एक्स्प्लोर
भारतात 2020 पासून फक्त ‘बीएस-6’च्या गाड्या विकल्या जाणार
भारतात 1 एप्रिल 2020 पासून फक्त ‘बीएस-6’ इंधनयुक्त गाड्या विकल्या जातील, अशी माहिती पेट्रोलियम मंत्रालयाने सुप्रीम कोर्टात दिली. वाढत्या प्रदुषणाला आळा घालण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.
नवी दिल्ली : भारतात 1 एप्रिल 2020 पासून फक्त ‘बीएस-6’ इंधनयुक्त गाड्या विकल्या जातील, अशी माहिती पेट्रोलियम मंत्रालयाने सुप्रीम कोर्टात दिली. वाढत्या प्रदुषणाला आळा घालण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.
ज्या गाड्या ‘बीएस-6’ इंधनयुक्त नाहीत त्यांची विक्री 31 मार्च 2020 पर्यंतच होणार आहे. ‘व्यावसायिक आणि खासगी वाहनांसाठी डिझेलच्या वेगवेगळ्या किमती ठेवता येणार नाहीत,’ असंही केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात म्हटलं आहे.
‘बीएस-3, बीएस-4, आणि बीएस-6 या गाड्या ओळखता याव्यात यासाठी त्यांना वेगवेगळ्या रंगाचे स्टिकर देता येतील का?’ असा प्रश्न सुप्रीम कोर्टाने EPCA ला (पर्यावरण प्रदुषण प्रतिबंध आणि संरक्षण समिती) विचारला. ‘बीएस-6 गाड्यांच्या नंबर प्लेटचा रंग वेगळा ठेवण्यात यावा,’ असा सल्लाही कोर्टाने दिला.
‘बीएस-6 इंधनातून सल्फरचे प्रमाण बीएस-4 च्या तुलनेत पाच पटींनी कमी होईल. हे जास्त स्वच्छ इंधन आहे. या इंधनाच्या वापरामुळे जुन्या गाड्यांमुळे होणारं प्रदूषणही कमी होणार आहे,’ अशी माहिती विज्ञान आणि पर्यावरण केंद्राने दिली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
महाराष्ट्र
क्रीडा
Advertisement