Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यानंतर एकनाथ शिंदें फिल्डवर, श्रीनगरमधून 184 पर्यटक सुखरुप मायभूमीत परतणार, मदतकार्य जोरात
पहलगाम हल्ल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ॲक्शन मोडवर, श्रीनगरमधून 184 पर्यटक सुखरुप परतणार, मदतकार्य सुरु

Pahalgam Terror Attack: काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांना आपला जीव गमवावा लागला .दहशतवाद्यांच्या या भ्याड हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा मृत्यू झाला होता . दरम्यान काश्मीरमध्ये अजूनही अनेक पर्यटक वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेले आहेत .काश्मीरमधल्या पर्यटकांना परत आणण्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) बुधवारी रात्रीच काश्मीरमध्ये दाखल झाले होते . जम्मू काश्मीर येथे अडकलेल्या पर्यटकांसाठी आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत .काश्मीर मधून आणखी 184 पर्यटक महाराष्ट्रात सुखरूप परतणार असल्याची माहिती आहे .
श्रीनगरमध्ये मदतकार्य सुरु, पर्यटक कसे येणार?
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाव येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तिथे राज्यातील अनेक पर्यटक अडकून पडले होते. या पर्यटकांना सुखरूप मुंबईत घेऊन येणारे पहिले विमान काल पहाटे साडे तीन वाजता मुंबईत उतरले. तर आज दुपारी दोन वाजता उर्वरित पर्यटकांना घेऊन जाणारे दुसरे विमानही मुंबईकडे मार्गस्थ झाले. या विमानात एकूण 184 पर्यटक असून त्यांना या विशेष विमानाने मुंबईत आणण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः त्यांच्याशी संवाद साधून त्याना आशवस्त करून मुंबईकडे रवाना केले. यावेळी या पर्यटकांनी आवर्जून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. तसेच आमच्या संकटकाळी आमचा लाडका भाऊ मदतीसाठी धावून आल्याबद्दल समाधान वाटत असल्याची भावना त्यांच्याकडे व्यक्त केली.
पर्यटकांचे पहिले विमान काल उतरले
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाव येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तिथे राज्यातील अनेक पर्यटक अडकून पडले होते. या पर्यटकांना सुखरूप मुंबईत घेऊन येणारे पहिले विमान काल पहाटे साडे तीन वाजता मुंबईत उतरले. तर आज दुपारी दोन वाजता उर्वरित पर्यटकांना घेऊन जाणारे दुसरे विमानही मुंबईकडे मार्गस्थ झाले.
आज संध्याळाळी184 पर्यटकांना घेऊन येणार दुसरे विमान
या विमानात एकूण 184 पर्यटक असून त्यांना या विशेष विमानाने मुंबईत आणण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः त्यांच्याशी संवाद साधून त्याना आशवस्त करून मुंबईकडे रवाना केले. यावेळी या पर्यटकांनी आवर्जून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. तसेच आमच्या संकटकाळी आमचा लाडका भाऊ मदतीसाठी धावून आल्याबद्दल समाधान वाटत असल्याची भावना त्यांच्याकडे व्यक्त केली.
तसेच तत्पूर्वी शिंदे यांनी या पर्यटकांना त्यांच्या हॉटेल्समधून विमानतळाकडे रवाना केले. यावेळी या पर्यटकांचा ताण हलका करण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्यासोबत खास फोटोसेशनही केले. राज्यातील 184 पर्यटकांना घेऊन निघालेले हे विमान आज संध्याकाळी 5 वाजता मुंबई विमानतळावरील टर्मिनल-1 येथे पोहोचणार आहे.
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर राज्यातील काही पर्यटक हे जम्मू काश्मीरमध्ये अडकून पडले होते. या सर्वांना सुखरूप परत आणणे हे एक आव्हान होते. तेथील पर्यटकांशी बोलल्यावर ते भीतीच्या सावटाखाली असल्याचे मला समजले. त्यांना धीर देऊन पुन्हा राज्यात आणण्यासाठी मी… pic.twitter.com/TORGWSSmNS
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) April 24, 2025
दहशतवादी हल्ल्यात 28 जणांचा मृत्यू
जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 28 जणांचा मृत्यू झालाय. हल्ल्यात महाराष्ट्रातील एकूण 6 पर्यटकांचा मृत्यू झालाय. यात डोंबिवलीच्या तिघांचा समावेश आहे. तर पुण्यातील दोन आणि पनवेलच्या एका पर्यटकाचा मृत्यू झालाय. डोंबिवलीचे अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी यांचा या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालाय. पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. तर पनवेलमधील दिलीप देसले यांचाही हल्ल्यात मृत्यू झालाय. तर महाराष्ट्रातले एस बालचंद्रू, सुबोध पाटील, शोबीत पटेल हल्ल्यात जखमी झाले आहेत.
हेही वाचा:

























