्ला केला? त्यांनी शस्त्रे  कोणती वापरली? किती दहशतवादी होते? पर्यटकांशी ते नेमकं काय बोलले? यासंदर्बातील सविस्तर माहिती जाणून घेऊयात. 

पहलगाममध्ये जिथं हा हल्ला झाला त्या भागाला मिनी स्वित्झर्लंड असेही म्हटलं जातं. जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये  22 एप्रिलची सकाळ तितकीच आल्हाददायक होती, जितकी देश-विदेशातील पर्यटक पाहायला येतात. मात्र, 22 एप्रिलला दुपारी येथील दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला अन् बर्फाची पांढरी शुभ्र चादर रक्ताने माखली. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर 10 मोठे प्रश्न उपस्थित होत आहेत. जाणून घेऊयात याबाबतची माहिती. 

1) जम्मू-काश्मीरच्या कोणत्या भागात दहशतवादी हल्ला झाला, तिथे आता काय परिस्थिती?

जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्हा आणि त्याचा पहलगाम परिसर अनेकदा दहशतवाद्यांच्या लक्ष्यावर असतो. परंतू, यापूर्वी बैसरन खोऱ्यात कधीही दहशतवादी हल्ला झाला नव्हता. या भागात स्थानिक लोकांनंतर पर्यटक सर्वात सुरक्षित मानले जात होते. यामुळे येथे लष्कर किंवा पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले नव्हते. या परिस्थितीचा फायदा घेत दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळ्या झाडल्या.

2) दहशतवाद्यांनी पर्यटकांशी काय संभाषण केले?

बैसरण खोऱ्यातील दहशतवादी हल्ल्यानंतर अनेक महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत.  हल्ला करण्यापूर्वी दहशतवाद्यांनी पर्यटकांशी संवाद साधला होता. पोलिसांचा गणवेश परिधान करून दहशतवादी घटनास्थळी पोहोचले होते. तेव्हा पर्यटकांना ते पोलिसच वाटले. अशा स्थितीत लोक त्याच्या प्रश्नांची उत्तरे अगदी आरामात देऊ लागले. त्याने एका माणसाला त्याचे नाव विचारले आणि त्याच्यावर गोळी झाडली. यानंतर पर्यटकांमध्ये गोंधळ उडाला. लोक इकडे-तिकडे धावू लागले, पण दहशतवाद्यांनी निर्दयीपणे गोळीबार करुन 28 निष्पाप लोकांचा बळी घेतला. यामध्ये दोन परदेशी नागरिकांचाही समावेश आहे.

3) दहशतवादी कुठून आले आणि ते बैसरन खोऱ्यात कसे पोहोचले?

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर गुप्तचर यंत्रणा सातत्याने तपास करत आहेत. या हल्ल्याचा कट पाकिस्तानातील रावळकोटमध्ये रचण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचवेळी दहशतवाद्यांनी पहलगामला जाण्यासाठी पीर पंजाल टेकड्यांचा पर्याय निवडला. वास्तविक, दहशतवादी पीर पंजाल डोंगरातून भारतात घुसले. यानंतर तो राजौरीहून चत्रू आणि नंतर वाधवन मार्गे पहलगामला पोहोचला. येथे बसरल खोऱ्यात दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला.

4) दहशतवाद्यांनी कोणती शस्त्रे वापरली?

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्याचवेळी, प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी AK-47 चा वापर केल्याचे मानले जात आहे. 1947 मध्ये बनवलेल्या AK-47 रायफलचे पूर्ण नाव ऑटोमॅटिक कलाश्निकोव्ह 47 आहे. ती मिखाईल कलाश्निकोव्हने बनवली होती. महत्त्वाची बाब म्हणजे संपूर्ण जगात एके-47 सर्वाधिक बेकायदेशीरपणे विकली जाते.

5) या हल्ल्याची जबाबदारी कोणत्या पाकिस्तानी संघटनेने घेतली?

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी टीआरएफ या दहशतवादी संघटनेने घेतली आहे. लष्कर-ए-तैयबाशी जोडलेल्या या दहशतवादी संघटनेचे पूर्ण नाव द रेझिस्टन्स फ्रंट आहे. काश्मीरमध्ये टीआरएफच्या दहशतवाद्यांनी अनेक हल्ले केले आहेत. पहलगाममधील हल्ला टीआरएफच्या फाल्कन पथकाने केला होता.

6) टीआरएफचे फाल्कन पथक किती धोकादायक आहे?

टीआरएफचे फाल्कन पथक किती धोकादायक आहे? असा प्रश्न सर्वांनाच पडला असेल.  तर फाल्कन स्क्वॉड हे टीआरएफचे सर्वात भयंकर आणि चपळ पथक मानले जाते. हे पथक अवघ्या पाच ते दहा मिनिटांत हल्ला करून तेथून पळून जाते. या पथकात समाविष्ट असलेले दहशतवादी काही मिनीटातच निष्पापांना लक्ष्य करतात.

7) आतापर्यंत किती पर्यटकांचा मृत्यू झाला? 

