21 October In History : राष्ट्रीय पोलीस स्मृतिदिन आणि आझाद हिंद सरकारची स्थापना, आज इतिहासात कोणत्या घटना घडल्या
On This Day In History : आजच्या दिवशी इतिहासात कोणकोणत्या महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या यांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
On This Day In History : देशभरात आज राष्ट्रीय पोलीस स्मृतिदिन साजरा करण्यात येणार आहे, त्याशिवाय आजच्याच दिवशी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना केली आहे. 18 ऑक्टोबर 2018 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोलिस आणि निमलष्करी दलाच्या जवानांचा सन्मान करण्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नावाने पुरस्काराची घोषणा केली. त्याशिवाय आज अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यातिथी आहे. आजच्या दिवशी इतिहासात कोणकोणत्या महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या यांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तसचं, आजच्या दिवशी असणारे दिग्गजांचे जन्मदिवस आणि निधन झालेल्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत...
आज वसुबारस -
दिवाळीचा पहिला दिवस हा वसुबारस. वसुबारसला 'गोवत्स द्वादशी' असे देखील म्हणतात. यामध्ये जनावरांची पूजा केली जाते. गाय आणि तिचे वासरु हे निर्व्याज प्रेमाचे प्रतीक मानले जाते. गाय वासरावर जे प्रेम करते ते केवळ अनुपमेय असे असते, तसेच वत्साचे गायीवरचे प्रेम हे अनन्यसाधारण असते. म्हणून देव-भक्त, आई-मूल, गुरु-शिष्य यामधील प्रेमसंबंधालाही आपली संतमंडळी नेहमी गाय-वासराच्या प्रेमाची उपमा देतात.
राष्ट्रीय पोलीस स्मृतिदिन -
देशभरात आज राष्ट्रीय पोलीस स्मृतिदिन साजरा करण्यात येणार आहे. देशासाठी आपले कर्तव्य बजावताना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूर पोलिसांचे स्मरण ठेवण्यासाठी राष्ट्रीय पोलीस स्मृतिदिन साजरा करण्यात येतो. 21 ऑक्टोबर 1959 रोजी लदाख येथे चीनच्या सैनिकासोबत लढतांना केंद्रीय राखीव दलाच्या दहा जवानांनी प्राणाची आहुती दिली होती. त्यांच्या बलिदानाचा सन्मान म्हणून दरवर्षी २१ ऑक्टोबर या दिवशी राष्ट्रीय पोलिस दिन किंवा पोलिस स्मृती दिन साजरा केला जातो.
आझाद हिंद सरकारची स्थापना -
नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी 21 ऑक्टोबर 1943 रोजी ‘आझाद हिंद’ सरकारची स्थापना केली. बोस यांनी दुसऱ्या महायुद्धात सिंगापूरमध्ये हे सरकार स्थापन केले. नेताजींनी या सरकारला स्वतंत्र भारताचे पहिले 'आरजी हुकुमते-आझाद हिंद' म्हटले जाते.
अल्फ्रेड नोबेल यांची जयंती -
स्वीडनचे शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांचा जन्म 21 ऑक्टोबर 1833 रोजी झाला होता. अल्फ्रेड नोबल यांनी डायनामायटचा शोध लावला होता. स्वीडनचे शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ नोबेल पुरस्कार दिला जातो. नोबेल पारितोषिक (nobel prize) हा जगातील सर्वात प्रतिष्ठेचा पुरस्कार मानला जातो.
शम्मी कपूर यांची जयंती -
प्रसिद्ध अभिनेते शम्मी कपूर यांचा जन्म 21 ऑक्टोबर 1931 रोजी झाला होता. 50 आणि 60 च्या दशकात शम्मी कपूर यांनी अनेक यशस्वी चत्रपट दिले. शम्मी कपूर यांचे नाव भारतातील इंटरनेट वापरणाऱ्या सुरुवातीच्या व्यक्तींमध्ये गणलं जातं.
यश चोप्रांची पुण्यातिथी -
31 जानेवी 1896 मध्ये जन्मलेल्या यश चोप्रा यांचं निधन 21 ऑक्टोबर 1981 रोजी झाले होते. भारतीय चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक म्हणून त्यांची ओळख आहे. यश चोप्रा यांनी यशराज फिल्म्स या बॅनरची निर्मिती केली होती. त्यांना भारतातील सर्वोत्तम चित्रपट निर्मात्यांमध्ये गणलं जातं. चित्रपटातील कामगिरीमुळे भारत सरकारने त्यांना दादासाहेब फाळके आणि पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित केलेय.
आजच्या दिवशी घडलेल्या इतर महत्वाच्या घटना -
1296 : अल्लाउद्दिन खिलजीने दिल्लीची सत्ता ताब्यात घेतली.
1917: मराठी संगीतकार आणि गायक राम फाटक यांचा
1934 : जयप्रकाश नारायण यांनी काँग्रेस सोशलिस्ट पार्टीची स्थापना केली.
1950 : चीनने हिमालयाच्या कुशीत वसलेल्या तिबेटवर कब्जा केला.
1951 : शामाप्रसाद मुखर्जी यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली.
1970 : नारमन इ बारलॉग यांना नोबेल शांती पुरस्कार देण्यात आला.
1999 : बी. आर. चोप्रा यांना ‘दादासाहेब फाळके पुरस्कार
1949 : इस्राईलचे नववे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचा जन्म
2002 : Hit And Run प्रकरणी मुंबई पोलिसांनी सलमान खान विरोधात गुन्हा दाखल केला.
2003 : चीन आणि पाकिस्तान यांनी एकत्र नौदल सराव केला.
2012: सायना नेहवालने डेनमार्क ओपन बॅडमिंटन सुपर सीरीज खिताप पटकावला.
2013: कॅनाडा सरकारने मलाला युसफजई यांना नागरिकत्व दिलं.
2014: प्रसिद्ध पॅरालम्पिक धावपट्टू आस्कर पिस्टोरियोस याला हत्याच्या गुन्ह्यामध्ये पाच वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली.
2018 : पोलिस आणि निमलष्करी दलाच्या जवानांचा सन्मान करण्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नावाने पुरस्कार जाहीर केला.