Operation Sindoor : पाकिस्तानच्या शहरांवर घणाघाती आघात, रडार यंत्रणा नष्ट; भारताचे पाकिस्तानवर दहा मोठे हल्ले
India Attack On Pakistan : केंद्र सरकारने भारतीय वायू दलाला पूर्ण मोकळीक दिली असून पाकिस्तानी विमान हवेत दिसले तर त्याला तोडीस तोड उत्तर देण्यात येणार आहेत.

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर हल्ला करुन ती उद्ध्वस्त केल्यानतंर ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) हे सुरूच राहणार असल्याचं भारताने त्याच्या कृतीतून स्पष्ट केलं आहे. भारताने आता लाहोर, कराचीपर्यंत जाऊन ड्रोनच्या माध्यमातून पाकिस्तानची रडार यंत्रणा उद्ध्वस्त (India Attack On Pakistan) केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे भारतीय विमाने आता पाकिस्तानच्या हद्दीत घुसून कारवाई करतील आणि ते पाकिस्तान ट्रॅक करु शकणार नाही. याचसोबत पाकिस्तानच्य विविध ठिकाणी बॉम्ब स्फोट होत असून त्यामुळे संपूर्ण पाकिस्तामध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
सिंदूर ऑपरेशनमध्ये भारताने आधी पाकिस्तानच्या 9 दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केला. त्यानंतर ही कारवाई सुरुच असून पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद आता मुळासकट संपवण्यावर भारताचा भर आहे. भारतीय वायुदलाला यासाठी सरकारने खास सूट दिली असून पाकिस्तानी विमानं आकाशात दिसल्यास तोडीस तोड उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.
India Attack On Pakistan : पाकिस्तानच्या नऊ शहरांवर ड्रोन हल्ले
भारतानं पाकिस्तानच्या 9 शहरांत ड्रोन हल्ले केल्याची माहिती समोर आली आहे. लाहोर, रावळपिंडी, कराचीमध्ये ड्रोन हल्ला झाल्याचं पाकिस्तानचं म्हणणं आहे. लाहोरमधल्या लष्करी तळावर भारतानं हल्ला केल्याचा दावा करण्यात आला.
गुजरानवाला आणि अटक शहरांवरही भारताचे ड्रोन हल्ले झालेत असा पाकिस्तानचा दावा आहे. भारताचे 12 ड्रोन पाडल्याचा पोकळ दावाही पाकिस्ताननं यावेळी केला. पाकिस्तानमधली मोठमोठी शहरं ड्रोन हल्ल्यानं हादरली आहेत. पाकिस्तानच्या आयएसपीआरचे महासंचालक ले.जन.अहमद शरीफ यांनी हा दावा केला.
India Destroyed HQ 9 system : पाकिस्तानची HQ-9 हवाई संरक्षण यंत्रणा उद्ध्वस्त
भारताने पाकिस्तानची HQ-9 हवाई संरक्षण यंत्रणा उद्ध्वस्त केली आहे. भारताचे हवाई हल्ले रोखण्यासाठी ही यंत्रणा चीनकडून आयाय करण्यात आली होती. एकाचवेळी 100 टार्गेट ट्रॅक करुन ते उद्ध्वस्त करण्याची क्षमता या यंत्रणेची होती, हीच यंत्रणा भारताने उद्ध्वस्त केली.
Drone Attack On Lahor : लाहोरमध्ये स्फोट, पाकिस्तानमध्ये भीतीचं वातावरण
पाकिस्तानातील लाहोरमध्ये स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. लाहोरमधील वॉल्टन एअर फिल्ड परिसरात हा स्फोट झाला. या स्फोटानंतर लाहोरमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली असून शहरभर सायरनही वाजवण्यात आला.
लाहोरमध्ये 'नोटीस टू एअर मिशन' जारी करण्यात आलं आहे. त्याचसोबत सीमेवर पाकिस्तानकडून युद्धसामग्री आणि रणगाडेही तैनात करण्यात आले आहेत.
Baluchistan : बलुचिस्तानमध्ये 12 पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू
पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील बोलन पास परिसरात IED स्फोटात 12 पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाला आहे. बलुच लिबरेशन आर्मीने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.
India Air Force Attack On Pakistan : भारतीय हवाई हद्दीकडे येणारी टार्गट्स पाडली
भारतीय वायुदलाने रात्री S-400 एअर डिफेन्स सिस्टीम डागली. भारतीय हद्दीकडे येणारी टार्गेट्स एस 400 ने उडवल्याची माहिती एएनआय वृत्तसंस्थेने दिली आहे.
भारतातल्या 15 शहरांतल्या लष्करी तळांवर हल्ल्याचा प्रयत्न फोल
भारताच्या 15 शहरांवर पाकिस्तानचा हल्ल्याचा प्रयत्न झाला. पण हा हल्ला निकामी करत पाकिस्तानचा प्रयत्न भारताने उधळल्याची माहिती लष्कराने दिली. भारतातील अमृतसर,अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोटमध्ये हल्ल्याचा प्रयत्न झाला. तसेच जालंधर, भूज, आदमपूर, बठिंबा, लुधियानावर हल्ल्याचा प्रयत्न झाला
India Destroyed Pakistan Rocket : पाकिस्तानी रॉकेट पाडलं
अमृतसरजवळच्या जेठुवाल गावात रात्री पाकिस्तानी रॉकेट पाडण्यात आलं. भारतीय सैन्याने त्या रॉकेटचे अवशेष ताब्यात घेतले.