पहलगाम हल्ल्यात आतापर्यंत 28 जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याची माहिती मिळत आहे. यातील 23 जण देशाच्या विविध राज्यांतून जम्मू-काश्मीरला भेट देण्यासाठी गेले होते. याशिवाय दोन परदेशी नागरिकांचाही या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. यातील एक पर्यटक नेपाळमधून तर दुसरा यूएईमधून आला होता. त्याचवेळी एका स्थानिक व्यक्तीलाही आपला जीव गमवावा लागला आहे. याशिवाय अनेकजण जखमी झाले आहेत.

8) एजन्सींनी इनपुट दिले होते, मग चूक कुठे झाली?

जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याबाबत सुरक्षा यंत्रणांना सूचना मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. दहशतवादी दक्षिण काश्मीरमधील कोणत्याही मोठ्या पर्यटनस्थळाला लक्ष्य करु शकतात, असे सांगण्यात आले. गैर-काश्मीरी नागरिकांना धार्मिक कारणावरून लक्ष्य केले जाऊ शकते, असेही या इनपुट्समध्ये नमूद करण्यात आले होते. या माहितीच्या आधारे जम्मू-काश्मीर पोलीस आणि लष्कराचे जवान तपास करत होते. दरम्यान, बैसरन व्हॅलीमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला.

9) या हल्ल्यावर भारत काय कारवाई करणार?

पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला सौदी अरेबिया दौरा अर्धवट सोडून परतले आहेत. गृहमंत्री अमित शाह जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचले आहेत. त्यांनी हल्ल्यातील पीडितांची भेट घेतली. त्याचवेळी संरक्षण मंत्रालयाने लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या सर्व तुकड्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय जम्मू-काश्मीर पोलिसांनी पीडितांशी झालेल्या संभाषणाच्या आधारे दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी केली आहेत. तर जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे.

10) या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात पाकिस्तानने काय म्हटले?

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानने एक निवेदन जारी केले आहे. पहलगाममधील हल्ल्याशी पाकिस्तानचा काहीही संबंध नाही, असे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी सांगितले. आम्ही सर्व प्रकारचा दहशतवाद नाकारतो. मात्र, पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी हवाई दलाच्या कारवाया वाढल्या आहेत. असे सांगितले जात आहे की 22 एप्रिलच्या रात्री पाकिस्तानी वायुसेना अलर्टवर होती. पाकिस्तानच्या कराचीस्थित दक्षिण हवाई कमांडपासून लाहोर आणि रावळपिंडीजवळील उत्तरेकडील तळांवर विमानांच्या हालचालींची नोंद करण्यात आली आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Pahalgam Terror Attack : पहलगामधील दहशतवादी हल्ल्याचे पाकिस्तान कनेक्शन, गुप्तचर यंत्रणांनी दिली महत्वाची माहिती 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

SBI : आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले, कोणाला फायदा होणार? 
आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर गगनाला भिडले, विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले....
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर नियंत्रणावर केंद्रीय मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या
Maharashtra Live Updates: महानगरपालिका निवडणूक लढवण्यासाठी पुण्यात भाजपमधील इच्छुकांची गर्दी
Maharashtra Live Updates: महानगरपालिका निवडणूक लढवण्यासाठी पुण्यात भाजपमधील इच्छुकांची गर्दी
ट्रम्प यांनी टॅरिफ लादलं, भारतानं जुमानलं नाही, रशियाकडून तेल खरेदी सुरुच ठेवली, नोव्हेंबरमध्ये विक्रमी तेल खरेदी
ट्रम्प टॅरिफला न जुमानता भारताची रशियाकडून विक्रमी तेल खरेदी, नोव्हेंबरची आकडेवारी समोर

व्हिडीओ

Savarkar Statue Andaman : सावरकरांना वंदन, पुतळ्याचं अनावरण Special Report
Maratha Reservation Hyderabad gazette : हैदराबाद गॅझेटचा खरंच फायदा झाला का? Special Report
CBSE Syllabus : CBSE भोंगळ कारभारावर शिवप्रेमींचा संताप Special Report
Nashik Tapovan Kumbhmela :  तपोवनचा वाद, संतापला हरित लवाद Special Report
Shiv Sena-BJP Alliance : महानगर पालिका निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना यांच्यात युती Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SBI : आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले, कोणाला फायदा होणार? 
आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर गगनाला भिडले, विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले....
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर नियंत्रणावर केंद्रीय मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या
Maharashtra Live Updates: महानगरपालिका निवडणूक लढवण्यासाठी पुण्यात भाजपमधील इच्छुकांची गर्दी
Maharashtra Live Updates: महानगरपालिका निवडणूक लढवण्यासाठी पुण्यात भाजपमधील इच्छुकांची गर्दी
ट्रम्प यांनी टॅरिफ लादलं, भारतानं जुमानलं नाही, रशियाकडून तेल खरेदी सुरुच ठेवली, नोव्हेंबरमध्ये विक्रमी तेल खरेदी
ट्रम्प टॅरिफला न जुमानता भारताची रशियाकडून विक्रमी तेल खरेदी, नोव्हेंबरची आकडेवारी समोर
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
Embed widget