लष्कराच्या कारवाईत तीन दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद
जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात भारतीय सैन्य आणि दहशतवादी यांच्यात झालेल्या गोळीबारात तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. या चकमकीत भारतीय सैन्याच्या एका जवानालाही वीरमरण आलं आहे.

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात भारतीय सैन्य आणि दहशतवादी यांच्यात झालेल्या गोळीबारात तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. या चकमकीत भारतीय सैन्याच्या एका जवानालाही वीरमरण आलं आहे. याशिवाय एका नागरिकाचा मृत्यू झाल्याचीही माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय सैन्याला काश्मीरच्या दक्षिण भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारावर भारतीय सैनिकांनी दक्षिण काश्मीरमधील श्रीगुफवारा भागात शोधमोहीम सुरू केली. शोधमोहीमेदरम्यान दहशतवाद्यांनी भारतीय सैन्यावर गोळीबार करण्यास सुरूवात केली.
दहशतवाद्यांच्या गोळीबाराला भारतीय सैनिकांनीही चोख उत्तर दिलं. भारतीय सैन्याने केलेल्या प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात तीन दहशतवाद्यांचा खात्मा झाला, मात्र एक भारतीय जवानही यामध्ये शहीद झाला आहे. लष्कराची कारवाई सुरू असून एक दहशतवादी इथे अजूनही लपून बसल्या असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Before You Go
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती





















