एक्स्प्लोर
Advertisement
VIDEO : लोकसभेत भाजपच्या ‘वंदे मातरम्’ला ओवेसींकडून ‘जय भीम’, ‘अल्लाह हू अकबर’ने उत्तर
एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी शपथ घेण्यासाठी उभे राहिले असता ‘भारत माता की जय’ अशी घोषणाबाजी होण्यास सुरुवात झाली. यानंतर ओवेसी यांनी इशाऱ्याने आणखीन जोरात घोषणा देण्यातं आव्हान दिलं.
नवी दिल्ली : मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचं पहिलं अधिवेशन आणि 17 व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनात शपथविधी सोहळा सुरु आहे. शपथविधी सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी आज खासदारकीची शपथ घेतली. खासदार असदुद्दीन ओवेसी शपथ घेण्यासाठी उभे राहताच सत्ताधाऱ्यांच्या बाकांवरुन ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ च्या घोषणा दिल्या गेल्या.
एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी शपथ घेण्यासाठी उभे राहिले असता ‘भारत माता की जय’ अशी घोषणाबाजी होण्यास सुरुवात झाली. यानंतर ओवेसी यांनी इशाऱ्याने आणखीन जोरात घोषणा देण्यातं आव्हान दिलं. काही वेळानंतर जेव्हा घोषणांचा आवाज कमी झाला असता ओवेसी यांनी उर्दूमध्ये शपथ घेण्यास सुरुवात केली. शपथेचा शेवट करताना ओवेसी यांनी ‘जय भीम’, ‘जय मीन’, ‘तखबीर’, ‘अल्ला हू अकबर’, ‘जय हिंद’ म्हणत शपथेचा शेवट केला.
दरम्यान लोकसभेतील सत्ताधाऱ्यांच्या घोषणांवर ओवेसी यांनी सडकून टीका केली. किमान मला बघून तरी सत्ताधाऱ्यांना ‘भारत माता की जय’ घोषणेची आठवण आली. तसेच सत्ताधाऱ्यांना संविधान आणि मुजफ्फरमधील चमकीच्या तापाने मृत्यूमुखी पडलेल्या मुलांची आठवण असती तर अधिक चागंल झालं असत अशी टीका ओवेसी यांनी केली आहे. Asaduddin Owaisi | असदुद्दीन ओवेसींनी लोकसभेत घेतली खासदारकीची शपथ | नवी दिल्ली | ABP Majha लोकसभा निवडणुकीत असदुद्दीन ओवेसी यांनी प्रकाश आंबेडकर यांच्याशी हातमिळवणी केली होती. भाजपाच्या विरोधात काँग्रेस व राष्ट्रवादीची महाआघाडी असतानाही प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघ आणि एमआयएम यांने निवडणुका एकत्र लढण्याचे जाहीर केले होते. मात्र राज्यात त्यांना अपेक्षित यश मिळालं नाही. यापूर्वी भोपाळमधून निवडून आलेल्या भाजपाच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी संस्कृतमध्ये शपथ घेण्यास सुरुवात केली आणि त्यावरचं विरोधकांनी आक्षेप घेत गोंधळ घातला. साध्वी प्रज्ञा सिंह यांनी संस्कृतमध्ये ‘मैं साध्वी प्रज्ञा सिंह ठाकुर स्वामी पूर्णचेतनानंद अवधेशानंद गिरी लोकसभा सदस्य के रूप में” अशी सुरुवात करत शपथ घेण्यास सुरुवात केली असता विरोधकांनी जोरदार विरोध करत त्यांना थांबवण्यास भाग पाडलं.#WATCH: Slogans of Bharat Mata ki Jai and Vande Mataram raised in the Lok Sabha as AIMIM MP from Hyderabad Asaduddin Owaisi comes to take his oath. He concluded his oath with "Jai Bhim! Takbir! Allahu Akbar! Jai Hind!" pic.twitter.com/TGt7bRfDfC
— ANI (@ANI) June 18, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
बॉलीवूड
निवडणूक
महाराष्ट्र
Advertisement