Pahalgam terror attack: पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा मिळालेला इशारा; मोहीम थांबताच झाला हल्ला, 'या' ठिकाणी हल्ल्याचे होते संकेत, शोधमोहिमेसह सतर्कता बाळगूनही घडलं अघटित
Pahalgam terror attack: श्रीनगरच्या उपनगरांमधील पर्वतरांगांच्या पायथ्याशी हॉटेलमध्ये पर्यटकांवर हल्ला होण्याचे संकेत मिळाले होतेय त्यानंतर शोधमोहिमेसह सतर्कता बाळगण्यात आली होती. मात्र, तरीही ही घटना घडली.

Pahalgam terror attack: जम्मू काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam terror attack) या ठिकाणी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांचा मृत्यृ झाला आहे. त्यातील 6 जण महाराष्ट्रातील होते. दरम्यान ही दुर्दैवी घटना होण्याआधी गुप्तचरांचा इशारा मिळाला होता. राजधानी श्रीनगरच्या उपनगरांमध्ये झबरवान पर्वतरांगांच्या पायथ्याशी असलेल्या हॉटेलमध्ये थांबलेल्या पर्यटकांना दहशतवादी लक्ष्य करू शकतात, असा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला होता अशी माहिती या प्रकरणाशी संबंधीत अधिकाऱ्यांनी काल (शनिवारी) दिली आहे. त्यामुळे या भागातील सुरक्षेत वाढ करून डाचीगाम, निशात परिसरात मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम, झाडा-झडती घेण्यात आली होती. मात्र काही संशयास्पद न आढळल्याने ही मोहीम 22 एप्रिल रोजी थांबवली होती. नेमकं त्याच दिवशी दहशतवाद्यांनी पहलगाममधील (Pahalgam terror attack) बैसरन घाटीत पर्यटकांवर गोळीबार केला, यामध्ये 26 जणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. (Pahalgam terror attack)
गुप्तचर यंत्रणांच्या इशाऱ्यानुसार वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या सर्व परिसरावर लक्ष ठेवून होते. त्या परिसरात हाती घेतलेल्या शोधमोहिमेत कोणतीही संशयास्पद गोष्ट, अथवा काहीही संशयास्पद आढळून आलं नाही. त्यामुळे 22 एप्रिलला संबंधीत शोधमोहीम थांबवण्यात आली होती. त्याच दिवशी लक्ष ठेवून असलेल्या परिसर सोडून हल्लेखोरांनी पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला केला. अधिकाऱ्यांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार, बैसरन घाटी येथे दोन स्थानिक दहशतवादी पर्यटकांमध्ये मिळाल्याची माहिती आहे. त्यांनी गोळीबार (Pahalgam terror attack) करून काही पर्यटकांना एका फूड कोर्ट कॉम्प्लेक्समध्ये नेले. त्या ठिकाणी आणखी दोन पाकिस्तानी दहशतवादी होते. त्यांनी 26 जणांची हत्या केली. लोकांमध्ये भीती निर्माण व्हावी आणि देशात इतर ठिकाणी स्थानिक लोकांकडून काश्मिरी नागरिकांवर हल्ले व्हावे, अशा हेतूनेही हा दहशतवादी हल्ला करण्यात आला आहे. (Pahalgam terror attack)
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यावेळी वर्तवली होती हल्ल्याची शक्यता
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) हे 19 एप्रिल रोजी कटरा ते श्रीनगर रेल्वेचे उद्घाटन करणार होते. परंतु त्या दिवशी कटरा या ठिकाणी वेगवान वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (PM Modi) हा दौरा पुढे ढकलण्यात आला. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर दहशतवाद्यांनी अशा हल्ल्याचा कट रचला असल्याचा इशारा गुप्तचर संघटनांनी दिला होता. काश्मीरमध्ये होत असलेल्या विकासामुळे नाराज झालेल्या पाकिस्तानने दहशतवादी हल्ल्याचा कट रचला, अशी माहिती काश्मीरमधील अधिकाऱ्यांनी दिली आहे. (Pahalgam terror attack)
























